Wednesday, 17 February 2021

DIO BULDANA NEWS 17.2.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 441 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 199 पॉझिटिव्ह

• 42 रूग्णांना मिळाली सुट्टी, चिखली शहरात आढळले सर्वात जास्त 32 रूग्ण

  बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 640 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 441 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 199 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 162 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 37 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 271 तर रॅपिड टेस्टमधील 170 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 441 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 22, बुलडाणा तालुका : गिरडा 1, सागवन 1, डोंगरशेवली 1,  चांडोळ 1, कोलवड 1, येळगांव 2, मलकापूर शहर : 16,   दे. राजा शहर : 21, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, अकोला देव 1, सिनगांव जहागीर 13, आळंद 1,   पिंपळनेर 2, अंढेरा 1, सरंबा 1, डोढ्रा 1,  जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, झाडेगांव 1, संग्रामपूर तालुका : पळशी झाशी 1, एकलारा 1,  सिं. राजा शहर : 2, सिं. राजा तालुका : रूम्हणा 2, चिखली शहर : 32, चिखली तालुका : अंत्री कोळी 1, अमडापूर 3, पेठ 1, खैरव 2, दहीगांव 1, सवणा 2, अंचरवाडी 3, तेल्हारा 1, नायगांव 1, खंडाळा मकरध्वज 1,  मंगरूळ नवघरे 1, धोत्रा भणगोजी 1, हातणी 1, केळवद 1, मेरा बु 1,  खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : लाखनवाडा 1, टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, घानेगांव 1, कदमापूर 3, सुटाळा खु 1, मोताळा तालुका : तळणी 1, माकोडी 1,  मेहकर शहर : 2, शेगांव शहर : 8, शेगांव तालुका : गायगांव 2, आडसूळ 1,   मूळ पत्ता हिवरखेड ता. तेल्हारा जि अकोला 3, डोंगरगांव ता. बाळापूर जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 199 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान सोमठाणा ता. चिखली येथील 87 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 42 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  चिखली : 11, दे. राजा : 9, बुलडाणा : अपंग विद्यालय 15, स्त्री रूग्णालय 3, सिं. राजा : 4.

  तसेच आजपर्यंत 116392 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14263 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14263 आहे. 

  तसेच 1145 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 116392 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 15225 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14263  कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 783 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 179 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

*******

  

महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावी

  • कृषि विभागाचे आवाहन

  बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : कृषी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी शेतकरी लाभार्थी निवडण्याकरीता लॉटरी पद्धत अंवलबण्यात आली. या लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जावून आपल्या निवडीबाबत पुढील कार्यवाही करावी. महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागातील विविध योजनेंतर्गत अर्ज केलेल्या ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सोडतील आपली निवड झाल्याबाबत लघुसंदेश प्राप्त झाला आहे.  त्यांनी  महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ https//mahadbtmahait.gov.in वर जावे.

   संकेतस्थळावर शेतकरी योजना या पोर्टलवर क्लिक करावे. त्यानंतर वापरकर्ता आयडी या पर्यावर क्लिक करावे. वापरकर्ता आयडीवर क्लिक केल्यानंतर वापरकर्ता आयडी, पासवर्ड व त्या खालील प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरुन लॉग इन करावे. मुख्य मेनुमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण केलेल्या सर्व अर्जाची स्थिती दिसेल. स्थितीमध्ये Upload Document For Under Scrutiny असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे असे समजावे.

    मुख्य मेनुमधील कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करावी. त्यानंतर वैयक्तीक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर दर्शविलेल्या स्क्रीनवरील कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करावी. कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कागदपत्रे अपलोड स्क्रीन दिसेल. त्यात नमुद केलेली विहीत कागदपत्रे 15 केबी ते 500 केबी या आकारमानातच आपलोड करुन जतन करा या पर्यायावर क्लिक करावी. तरी लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या व तसा लघुसंदेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

***********



जिल्‍ह्यात संचारबंदीचे आदेश पारीत; पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये

  • इयत्ता 5 ते 9 वी पर्यंत शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद
  • खाजगी शिकवणी, कोचिंग क्लासेस बंद; आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद
  • सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक
  • जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: केली कारवाई
  • लग्न समारंभासाठी 50 व्यक्तींनाच परवानगी

बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : जिल्ह्यात 1 ते 15 फेब्रुवारी कालावधीत कोविडचे 971 रूग्ण आढळून आले असून आज सर्वाधिक म्हणजे 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यावरून जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे.  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कारवाई केली.

     आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. आदेशान्वये शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ 50 व्यक्तिंनाच परवानगी असेल. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

   लग्नसमारंभाकरिता केवळ 50 व्यक्तींनाच उपस्‍थित राहता येणार आहे. या समारंभामध्ये सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. लग्नसमारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी अनुज्ञेय असेल. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करणार आहे.  मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.

   लग्न समारंभाच्या नियोजित स्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक राहील. या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे.   जिल्ह्यातील सर्व धार्मिक संस्था,  स्थळे यांनी त्यांच्या धार्मिक संस्थानामध्ये, कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर बंधनकारक राहील, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहे. जिल्ह्यामधील इयत्ता 5 वी ते 9 वी पर्यंत असलेल्या सर्व शाळा तसेच सर्व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केन्द्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस दि. 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.

      या कालावधीत ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण यांना परवानगी राहील. खाजगी आस्थापना, दुकाने या ठिकाणी मास्क , फेस कव्हर असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. तसेच हॉटेलमध्ये सुद्धा मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. या बाबत दर्शनी भागात बॅनर / फलक लावणे बंधनकारक असेल. नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासन दंडात्मक कार्यवाही करेल. हॉटलमध्ये तसेच बाहेरील आवारात पार्किंगसाठी गर्दी होणार नाही या बाबत योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात यावे. रांगा व्यवस्थापित करण्यासाठी व सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट खुणा करण्यात याव्यात. तसेच दर्शनी भागात फलक लावण्यात यावा. अतिथी,  ग्राहकांनी वापरलेले फेस कव्हर्स,  मास्क, हातमोजे यांची संबंधीतांनी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी.

  यापूर्वी कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये, या करिता वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेशांचे उल्लंघन होणार नाही या बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. जिल्‍ह्यातील सर्व आठवडी बाजार दुपारी 4 वाजेनंतर बंद ठेवण्यात येणार आहे.   सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे. सदर आदेश 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.

                                                            ***************

पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. पिंपरखेड येथील लोकसंख्या 625 आहे. टँकरद्वारे या गावाला दररोज 17  हजार 200 लीटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

                                                                                                **********

No comments:

Post a Comment