|
|
जळगांव जामोद वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या 210 किलो सालई गोंद जप्त
- 3 आरोपींना अटक
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : वनविभागा अंतर्गत जळगांव जामोद वनपरिक्षेत्रात दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी वनखंड क्र. 366 मध्ये अवैधरित्या वनातून सालई गोंद वाहतुक होत असतांना 210 किलो (9 पोते) जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात एकुण 9 आरोपी असुन 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 6 आरोपी फरार आहे. सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना वि. प्रथम वर्ग न्यायदंडधिकारी जळगांव जामोद यांच्या समोर उपस्थित केले असता त्यांना जामीन मिळालेला आहे.
सदर आरोपी जमानतीवर सुटल्यानंतर त्यांनी संबंधित वनरक्षक इतर कर्मचारी यांना ‘तुमचे जंगल कसे राहते ते पाहुन घेवू’ अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत. या आरोपींना जामिन मिळाल्यापासून अंगारीच्या घटना सुरु झाल्या आहेत. सदर घटनामध्ये 3 आरोपी व 6 फरार आरोपी यांनी वनामध्ये आग लावल्याचा संशय आहे. त्यांचा शोध पोलीस विभागामार्फत व वन विभागामार्फत सुरु असुन आरोपींविरूद्ध चौकशी करुन दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचे कलम 51 (ए) (जी) नुसार जंगल जलाशये, नद्या, वन्यजीव व नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण करुन निसर्गाचा समतोल राखुन पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरी वनक्षेत्रात अंगार लागल्यास नागरिकांनी वनविभागाच्या अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी क्र. 9284335365, 7083637281 संपर्क साधावा.
एखादया व्यक्तीने वनामध्ये अपप्रवेश केल्यास भारतीय अधिनियम 1927 चे कलम 26 अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी व्यक्ती त्यास सिध्दपराध ठरविणे न्यायालय, वनास पोहोचलल्या नुकसानीबद्दल जी नुकसान भरपाईची रक्कम देण्यास
निर्देशित करील, त्या नुकसान भरपाईच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक वर्ष मुदतीपर्यंतचा रक्कम देण्यास निर्देशित करील, त्या नुकसानभरपाईच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक वर्ष मुदतीपर्यतचा कारावास किंवा पाच हजार रुपये पर्यंतचा दंड किंवा
या दोन्ही शिक्षेस पात्र राहील. याबाबत नोंद घ्यावी,असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी कळविल आहे.
आग लावल्याच्या घटना व वनगुन्हे
जामोद वर्तुळात नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 5.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 6 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र पश्चिम जामोदमध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 6.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 7 हेक्टर वनगुन्हा 8.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 2 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 9.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 10.2.2021, नियतक्षेत्र कुंवरदेव 1 मध्ये जळीत क्षेत्र 2 हेक्टर वनगुन्हा 11.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 5 हेक्टर वनगुन्हा 13.2.2021, नियतक्षेत्र गारपेठ मध्ये जळीत क्षेत्र 8 हेक्टर वनगुन्हा 14.2.2021. असे एकूण जळीत क्षेत्र 50 हेक्टर आहे.
0000000
घाटबोरी वनपरिक्षेत्रातीत जप्त केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री
- आक्षेप नोंदवायचा असल्यास 10 मार्च पूर्वी सादर करावा
बुलडाणा,(जिमाका) दि.24 : वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी, घाटबोरी या परिक्षेत्रामध्ये वनगुन्हा अंतर्गत जप्त व सरकार जमा करण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची विल्हेवाट करावयाची आहे. घाटबोरी परिक्षेत्रामध्ये दे. साकर्षा लाकुड आगारात असलेल्या दुचाकी व चारचाकी या भंगार वाहनांची विक्री करावयाची आहे. त्यामुळे या वाहनांबाबत कोणास काही आक्षेप नोंदवायचे असल्यास दि. 10 मार्च 2021 पुर्वी या कार्यालयास लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. वाहनाचा प्रकार टाटा 407 वाहन क्र. एम एच 30 बी 2756, चेसिस नंबर 01050621966 इंजिन नंबर टी वाय पी ई 4978 पी 21 जे 10799040, जिप ट्रॅक्स वाहन क्र. एम एच 28 ऐ 8202, हिरो होंडा मोटार सायकल इंजिन नंबर एम बी एल 10 ई ई 89 सी 49434 असा आहे, असे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
No comments:
Post a Comment