तरूण व पात्र नवीन
मतदारांना महाविद्यालयात प्रवेशावेळीच मिळणार अर्ज
·
8, 15, 16 व 22 जुलै 2017 रोजी विशेष शिबिर
·
बीएलओ घरोघरी जावून मतदार नोंदणी अर्ज भरून घेणार
बुलडाणा, दि.5
- भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त आदेशान्वये वय 18 ते 21 वर्ष वयोगटातील
तरूण व पात्र प्रथम मतदारांसाठी मतदार नाव नोंदणीची 1 जुलै ते 31 जुलै 2017
दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. काही कारणास्तव मतदार
यादीत समावेश न झालेल्या तरूण व पात्र प्रथम मतदारांना मतदार यादीत नाव नोंदण्याची
ही सुवर्णसंधी आहे. अशा मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे. त्यासाठी 8, 15, 16 व
22 जुलै 2017 रोजी विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात आले आहे. तरूण व पात्र नवीन मतदारांना
महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळीच मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अर्ज मिळणार
आहे. त्यामुळे नवीन मतदारांना अर्ज प्राप्त करणे सोपे होणार आहे.
शिक्षण विभागाकडून सर्व
विद्यापीठे, महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था यांना नवीन मतदारांना प्रवेश
घेतवेळीच मतदार यादीचा अर्ज देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी
महाविद्यालयांमध्ये नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच फॉर्म 6,
7, 8 व 8 अ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच विशेष शिबिरांमध्ये बीएलओ घरोघरी जावून नव्याने
मतदार याव्यतिरिक्त 8 जुलै व 22 जुलै 2017
रोजी विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त 18 ते 21 वर्ष वयोगटातील
तरूण व पात्र नवीन मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
****
सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरीता पूर्व प्रशिक्षणाची सुविधा
·
25 जुलै ते 3 ऑगस्ट 2017 दरम्यान मोफत प्रशिक्षण वर्ग
·
प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी 18 जुलै 2017 रोजी
मुलाखतीचे आयोजन
बुलडाणा, दि.5 - भारतीय सैन्य दल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना
प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. कम्बाईंड डिफेन्स सर्विसेस या परीक्षेत उत्तीर्ण
झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीयन
युवक-युवतींकरीता एसएसबी मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी राज्य शासनामार्फत 25 जुलै
ते 3 ऑगस्ट 2017 दरम्यान 10 दिवसांच्या एसएसबीचे 43 वे मोफत प्रशिक्षण वर्गाचे
आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल
कार्यालय, आवार क्लास-2 क्वार्टर, नासिक रोड, नाशिक येथे होणार आहे. या प्रशिक्षणासाठी
निवास, प्रशिक्षण व भोजनाची सोय विनामूल्य करण्यात आलेली आहे.
या प्रशिक्षणासाठी इच्छूक असलेल्या पात्र उमेदवारांच्या
मुलाखतीचे आयोजन 18 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
बुलडाणा येथे करण्यात आले आहे. या मुलाखतीसाठी उमेदवार हा सीडीएस व एनडीए परीक्षा
उत्तीर्ण असावा व त्यासाठी सर्वीस सिलेक्शन बोर्डचे मुलाखतीसाठी पात्र असावा,एनसीसी
सी प्रमाणपत्र ए किंवा बी या ग्रेडमध्ये उत्तीर्ण असावा, एनसीसी ग्रुप हेड
क्वॉर्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी, टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी
कडून मुलाखतीकरीता कॉल लेटर असावे, युर्नीवर्सिटी एंन्ट्री योजनेसाठी एसएसबीकडून
मुलाखतीकरीता कॉल लेटर असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीमध्ये नाव
असावे.
मुलाखतीसाठी येताना उमेदवाराने एसएसबी
मुलाखतीचे पत्र, सीडीएस लेखी परीक्षेचे कॉल लेटर किंवा स्पेशल एंट्रीद्वारे
एसएसबीकरीता अर्ज पाठवल्या बाबतचा पुरावा सोबत आणावा, इयत्ता 10 ते पदवी पर्यंतच्या
शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रती व छायांकित प्रती, एनसीसी प्रमाणपत्र
छायांकित प्रती सोबत आणाव्या.
मुलाखतीला
येण्याआधी उमेदवाराने पीसीटीसी ट्रेनिंग च्या गुगल प्लस वरती किंवा सैनिक कल्याण
विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.com
या संकेतस्थळावरील रिक्रुटमेंट टॅबला क्लिक करून त्यामधील उपलब्ध
चेक लीस्ट व महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करावे. त्यांची दोन प्रतींमध्ये प्रींट
काढून घेवून दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करून त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट
काढून ते भरून आणावे. अधिक माहितीसाठी 0253-2451031 व 0253-2451032 क्रमांकावर कार्यालयीन
वेळेत संपर्क करावा. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*****
सहायक कनिष्ठ पदाच्या लेखी परीक्षेचे 9 जुलै 2017 रोजी आयोजन
बुलडाणा, दि.5 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलडाणा विभागातर्फे सरळ सेवा भरती-2016-17
अंतर्गत पदे भरण्याकरीता जानेवारी 2017 मध्ये जाहीरात प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार
सहायक (कनिष्ठ) पदासाठी लेखी परीक्षेचे आयोजन 9 जुलै 2017
रोजी करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांना एसएमएसद्वारे लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र
www.msrtcexam.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करून घेण्याबाबत
कळविण्यात आले आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच या भरती प्रक्रियेबद्दल व लेखी परीक्षेसंदर्भात
अफवा पसरवून उमेदवारांना निवड करून देण्याचे प्रलोभन दाखवून उमेदवारांमध्ये संभ्रम
निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतो. अशा अफवचा व प्रलोभनास उमेदवारांनी अथवा त्यांच्या
नातेवाईकांनी बळी पडू नये व अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रवृत्तीच्या
नागरिकांकडून उमेदवरांशी संपर्क साधण्यात आल्यास त्याबाबत त्वरित संबंधित
उमेदवाराने रा.प महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रक यांचेशी संपर्क साधण्यात यावा.
तसेच स्थानिक पोलीस स्टेशन व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. सदरची
भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यास रा.प महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन
रा.प महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
******
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आज जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा, दि.5 : राज्याचे
पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर उद्या 6 जुलै 2017
रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 6 जुलै
2017 रोजी पहाटे 5.13 वाजता शेगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय
विश्रामगृहाकडे प्रयाण, पहाटे 5.40 वाजता शासकीय विश्रामगृह शेगांव येथे आगमन व
राखीव, सकाळी 10 वाजता शेगांव येथून जिल्हा परिषद, बुलडाणाकडे प्रयाण, सकाळी 11
वाजता आएसओ मानांकन प्रदान सोहळा कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृह
येथे उपस्थिती, दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद येथून शासकीय विश्रामगृह शेगांवकडे
प्रयाण, दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह शेगांव येथे आगमन व राखीव, रात्रौ 8.20
वाजता शेगांव येथून रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्री 8.45 वाजता शेगांव रेल्वे
स्थानक येथे आगमन व राखीव, रात्रौ 9 वाजता शेगांव येथून अमरावती एक्सप्रेसने
मुंबईकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment