Tuesday, 4 July 2017

news 4.7.2017 DIO BULDANA


भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धांसाठी निवड चाचणी
·        25 ऑगस्ट 2 017 पर्यंत अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 4- केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारांतील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून पाठवायचा आहे. सचिवालय जिखान्यास सदर संघ निवड व त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी शासनाने सोपविली आहे. त्यामुळे विभागात / कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले खेळाडू / कर्मचाऱ्यास भाग घ्यावयाचा आहे.
  टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धीबळ, ॲथेलेटीक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिींग, पावर लिफ्टिींग, शरीरसौष्ठत्व, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत आदी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा होणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचा भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी 25 ऑगस्ट 2017 पूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकूल, क्रीडानगरी, बुलडाणा येथे संपर्क साधून विहीत नमुन्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घ्यावे. कार्यालय प्रमुख यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा कार्यालय येथे आवेदनपत्र सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        ****
    रोजगार मेळाव्याचे आज आयोजन
बुलडाणा, दि. 4- दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत नगर परिषद बुलडाणा व सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ प्लास्टीक इंजिनियरींग एन्ड टेक्नोलॉजी रसायन आणि पेट्रो रसायन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उद्या 5 जुलै 2017 रेाजी सकाळी 10 वाजता नगर परिषद, बुलडाणा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     या मेळाव्यात मशीन ऑपरेटर, प्लास्टीक प्रोसेसिंग, इंजेक्शन मोल्डींग, ट्रूल रूम, ॲड प्रोगामार, मेटेनन्स ऑफ मशिनरी टेक्निशियन, मशीन ऑपरेटर ॲड प्रोगामर सीएनसी मिल्लींग या विविध कोर्सेससाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. ज्या मुलांची निवड होईल त्यांच्यासाठी 6 महिन्याची राहण्याची, जेवण्याची, निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थींना त्याच कंपनीमध्ये रोजगारसुद्धा दिल्या जाणार आहे. तसेच  वयोगट 18 तू 45 मधील दारिद्र्य रेषेखालील कुटूंब, अनु. जाती / जमाती, अल्पसंख्यांक, महिला लाभार्थी यांना स्वयंरोजगारा बरोबरच विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार अभियानाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहे.
                                                                        *****
          मत्स्यजिरे खरेदीसाठी मत्स्यकास्तकारांना उपलब्ध
·        कोराडी येथे विक्री सुरू
बुलडाणा, दि. 4- जिल्ह्यात सन 2017-18 या आर्थिक वर्षाचा भारतीय प्रमुख कार्प (कटला, रोहू, मृगळ) यांचा प्रजनन हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज उत्पादन केंद्र, कोराडी, ता. मेहकर येथे मत्सयजीरे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
  सद्यस्थितीत मत्स्यबीजाचा मत्स्यजिरे प्रकार विक्रीसाठी येथे उपलब्ध करण्यात आलेला आहे. मत्स्यबीजाची मागणी  सहायक आयुक्त स. ई नायकवडी यांच्या 9029515539, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 07262-242254 व सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी म. वि जैस्वाल यांच्या 9881801420 क्रमांकावर नोंदविण्यात यावी. मत्स्यबीजाचे नविन दर 2014-15 पासून अंमलात आलेले असून ते खालीलप्रमाणे आहेत. बीजाचा आकार 7 ते 12 मी.मी असलेल्या मत्स्यजीरे 1500 रूपये प्रति लाख,  12 ते 25 मि.मी आकार असलेल्या मत्स्यबीजे 200 रूपये प्रति हजार, 25 ते 50 मी.मी आकार असलेली अर्ध बोटुकली 300 रूपये प्रति हजार तसेच या सर्व मस्त्यबीजांकरीता पँकिंग खर्च 15 रूपये प्रति बॅग असणार आहे.  मच्छीमारी सहकारी संस्था, जिल्हा मच्छिमार सहकारी संस्थांचा संघ, मत्स्यकास्तकार, शेततळीधारक मत्स्यकास्तकार यांनी मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यबीज केंद्रामधून मत्सयबीज खरेदी करणे बंधनकारक आहे. याची नोंद घेण्यात यावी. खरेदी न केल्यास शासकीय योजनांचा लाभ देतेवेळेस अडचण निर्माण झाल्यास, अपात्र ठरल्यास सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय जबाबदार राहणार नाही. आवश्यकतेनुसार आणि मत्स्यबीज उपलब्धतेनुसार खरेदी करण्यात यावे, असे आवाहन सहायक आयुक्त स. ई नायकवडी यांनी केले आहे.
                                                                        *****
कुक्कुटपालन व्यवसायाकरीता कुकुट पक्ष्यांसाठी अर्ज आमंत्रित
  • 9 ऑगस्ट 2017 पर्यंत पंचायत समितीमध्ये अर्ज करावे
बुलडाणा, दि. 4-  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेनुसार 06/04/02 संकरीत गायी/ म्हैस गट वाटप/ अंशत: ठानबद्ध पद्धतीने शेळी वाटप तसेच 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपनातून कुक्कुटपालन व्यवसायासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरीता  50 व अनुसूचित जातीकरीता 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करावयाच्या आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू झालेली आहे. अर्जाचा नमुना पंचायत समिती स्तरावर पशुधन विकास अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे. या अर्जाच्या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज 9 ऑगस्ट 2017 पर्यंत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात स्वीकारण्यात येणार आहे.
   दुधाळ जनावरे / शेळी गट व 1000 मांसल पक्षी या लाभासाठी  एका कुटूंबातील केवळ एकाच लाभार्थ्यांनी अर्ज करावा, सर्व प्रवर्गातील अर्जदारांना योजनेचा लाभ द्यायचा असून दारिद्र्य रेषेखालील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही, अर्जदारास 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसावे याबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा, नुकताच काढलेला पासपोर्ट फोटो जोडावा.
  सदर योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज करू नये. योजनेच्या लाभासाठी नागरिकांनी कोणत्याही दलालामार्फत किंवा खाजगी व्यक्तीमार्फत संपर्क साधण्याची आवश्यकता नाही. लाभार्थींना या योजनेचा लाभ सन 2017-18 च्या प्राप्त तरतुदीस अधिन राहून देण्यात येईल. तरी या योजनेचा लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त  डॉ. व्ही. बी जायभाये यांनी केले आहे.
*****
सांख्यिकी कार्यालयात सांख्यिकी दिन कार्यक्रम साजरा
     बुलडाणा दि.4 - विश्वविख्यात संख्याशस्‍त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन सांख्यिकी दिन म्हणून 29 जून 2017 रोजी जिल्हा सांख्यिकी कार्यालय येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिजामाता महाविद्यालयाच्या डॉ. वंदना काकडे यांनी दिप प्रज्वलन करुन  केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी दिपक सिडाम होते, तर  प्रमुख पाहुणे म्हणून मानव विकास कार्यक्रमाचे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिजामाता महाविद्यालयाचे संगणकशास्त्र विभागाचे प्रा. एस. आर सिरसाठ उपस्थित होते.
    जिल्हा सांख्यिकी अधिकारी सं. शे धारे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सौ. वंदना काकडे व प्रा. एस. आर सिरसाठ यांनी यावेळी  प्रशासकीय सांख्यिकी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत नवीन ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सांख्यिकी माहितीची उपयुक्तता यावर भर दिला. याप्रसंगी वैभव कुलकर्णी यांनी प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांचे संशोधनात्मक अधिष्ठानाबाबत माहिती दिली. तसेच श्री सिडाम यांनीही सांख्यिकी दिनाचे महत्व विषद केले. डॉ वदना काकडे यांनी विस्तृत माहिती देतांना सोबतच महालनोबिस यांचे धार्मिक, अध्यात्मिक व संशाधनात्मक अधिष्ठानाबाबत माहिती दिली. 

     संचलन मिलींद इंगळे यांनी, तर आभार प्रदर्शन श्रीमती भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील शाम देशपांडे, केशव देशमुख, प्रवीण बोदडे, अनिलकुमार तोंडे, कु. माया जुंबड, श्रीमती सु.सु. पवार, व प्रकाश फाटे आदींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment