राष्ट्रीय निवृत्ती वेतन येाजनेचा प्रशिक्षण
कार्यक्रम
·
जिल्हा
कोषागार कार्यालयाचा उपक्रम
बुलडाणा,
दि. 26 - राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व अंशदाय
निवृत्ती वेतन योजना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज 26 जुलै 2017 रोजी प्रशासकीय
इमारतीच्या सभागृहात पार पडला. या प्रशिक्षण कायर्क्रमाला आहरण व सवितरण अधिकारी
उपस्थित होते. यावेळी दिप प्रज्वलन करून प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन
कार्यक्रमाला व्यासपीठावर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षक दत्तात्रय
काळे, जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर
बावस्कर, स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक श्री. झुंजारे, उपमुख्य लेखा व
वित्त अधिकारी सचिन इगे, अप्पर कोषागार अधिकारी श्री. मडावी व श्रीमती स्मिता
तिमसे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षक श्री. काळे
यांनी सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे लाभ सांगितले. तसेच यामध्ये
लाभार्थ्यांची होत असलेली गुंतवणूक समजवून सांगितली. विमा छत्र योजनेचे लाभ विषद
करून सेवानिवृत्त होत असलेल्या प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांनी विमा छत्र योजनेत
समाविष्ट होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी आर.ए. पाटील,
श्री. मुंडोकार, श्री. निखारे, पंकज गवई आदींसह कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी
प्रयत्न केले.
*******
इयत्ता
12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावे
·
ऑनलाईन
अर्ज barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावे
·
प्रिंट आऊट
कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रावर कागदपत्रांसह द्यावी
बुलडाणा,
दि. 26 - इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी
जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहे. सन 2017-18 मध्ये
प्रवेशित विद्यार्थ्यांनी सदर अर्ज barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सीसीव्हीआयएस
प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे. ऑनलाईन द्वारे भरलेले अर्जाची प्रिंट अर्जदाराने
आवश्यकतेनुसार राहीलेली कार्यवाही पूर्ण करूनच आवश्यक कागदपत्रांसह स्वत: अथवा
प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत समिती कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात विहीत शुल्क
भरून सादर करावी.
अर्ज सादर केल्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग अधिनियम
2000 व जाती पडताळणी नियमावली 2012 नुसार अर्जावर कार्यवाही करण्यात येते. अर्जाच्या
प्रिंटवर अर्जदारांनी प्राचार्यांची सही, शिक्का व शिफारस पत्र घ्यावे. तसेच चालू वर्षाचे
चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे. जात पडताळणी नियमावली मधील नमुना क्रं 3 व 17 हा 100
रूपयांच्या स्टँम्पवर प्रतिज्ञापत्र सादर करावे. चालु वर्षातील इयत्ता 12 वी
विज्ञान शाखेतील अर्जदारांनी माहे नोव्हेंबर 2017 पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज
वरीलप्रमाणे आवश्यक ती कार्यवही पुर्ण करून व पुराव्यांसह सादर करावे.
पुराव्यांमध्ये अनुसूचित जातीसाठी 10.8.1950
पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे, विजाभज जातीसाठी 21.11.1962
पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे आणि इमाव व विमाप्र जातींसाठी 13.10.1967
पूर्वीचे महाराष्ट्रातील रहीवास व जातीचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने
जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सक्षम
प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केले असल्याची स्वत: खात्री करावी, खोटी माहिती सादर
करून किंवा खोटे दस्ताऐवज दाखल करून
त्यांच्या वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळविणे हा दंडणीय अपराध आहे. असा गुन्हा हा
दाखलपात्र व अजमानती आहे. अशा व्यक्तींना दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व 20 हजार
रूपये पर्यंत दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जात
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी व त्यांच्या पडताळणीकरीता लोकसेवकांकडून पैशाची मागणी
होत असेल, त्यासाठी अडवणूक करणे, दिरंगाई करणे असे प्रकार आढळून येत असल्यास अशा
लोकसेवकांविरूद्ध संबंधीत जिल्ह्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे त्वरित
तक्रार करावी. प्रस्तावासोबत कुठल्याही प्रकारचे बनावट कागदपत्रे जोडू नये,
मध्यस्थ व दलांलापासून सावध रहावे, असे
आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment