|
·
समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीस जिल्ह्यात प्रारंभ
·
शिवणी पिसा गावातील पाच शेतकऱ्यांनी दिली जमीन
बुलडाणा, दि. 20
: महाराष्ट्र समृद्धी
महामार्ग हा राज्याच्या कृषी व औद्योगिक विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यामुळे
शासनाने या प्रकल्पाला प्राधान्यक्रम दिला आहे. या प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांचे संपूर्ण समाधान करण्यात येवूनच कार्यवाही करण्यात
येईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिल्या जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
लोणार तालुक्यातील महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी
शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली. त्याप्रसंगी लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन खरेदीचे
कागदपत्रे वितरण करताना श्री.शिंदे बोलत होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी लोणार
तालुक्यातील शिवणी पिसा गावातील पाच शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार शेत
जमिनीची नोंदणी करुन दिली. तसेच समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल
शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी
पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खेातकर, आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. शशिकांत
खेडेकर, रस्ते विकास महामंडळाचे अप्पर जिल्हाधिकारी
जगदीश मुनीयार, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत
पुलकुंडवार, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता
श्री. देशमुख, महामंडळाचे तहसीलदार श्री. जाधव, लोणारचे तहसीलदार सुरेश कवळे आदी उपस्थित
होते.
थेट खरेदी
व्यवहारानंतर शासनाने निश्चित केलेला शेतीचा दर लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात
तात्काळ जमा करण्यात येणार असल्याचे सांगत मंत्री श्री. शिंदे म्हणाले, हा समृद्धी
महामार्ग दहा जिल्ह्यांना जोडणार असून या महामार्गावरुन 26 तालुके हे विकास मार्गावर
येणार आहेत. हा प्रकल्प लवकर सुरु व्हावा यासाठी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच
थेट जमीन खरेदीचा निर्णय घेतला आहे.
पाच शेतकऱ्यांनी दिलेल्या
जमिनींची खरेदी
सार्वजनिक
बांधकाम उपक्रम मंत्री श्री.शिंदे यांच्या उपस्थितीत लोणार तालुक्यातील शिवणी पिसा
गावच्या पाच शेतकऱ्यांची सुमारे 1.05 हेक्टर आर जमिनीची
रजिष्ट्री करण्यात आली. यापोटी जवळपास 92 लक्ष रूपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा
करण्यात आले. जमिन दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये निवृत्ती नामदेव पिसे, परमेश्वर नामदेव
पिसे, श्रीमती मालताबाई बाळकिसन पिसे, केशव आश्रुजी पिसे व श्रीमती कावेरी अशोक पिसे
यांचा समावेश आहे. सदर जमिनी शिवणी पिसा गावच्या गट क्रमांक 249, 250, 253 व 254 गट
क्रमांकामधील आहे.
No comments:
Post a Comment