जिल्ह्यात संततधार ..
- बुलडाणा,
शेगांव, नांदुरा व मलकापूर तालुक्यात दमदार
- नांदुरा तालुक्यात सर्वात जास्त 60 मि.मी
पावसाची नोंद
बुलडाणा, दि. 17 - जिल्ह्यामध्ये शनिवारपासून सुरू झालेली
पावसाची संततधार कायम असून रविवारलाही जिल्ह्यात पावसाने झड लावली होती. त्यामुळे जनजीवनावर काहीसा परिणाम जाणवत होता.
संततधारेमुळे ग्रामीण भागात शेतीच्या मशागतीची कामेही बंद होती. रविवारला सकाळी
काही भागात, तर दुपारी काही ठिकाणी पावसाचा वेग वाढला होता. जिल्ह्यात बुलडाणा, नांदुरा, मलकापूर व शेगांव
तालुक्यात दमदार पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज 17 जुलै 2017 रोजी
सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त
आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद खालीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत
पडलेल्या पावसाची –
बुलडाणा : 54 मि.ली (402 मि.ली), चिखली
: 29 (301), दे.राजा : 7 (194), मेहकर : 25 (355), लोणार : 16 (265), सिंदखेड
राजा : 7.8 (237.4), मलकापूर : 42 (220), मोताळा : 13 (247),
नांदुरा : 60 (354.5), खामगांव : 39.2 (258), शेगांव : 42 (181), जळगाव
जामोद : 3 (257) आणि संग्रामपूर : 2 (124 मि.ली) पावसाची नोंद करण्यात आली. याप्रमाणे
जिल्ह्यात एकूण 340 मि.ली पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 26.2 मि.ली
आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस बुलडाणा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस संग्रामपूर
तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2017 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 261.2
मि.मी आहे.
******
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंच्या
प्रशिक्षणाकरीता प्रस्ताव आमंत्रित
·
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयात त्वरित प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा,
दि. 17 - अधिकृत आंतरराष्ट्रीय
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व
इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य करण्याकरीता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. राज्यात
क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने क्रीडा विषयक
तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा,
खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख करणे या बाबी
विचारात घेवून क्रीडा धोरण-2012 तयार करण्यात आले आहे. यातंर्गत राज्यातील
खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याकरीता तसेच सहभागी झालेल्या
राज्यातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देणे याबबातचा शासन निर्णयही क्रीडा विभागाने
पारित केलेला आहे. त्यानुसार अशा खेळाडूंना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा
प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास व भोजन, देश विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण
उपकरणे, तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क,
आधुनिक क्रीडा साहित्य आयात/खरेदी करणे व गणवेश खरेदी यासाठी अर्थसहाय्य देण्यात
येणार आहे. या योजनेसाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा,
आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकूल व युवा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा, युवा
आम्लिम्पिक, ज्युनिअर एशियन, विश्व कप, पॅरा आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक आशियाई
कप आदी अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या
खेळ/क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ /क्रीडा प्रकार इतर स्पर्धांमध्ये
आर्थिक सहाय्य मिळण्यास अनुज्ञेय होणार आहे. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या
देशी खेळांचा अपवाद उपरोक्त शासन निर्णयान्वये करण्यात आलेला आहे.
विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी
किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंना या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज
परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत
किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे शिवछत्रपती क्रीडा संकुल,
म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करण्यात यावे, असे आवाहन डॉ. विजय झाडे,
आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, बुलडाणा किंवा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, 020-27390371
क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.
*******
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंना पारितोषिकासाठी प्रस्ताव
आमंत्रित
·
जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयात त्वरित प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा,
दि. 17 - राज्यात क्रीडा
संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण असणे
आवश्यक आहे. याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आले आहे. या
धोरणानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना व त्यांचे
क्रीडा मार्गदर्शक, प्रशिक्षक यांना रोख रक्कम देवून गौरव करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, विश्व अजिंक्यपद
स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकूल व युवा राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा,
युवा आम्लिम्पिक, ज्युनिअर एशियन, विश्व कप, पॅरा आशियाई स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक
आशियाई कप आदी विविध अधिकृत आंतरराष्ट्रीय खेळांच्या अधिकृत संघटनांच्या
वयोगटातील खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त केले असल्यास
आपले खेळाचे प्रमाणपत्र तसेच संबंधित राज्य/राष्ट्रीय खेळ संघटनांच्या शिफारशीसह रोख
बक्षिस पारितोषिकाचा विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शिवछत्रपती
क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांचेकडे सादर करावे, असे आवाहन डॉ. विजय
झाडे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, बुलडाणा किंवा पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा, 020-27390371
क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment