अवैध सावकारीच्या 13 प्रकरणांमध्ये 20 अवैध सावकारांवर गुन्हे दाखल
·
जिल्हाधिकारी
यांची धडक कारवाई
·
महाराष्ट्र
सावकारी अधिनियमातंर्गत कारवाई
बुलडाणा,
दि. 24 - अनधिकृत सावकारी व्यवसाय
करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी तसेच सावकारी व्यवसायावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. या
कायद्याच्या कलम 18 अंतर्गत अर्जदार शेतकरी यांच्या शेत जमिनी ताब्यात देण्याची
कार्यवाही करण्यात आलेली आहे. अशा 17 प्रकरणांपैकी 13 प्रकरणात संबंधीत अवैध
सावकारांवर सावकारी कायद्याच्या कलम 39 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही
कारवाई जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
आहे.
जिल्ह्यातील जळगांव जामोद पोलीस स्टेशन
अंतर्गत प्रकाश वल्लभदास मुधडा, संतोष मदनलाल चांडक, सुमित प्रकाश मुंधडा, श्रीमती
उषा प्रकाश मुंधडा, सुपडा रामभाऊ इंगळे, श्रीमती अंबाबाई रामभाऊ इंगळे, शेगांव
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत शिवकुमार श्रीराम अग्रवाल, लालचंद विश्वंभर अग्रवाल
यांचेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यामध्ये धामणगांव बढे पोलीस
स्टेशन अंतर्गत पुंडलीक बाबुराव पाटील व निवृत्ती मांगो बावस्कर, चिखली पोलीस
स्टेशन अंतर्गत संजय माणिकराव गाडेकर, अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष्मण शामराव
घुबे, श्रीमती शारदा लक्ष्मण घुबे, जगन्नाथ शामराव घुबे, श्रीराम शामराव घुबे, रामेश्वर
कडुबा घुबे, श्रीमती विजया साहेबराव पंडीत, डोणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत ज्ञानेश्वर
बाळकृष्ण त्रिकाळ व साहेबराव तुळशीराम त्रिकाळ यांचा समावेश आहे. या सर्वांवर
संबंधीत सहायक निबंधक, सहकारी संस्था यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली
आहे.
तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, दे.राजा
यांनी तालुक्यातील सावकार बद्रीनाथ आत्माराम निलख यांचेविरूद्ध पोलीस स्टेशन
दे.राजा येथे गुन्हा दाखल नोंदविण्याची कार्यवाही केली आहे. या कायद्यानुसार अवैध
सावकारांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समितीसुद्धा
गठीत करण्यात आली आहे. या समितीची सभा 30 जून 2017 रोजी पार पडली. त्यामध्ये शेतकऱ्यांना
न्याय मिळण्यासाठी तातडीने अवैध सावकारी तक्रारी प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार
जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनामध्ये ही कारवाई करण्यात आली, असे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब
चव्हाण यांनी कळविले आहे.
*****
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचा
संवेदीकरण कार्यक्रम
·
कृषी
सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज भरून द्यावे
·
आपले
सरकार केंद्र चालकांनी कर्जमाफीचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सहकार्य करावे
बुलडाणा, दि. 24 - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना – 2017 च्या संवेदीकरण कार्यक्रम सहकार
विद्या मंदीराच्या सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात व्ही.एल.ई केंद्र
चालकांना कृषी सन्मान योजनेचे ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना भरून देण्यास सहकार्य
करण्याचे आवाहन केले. हे अर्ज जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी भरून द्यावेत, असे आवाहनही याप्रसंगी
करण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक
प्रभाकर श्रोते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, नाबार्डचे जिल्हा
प्रबंधक सुभाष बोंदाडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, आपले सरकार पोर्टलचे
जिल्हा व्यवस्थापक प्रविण वानखडे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा कृषि विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी उपनिबंधक श्री. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान
योजनेची संपूर्ण माहिती विषद केली आणि संबंधित यंत्रणांची भूमिका सांगितली. तसेच
पात्र/अपात्रतेचे निकषांबाबत मार्गदर्शन केले. श्री. वानखडे यांनी याप्रसंगी कर्जमाफीच्या ऑनलाईन
अर्जाविषयी माहिती दिली. त्यांनी आपले सरकार वेबपोर्टलवरील अर्जाच्याबाबत तांत्रिक
मार्गदर्शन केले. अशोक खरात यांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपले सरकार केंद्र
चालकांना येणाऱ्या अडचणींचे समाधान केले. ऑनलाईन कामकाज करताना नेटवर्कमधील अडचणींबाबत
स्वप्नील कुंवर यांनी उपाययोजना सांगितल्या. यावेळी नाबार्डचे श्री. बोंदाडे व
श्री. श्रोते यांनी योजनेच्या अंमलबजाणीमधील आपले सरकार केंद्र चालकांची व बँकांची
असलेली महत्वपूर्ण भूमिका विषद केली. केंद्र
चालकांनी शेतकऱ्यांना योजेनेचे विनामूल्य ऑनलाईन अर्ज भरण्यास सहकार्य करण्याचे
आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक
प्रशासन अधिकारी श्री. घोंगे, सहकार विभागातील अधिकारी, जिल्हा सूचना व विज्ञान
केंद्राचे अधिकारी यांनी प्रयत्न केले.
****
संत श्री गजानन महाराज यांची पालखी 29 जुलै रोजी खामगावात
- खामगांव ते शेगांव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने
- 30 जुलै रोजी पालखीचे 5 वाजता शेगांवकडे प्रस्थान
बुलडाणा, दि. 24
- श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या
मार्गावर आहे. पालखीचे 23 जुलै 2017 रोजी
सिंदखेड राजा येथे आगमन झाल्यानंतर पालखी शेगांवकडे मार्गस्थ झाली आहे. पालखी 29
जुलै 2017 रोजी खामगांव येथे येत असून
सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत खामगांव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण
करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय, खामगांव येथे राहणार
आहे. त्यानंतर 30 जुलै 2017 रोजी सकाळी 5 वाजता पालखीचे शेगांवकडे प्रयाण होणार
आहे. तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची
मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता खामगांव ते शेगांव, खामगाव- नांदुरा व बाळापूर
नाका ते एसटी स्टँण्ड या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार
आहे.
बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील 29
जुलै 2017 चे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक बाळापूर नाका- जनुना ढाबा-
घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या
पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच खामगांव ते नांदुरा रस्त्यावरील वाहतूक 29 जुलै 2017 चे दुपारी 12
ते 3 वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा
रोड- एमआयडीसी टर्निंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व
जलंब नाक्यापासून पुढे पर्यायी मार्गाने
वाहतूक वळविण्यात आली आहे. खामगांव ते
शेगाव रस्ता 30 जुलै 2017 चे सकाळी 4 ते दुपारी पालखी संपेपर्यंत खामगांव
बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव, खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगांवकडे
वाहतूक या पर्यायी मार्गाने राहणार आहे. खामगाव ते शेगाव रस्ता 12 तासापर्यंत
संपूर्ण वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 सह
कलम 36 अन्वये जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी ही अधिसूचना काढली आहे. या आदेशातून
सर्व शासकीय वाहने, सर्व अतिमहत्वाच्या/महत्वाच्या व्यक्तींची वाहने, तात्काळ
सेवेची रूग्णवाहिका, शववाहिनी, अग्नीशमन दलाची वाहने वच जिवनावश्यक वस्तूंची वाहने
वगळण्यात आली आहे, असे जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी कळविले आहे.
******
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा
स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाचे आज आयोजन
बुलडाणा,
दि. 24 - फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल
असोसिएशन मार्फत 17 वर्षांखालील खेळाडूंसाठी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा देशात आयेाजित
करण्यात येत आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत होणार आहे. स्पर्धेच्या
एकूण सामन्यांपैकी 6 सामने नवी मुंबई येथे डी. वाय पाटील स्टेडीयम येथे भरवण्यात
येत आहेत. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी,
यासाठी महाराष्ट्र फुटबॉल मिशन एक मिलीयन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्यानुसार
जिल्ह्यात या कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल
क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम व फुटबॉल सेल्फी पॉईंटच्या प्रमोशन कार्यक्रमाचे
आयोजन उद्या 25 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा क्रीडा संकूल, क्रीडा नगरी,
जांभरून रोड, बुलडाणा येथे करण्यात आले आहे.
********
जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
बुलडाणा, दि. 24 : लोकमान्य
बाळ गंगाधार टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त 23 जुलै 2017 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत
पुलकुंडवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तर उपस्थितांनी पुष्प
अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जिल्हा नियोजन
अधिकारी दिपक सिडाम, तहसीलदार श्री. शेळके आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment