नेहरु युवा केंद्रातर्फे राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रम
बुलडाणा, दि. 28 : नेहरु युवा केंद्रातर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांवतीने आणि ग्राम प्रशासन, स्थानिक युवा मंडळाच्या सहकार्याने दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी रन फॉर युनिटी - एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात युवक-युवती, सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकारी, नेहरु युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
000000
राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरीता अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 28 : जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे दि. 15 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातून अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवात राज्यस्तरीय आदिवासी पारंपारिक हस्तकला प्रदर्शन व विक्री, पारंपारिक खाद्य महोत्सव, पारंपारिक नृत्य स्पर्धा आणि लघुपट, माहितीपट आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधव व बचतगटानी मंगळवार, दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज करावा, तसेच उपक्रमासंबंधीत अधिक माहिती व आवेदन अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन, न्यू राधाकिसन प्लॉट, अग्रसेन भवन, अकोला येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
आदिवासी बांधव व आदिवासी बचतगटांनी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी (विकास) मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.
000000
सोमवारी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन
बुलडाणा, दि. 28 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने एकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा व नेहरु युवा केंद्राच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे करण्यात आले आहे.
यावेळी एकतेची शपथ घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी, विविध क्रीडा संघटनेचे खेळाडू, पदाधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आणि जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
00000
पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 28 : भारत निवडणूक आयोगाने दि. १ नोव्हेबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभाग पदवीधर मतदारयाद्यांचा नोंदणी कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे. यात पात्र होणाऱ्या पदवीधर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यालय प्रमुखांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. १ नोव्हेबर २०२२ रोजी पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन ३ वर्षे पूर्ण झालेल्या पदवीधारकांना मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनीस्त कार्यालयातील अर्हता प्राप्त अधिकारी, कर्मचारी यांना पदवीधर नोंदणी नमुना १८ परिपूर्ण भरून आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयातील संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे सादर करावे.
कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातील अर्हता प्राप्त अधिकारी, कर्मचारी पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment