Thursday, 20 October 2022

मंत्रिमंडळ बैठक : गुरुवार, दि. 20 ऑक्टोबर 2022

 

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)

 

मंत्रिमंडळ बैठक : गुरुवार, दि. 20 ऑक्टोबर 2022

एकूण निर्णय- 1

जलसंपदा विभाग

बुलडाणा जिल्ह्यातील दोन लघु पाटबंधारे प्रकल्पांसाठी

सुधारित मान्यता

 

बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  यामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.

अरकचेरी ही लघु पाटबंधारे योजना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा गावाजवळ अरकचेरी नाल्यावर बांधण्यात येत आहे.  या ठिकाणी १३.१०३ दलघमी साठवण क्षमतेचे माती धरणाचे बांधकाम सुरु आहे.  या प्रकल्पामुळे ८ गावातील ११६८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.  या प्रकल्पासाठी २७७.८५ कोटी इतक्या किंमतीची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता आज देण्यात आली. 

आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्प संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी गावाजवळ बांधण्यात येत आहे.  या ठिकाणी १०.७५४७ दलघमी क्षमतेचे माती धरणाचे बांधकाम सुरु आहे.  या प्रकल्पामुळे ४ गावातील ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी २०५.६१ कोटी इतक्या किंमतीची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.  

-----०-----

 

No comments:

Post a Comment