ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना
बुलडाणा, दि. 4 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादितकडून इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य तसेच देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाख रुपये आणि परदेशातील शिक्षणासाठी 20 लाख रुपये मर्यादेत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
या योजनेमध्ये उमेदवारांना बँकेत भरलेल्या व्याजाच्या 12 टक्केपर्यंत व्याज परतावा मिळणार आहे. याकरिता उमेदवाराचे वय हे 17 ते 30 वर्षे असावे, महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा पुरावा, इतर मागासवर्गीय असल्याचा जातीचा दाखला, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाख रूपयांपर्यंतचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत, बारावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा, उमेदवार आणि पालकांचे आधार कार्ड, फोटो, आधारकार्डशी संलग्न बँकेतील बचतखाते पासबुक, वयाचा पुरावा, शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत आवश्यक कागपदपत्रे सादर करावी लागणार आहे. ही योजना ऑनलाईन असून महामंडळाच्या www.msobcfdc.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावे लागणार आहे.
राज्य, देशांतर्गत तसेच परदेशी अभ्यासक्रमामध्ये येणारे अभ्यासक्रम आरोग्य विज्ञानमधील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम, अभियांत्रिकीमधील सर्व पदवी व पदव्युतर अभ्यासक्रम, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रमामधील कृषि, अन्न प्रक्रिया व पशू विज्ञान, दुग्ध विज्ञानमधील सर्व संबंधित अभ्यासक्रम यात समाविष्ट आहेत.
व्याज परतावा व परफेडीचा कालावधी हा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण हाईपर्यंत बँकेने वितरीत केलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याजाची नियमित परतफेड केलेल्या उमेदवाराला केवळ व्याजाचा परतावा महामंडळ उमेदवाराच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करेल. कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 5 वर्षे असेल. ज्या पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी महामंडळाच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावेत. अधिक माहिती करिता जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा, ता. जि. बुलडाणा, दुरध्वनी क्र. 07262-248285 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
सेवानिवृत्तांच्या मेळाव्यात शंकाचे निरसन
बुलडाणा, दि. 4 : राज्य शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या मेळाव्यात सेवानिवृत्तांच्या विविध शंकाचे निरसन करण्यात आले.
जिल्हा कोषागार कार्यालयाच्या प्रशिक्षण सभागृहात निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांच्या मेळावा सोमवारी, दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी पार पडला. या मेळाव्याला जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे, भारतीय स्टेट बँकेचे भरत शेळके, अमितकुमार आदी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये उपस्थितांना अपर कोषागार अधिकारी पंडीत मांडोगडे, देविदास पाबळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा निवृत्ती वेतनधारक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. पऱ्हाड यांनी निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या आणि अडचणी सांगितल्या. श्री. वाघमारे यांनी निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे निरासन केले. निवृत्ती वेतनधारकांकडून प्राप्त लेखी, तोंडी निवेदने स्विकारून त्यांचे निराकन केले.
उपकोषागार अधिकारी प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. गजानन हेलोडे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. चौधरी यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी जिल्हा निवृत्ती वेतनधारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment