ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
- 14 जुन रोजी मतदार यादी होणार प्रसिद्ध
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : माहे जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये
मुदत संपलेल्या, तसेच माहे मे 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला
आहे. त्यानुसार माहे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या
निवडणूकांसाठी 31 मे 2022 रोजी प्रसिद्ध मतदार यादी ग्राह्य धरावयाची आहे.
प्रभागनिहाय
प्रारूप मतदार यादी 14 जून 2022 रोजी
प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना असल्यास 14 ते
17 जून या कालावधीत दाखल करू शकणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 22 जून
रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माहे जानेवारी 21 ते सप्टेंबर 2022
या कालावधीत 13 ग्रामपंचायतीचा कालावधी संपुष्टात आला आहे. या ग्रामपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे तयार करून प्रभाग निहाय प्रारूप
मतदार यादी 14 जून रोजी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत
समिती कार्यालय व तहसिल कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या
मतदार यादीवर ज्या नागरिकांना हरकती व सुचना सादर करावयाच्या आहेत, त्यांनी 17 जून
पूर्वी तहसिलदार यांच्याकडे सादर कराव्यात. याबाबतची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी,
असे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
********
सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
- प्रथम फेरीकरीता 30 जूनपर्यंत अर्ज स्वीकारणार
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या
अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृहामध्ये सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश पुस्तकांची विक्री सुरू आहे. प्रथम फेरीकरीता
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 30 जून आहे. या वसतिगृहाची प्रवेश क्षमता 50
आहे. भोजन, निवास व सेवाकरासह सेवारत सैनिक, माजी सैनिक, सिवीलियनसाठी वेगवेगळे
आहे.
सेवारत
सैनिकांसाठी अधिकारी यांच्यासाठी 1 हजार रूपये, जेसीओकरीता 900 रू, शिपाई /
सीओजसाठी 700 रूपये आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी अधिकारी व ऑनररी रँककरीता 900
रूपये, जेसीओकरीता 800 व शिपाई / सीओजसाठी 600 रूपये आहे. तर युद्ध विधवा, माजी
सैनिक विधवा व माजी सैनिक अनाथ पाल्यांकरीता प्रवेश शुल्क नाही. सिवीलीयनमध्ये भोजन
निवास व सेवा करासह 2250 रूपये दर आहेत. प्रवेश शुल्का व्यतिरिक्त अनामत रक्कम
1000 रूपये आकारण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात
आलेले आहे. युद्ध विधवा, माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्य, माजी सैनिकांची
अनाथ पाल्या, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारी पाल्य, बीएड / डिएड, पदवी अभ्यासक्रम
गुणवत्ता यादीप्रमाणे, इयत्ता 12, 11 व 10 वी या क्रमाणे गुणवत्ता यादीनुसार, माजी
सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य आणि जागा उपलब्ध असल्यास
सिविलीयन पाल्य अशा प्राधान्यक्रमाने वसतिगृह प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक
माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथील 8459687388 क्रमांकावर संपर्क
साधावा, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री. पडघान यांनी केले आहे.
****
सैनिक मुलाचे वसतिगृह येथे विविध पदांसाठी अर्ज
आमंत्रित
- अंतिम
मुदत 9 जून
बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : सैनिक
मुलांचे वसतिगृह येथे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर एक वर्षासाठी रिक्त
पदांवर पदभरती करावयाची आहे. रिक्त पदांमध्ये सहाय्यक वसतीगृह अधिक्षकाचे एक पद
असून या पदाकरीता केवळ हवालदार व त्यावरील माजी सैनिकांसाठी आहे. स्वयंपाकीनची तीन
पदे रिक्त आहेत. यासाठी माजी सैनिकांच्या पत्नींना प्राधान्य असणार आहे.
सफाईवालाचे दोन पद असून त्याकरीता माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन पाहिजे. चौकीदाराचे
एक पद असून त्यासाठी माजी सैनिक किंवा सिवीलीयन पाहिजे. तरी इच्छूक माजी सैनिकांनी
व विधवा यांनी 9 जून 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज
सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
**********
आजादी का अमृत महोत्सव व जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल रॅली
बुलडाणा,(जिमाका) दि. 3 : आजादी का अमृत महोत्सव व जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने दि. 3 जून रोजी सायकल
रॅलीचे आयोजन शहरात करण्यात आले. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा
मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते
हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षक्षस्थानी जिल्हाधिकारी
एस. रामामुर्ती तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होत्या. तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. राजेद्र सांगळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री. राठोड, क्रीडा
अधिकारी रविंद्र धारपवार, क्रीडा प्रशिक्षक विजय वानखेडे, राजेश डिडोळकर, माजी
प्राचार्य प्रफुल मोहरील, डॉ. लता भोसले, निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ.यास्मीन चौधरी, प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या बी.के.उर्मीला,
क्रीडा प्रशिक्षक मनोज श्रीवास व प्रशांत सोनोने
उपस्थित होते.
या
प्रसंगी सायकलींगचा प्रचार करणारे, 13 देशांची सायकल यात्रा करणारे, काश्मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास नुकताच
केलेले जिल्हयाचे सायकलपटू संजय मयुरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला. या सायकल रॅलीची सुरुवात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून करण्यात आली.
रॅली जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, सोसायटी पेट्रोल पंप पासून सर्कुलर रोड, तेथून
चिंचोले चौक नंतर विश्राम भवना समोरुन परत जिजामाता क्रीडा संकुल येथे रॅलीचा
समारोप करण्यात आला. या रॅली मध्ये शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, बुलडाणा सायकल क्लब चे सर्व सभासद,
खेळाडू युवक युवती मोठया संख्येने सहभागी झाले होते.
तंबाखू
विरोधी शपथ डॉ.राजेंद्र सांगळे यांनी उपस्थितांना दिली. संचलन क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी तर
आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी
केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय चाफेकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक गणेश
सुर्यवंशी, उमेश बावस्कर, नितीन शेळके, अजय सपकाळ, विलास सोनोने, गणेश डोंगरदिवे
आदींनी प्रयत्न केले.
******
जून महिन्याच्या ई लोकशाही दिनाचे 6 जून रोजी
आयोजन
• मोबाईल क्रमांक 9823465599 वर ऑनलाईन तक्रारी
कराव्यात
• व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार
संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि. 3:
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी
कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय
अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास
पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. जून महिन्याचा लोकशाही दिन ई-
लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवार दि. 6 जून रोजी या लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन
पद्धतीने 9823465599 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ फाईल तयार करून तक्रारी
द्याव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची
आवश्यकता नाही. तक्रारदारांना दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून
संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे
त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही
दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो.
तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर
करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन
वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल,
सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या
कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील,
लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार
नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात
येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले
आहे.
No comments:
Post a Comment