अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन
- विहीत नमुन्यातील आवेदन पत्रे इच्छूकांनी 30 जुलै पर्यंत सादर करावे
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धासाठी खालील नमुद, विवीध खेळ प्रकाराकरीता महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविले जातात. राज्य शासनाकडून, सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे.
त्यामुळे आपल्या विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी दि. 15 जुलै 2022 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधावा. येथून विहीत नमुण्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेवून, 25 जुलै पर्यंत आवेदन पत्र कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने, आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे सादर करण्यात यावे. तसेच व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई – 400032 यांचेकडे 30 जुलै पर्यंत टपालाद्वारे, व्यक्तीश: किंचा ईमेलद्वारे पाठविण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
रोजगार मेळावा उत्साहात; 150 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची नोंदणी
बुलडाणा, (जिमाका) दि. 1 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा, परम ट्रेनिंग स्किल्स प्रा.लि. औरंगाबाद आणि स्किल पॅरामेडीकल कॉलेज बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 31 मे रोजी स्किल पॅरामेडीकल कॉलेज येथे पार पडला. मेळाव्याच्या उदघाटनीय कार्यक्रमासाठी स्किल पॅरामेडीकल कॉलेजचे संचालक सचिन सुपे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर, परम ट्रेनिंग स्किल्सचे मॅनेजर दिलीप सोनवणे, महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे गणेश राठोड, बजाज इलेक्ट्रिकल्सच्या श्रीमती जयश्री सुपे आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी 150 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती उपस्थित उमेदवारांना दिली. दिलीप सोनवणे यांनी कंपनीविषयी भरती प्रक्रिया, कामाचे स्वरूप, वेतन व भत्ते इत्यादींबाबत उमेदवारांना माहिती दिली. गणेश राठोड यांनी सांगितले, की उमेदवारांनी सुरुवातीला वेतन न पाहता स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने काम केले पाहिजे. आपण जर निरंतर काम केले तर भविष्यामध्ये कंपनीत कायम होण्याचे संधी आहेत. कंपन्यांमध्ये दर सहा महिन्यांमध्ये आपले काम पाहून वेतनवाढ देण्यात येते. कंपन्यांमध्ये 50 किलोमीटरच्या मर्यादेमध्ये कंपनीमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर म्हणाल्या, उमेदवारांनी कुठेतरी सुरुवात करण्याची आवश्यकता आहे. कामाला सुरुवात केली तर हळूहळू कामाचा अनुभव वाढतो, कामाचे कौशल्य आत्मसात होतात आणि त्याच्या बळावर भविष्यामध्ये कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मेळाव्याला महात्मा गांधी नॅशनल फेलो कु.शिवानी तावडे, कौशल्य विकास अधिकारी प्रमोद खोडे आदी उपस्थित होते. सदर मेळाव्यासाठी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक युवक व युवती मोठया संख्येंने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment