जिल्ह्यात इयत्ता 12 वी मध्ये 30 हजार 837 विद्यार्थी उत्तीर्ण
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : जिल्ह्यात इयत्ता 12 वी साठी मार्च 2021 मध्ये परीक्षेसाठी 30 हजार 997 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 17 हजार 138 मुले , तर 13 हजार 859 मुली होत्या. ही सर्व विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी पुर्नपरीक्षार्थीसह 17 हजार 26 मुले व 13 हजार 811 मुली असे एकूण 30 हजार 837 विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. मुलांची उत्तीर्ण झाल्याची सरासरी ही 99.34 टक्के व मुलींची सरासरी ही 99.65 टक्के आहे. जिल्ह्याची एकूण टक्केवारी 99.87 टक्के आहे.
तालुकानिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी, परीक्षेस बसलेले विद्यार्थी, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व टक्केवारी पुढीलप्रमाणे : बुलडाणा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2280, मुली 1737 एकूण 4017, परीक्षेस बसलेले मुले 2280, मुली 1737, एकूण 4017, उत्तीर्ण झालेले मुले 2256, मुली 1734, एकूण 3990, टक्केवारी 99.32 टक्के. चिखली : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 2256, मुली 1581 एकूण 3837, परीक्षेस बसलेले मुले 2256, मुली 1581, एकूण 3837, उत्तीर्ण झालेले मुले 2242, मुली 1574, एकूण 3816, टक्केवारी 99.45 टक्के. दे. राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 712, मुली 594 एकूण 1306, परीक्षेस बसलेले मुले 712, मुली 594, एकूण 1306, उत्तीर्ण झालेले मुले 710, मुली 593, एकूण 1303, टक्केवारी 99.77 टक्के. सिं.राजा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1800, मुली 1184, एकूण 2984, परीक्षेस बसलेले मुले 1800, मुली 1184, एकूण 2984, उत्तीर्ण झालेले मुले 1781, मुली 1170, एकूण 2951, टक्केवारी 98.89 टक्के. लोणार: नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1035, मुली 769 एकूण 1804, परीक्षेस बसलेले मुले 1035, मुली 769, एकूण 1804, उत्तीर्ण झालेले मुले 1031, मुली 764, एकूण 1795, टक्केवारी 99.50 टक्के. मेहकर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1462, मुली 1227 एकूण 2689, परीक्षेस बसलेले मुले 1462, मुली 1227, एकूण 2689, उत्तीर्ण झालेले मुले 1455, मुली 1225, एकूण 2680, टक्केवारी 99.50 टक्के. खामगांव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1791, मुली 1733, एकूण 3524, परीक्षेस बसलेले मुले 1791, मुली 1733, एकूण 3524, उत्तीर्ण झालेले मुले 1782, मुली 1728, एकूण 3510, टक्केवारी 99.53 टक्के. शेगांव : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 829, मुली 901 एकूण 1730, परीक्षेस बसलेले मुले 829, मुली 901, एकूण 1730, उत्तीर्ण झालेले मुले 822, मुली 900, एकूण 1722, टक्केवारी 99.53 टक्के. संग्रामपूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 674, मुली 622, एकूण 1296, परीक्षेस बसलेले मुले 674, मुली 622, एकूण 1296, उत्तीर्ण झालेले मुले 670, मुली 619, एकूण 1289, टक्केवारी 99.45 टक्के. जळगांव जामोद : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 830, मुली 797 एकूण 1627, परीक्षेस बसलेले मुले 830, मुली 797, एकूण 1627, उत्तीर्ण झालेले मुले 825, मुली 797, एकूण 1622, टक्केवारी 99.69 टक्के. नांदुरा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 732, मुली 860 एकूण 1592, परीक्षेस बसलेले मुले 732, मुली 860, एकूण 1592, उत्तीर्ण झालेले मुले 728, मुली 859, एकूण 1587, टक्केवारी 99.68 टक्के. मलकापूर : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 1221, मुली 1069 एकूण 2290, परीक्षेस बसलेले मुले 1221, मुली 1069, एकूण 2290, उत्तीर्ण झालेले मुले 1215, मुली 1069, एकूण 2284, टक्केवारी 99.73 टक्के. मोताळा : नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 876, मुली 623 एकूण 1499, परीक्षेस बसलेले मुले 876, मुली 623, एकूण 1499, उत्तीर्ण झालेले मुले 869, मुली 618, एकूण 1487, टक्केवारी 99.19 टक्के. अशाप्रकारे एकूण नोंदणी झालेले विद्यार्थी मुले 16498, मुली 13697 एकूण 30195, परीक्षेस बसलेले मुले 16498, मुली 13697, एकूण 30195, उत्तीर्ण झालेले मुले 16386, मुली 13650, एकूण 30036, टक्केवारी मुले 99.32, मुली 99.65 एकूण 99.74 टक्के.
पुर्नपरीक्षार्थीमध्ये जिल्ह्यात नोंदणी झालेले एकूण मुले 640, मुली 162 एकूण 802 विद्यार्थी होते. त्यापैकी परीक्षेस बसलेले मुले 640, मुली 162 एकूण 802 होते. यामधून उत्तीर्ण झालेले मुले 640, मुली 161 असे एकूण 801 आहेत. त्यांची टक्केवारी मुले 100, मुली 99.38 असे एकूण 99.87 टक्केआहे.
****
भोटा येथील संपादीत जमिनीचा मोबदला वाटप सुरू
बुलडाणा,(जिमाका) दि.3 : भूसंपादन प्रकरण क्रमांक 16/2008.09 मौजे भोटा ता. नांदुरा नुसार जिगांव प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या भोटा येथील जमिनीचा अंतिम निवाडा झाला आहे. निवाड्यानुसार संपादीत जमिनीचा मोबदला वाटप 3 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2021 पर्यंत उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मध्यम प्रकल्प) भिकाजी घुगे यांच्या कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. दररोज 60 जमिन मालकांना मोबदला वाटपाच्या नोटीसेस बजावण्यात आलेल्या आहेत, असे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी कळविले आहे.
*****
|
|
बुलडाणा,(जिमाका) दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
शहीद जवान कैलास पवार यांच्यावर 4 ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बुलडाणा,(जिमाका) दि.3: युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट वरून लिंक सोबत परत येत असताना अचानक मध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. त्यांना जबर मार लागल्यामुळे गतप्राण होवून शहीद झाले. द्रास सेक्टर जगामध्ये अति कमी तापमान असलेले ठिकाण असून येथे वजा 10 ते 20 डिग्री से. तापमान असते. तसेच ऑक्सिजनचे प्रमाणही कमी असल्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यूच्या घटना घडतात.
शहीद जवान कैलास पवार यांचे पार्थिव 2 ऑगस्ट 2021 रोजी लेह येथून दिल्ली येथे तर 3 ऑगस्ट रोजी दिल्ली येथून मुंबई, मुंबई येथून औरंगाबाद येथे दुपारी 12.30 वाजता विमानाने आणण्यात आले. एअर फोर्स स्टेशन औरंगाबाद येथे स्टेशन कमांडर, जिल्हाधिकारी व अतिरिक्त आयुक्त यांनी शहीदाच्या पार्थिवास मानवंदना दिली. नंतर पार्थिव शरीर मिल्ट्री हॉस्पीटल, औरंगाबाद येथे ठेवण्यात आले. तरी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता शहीद जवानाचे पार्थिव शरीर औरंगाबाद येथून जवानाचे राहते घर गजानन नगर, चिखलीकडे रवाना होणार आहे. चिखली येथे 4 ऑगस्ट रोजी शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी कळविले आहे.
****
निर्बंधामध्ये शिथीलता; सोमवार ते शुक्रवार दुकाने रात्री 8 पर्यंत सुरू
*शनिवारी दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत, धार्मिक स्थळे बंद
*अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने रविवारी बंद
बुलडाणा, (जिमाका) दि. 3 : जिल्ह्यात 26 जुन 2021 च्या आदेशानुसार 28 जुन पासून श्रेणी 3 मध्ये असलेले निर्बंध लरागू करण्यात आले आहे. तसेच 2 ऑगस्ट च्या आदेशानुसार जिल्ह्यात सुधारीत निर्बंध लागू करणेबाबत निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आधीच्या निर्बंधात शिथीलता आणून नविन निर्बंध 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपासून ते पुढील आदेशापर्यंत जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.
या आदेशानुसार सर्व प्रकारची जीवनावश्यक च जिवनावश्यक वस्तुंशी संबंधित दुकाने/ आस्थापना तसेच सर्व प्रकारची बिगर जिवनावश्यक सेवा अंतर्गत येत असलेली दुकाने, आसथापना, शॉपिंग मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहतील. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंतच सुरू असतील. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी अत्यावश्यक सेवेची वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहतील. व्यायाम, वॉकिंग, जॉगिंग, सायकलींगसाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक बगीचे, खेळाची मैदाने सुरू राहतील. सर्व प्रकारची शासकीय व खाजगी कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्या कार्यालयांना वर्क फ्रॉम होमची सुविधा आहे, त्यांना सदर सुविधा सुरू ठेवता येतील. सर्व प्रकारची कृषी विषयक कामे, नागरी कामे, औद्योगिक कामे, मालाची वाहतूक पुर्ण क्षमतेने सुरू राहील. वातानूकुलीत सेवा वगळून व्यायामशाळा, योगा केंद्र, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा आदी एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू व रविवारी बंद राहतील. चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मल्टीप्लेक्सेस (स्वतंत्र आणि मॉल्सच्या आतील) सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. राज्य शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण विभागांचे आदेश शाळा व महाविद्यालयांसाठी लागू राहतील. सर्व प्रकारचे रेस्टॉरंट एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत तसेच शनिवार व रविवार या दिवशी केवळ पार्सल / टेक अवे व घरपोच सेवा सुरू राहील. रात्री 9* ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता हालचालींना निर्बंध राहतील. गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस समारंभ, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक, प्रचार, मिरवणूका, निर्दशने, मोर्चे आदींवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. लोकांनी सर्व ठिकाणी आवश्यक सामाजिक अंतर, पाळण्यासोबतच कोवीड प्रतिबंधातूमक वर्तणूक व कोवीड त्रिसुत्रीचा काटेकोरपणे अवलंब (मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन, सॉनिटायजर किंवा हॅडवॉशने हाताची नियमित स्वच्छता) प्रत्येक नागरिकास बंधनकारक राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणारी व्यक्ती,संस्था,संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिका-यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे
***
--
Comments
Post a Comment