कोरोना अलर्ट : प्राप्त 1851 कोरोना अहवाल
'निगेटिव्ह'; तर 03 पॉझिटिव्ह
• 20 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका) दि. 14 :
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या
अहवालांपैकी एकूण 1854 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1851 अहवाल कोरोना
निगेटिव्ह असून 03 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 314 तर रॅपिड टेस्टमधील 1537 अहवालांचा समावेश आहे.
अशाप्रकारे 1851 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह
आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली तालुका : मंगरूळ 1, संग्रामपूर तालुका : पिंप्री
1, परजिल्हा : वरूड ता. जाफ्राबाद जि. जालना 1
संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 03 रूग्ण आढळले
आहे.
तसेच आज 20 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आजपर्यंत 665039 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86640 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86640 आहे.
आज
रोजी 1440 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल
665039आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87354 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86640
कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे
सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 42 सक्रीय रूग्ण
उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******
शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू
कडू आज जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : जलसंपदा
व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण
विभाग व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 15 ऑगस्ट
रोजी दुपारी 1 वाजता अकोला येथून मोटारीने शेगांवकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता शेगांव
येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील,
व्यवस्थापकीय विश्वस्त, श्री. गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर
भेट, सोयीनुसार शेगांव येथून आकोटमार्गे अचलपूर जि. अमरावतीकडे प्रयाण करतील.
********
No comments:
Post a Comment