Tuesday, 24 August 2021

DIO BULDANA NEWS 24.8.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 19 सक्रीय रूग्ण;आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

  • 08 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :   जिल्ह्यात कोरोना विषाणूने पुर्णपणे माघार घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज चौथ्यांदा नवीन संसर्गीत रूग्णाने शून्य गाठला आहे.  जिल्हावासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 19 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2151 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 2151 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 478 तर रॅपिड टेस्टमधील 1673 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2151 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    तसेच आज 08 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 680061 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86681 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86681 आहे.  आज रोजी 1379 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 680061 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86681 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

******

                  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनांचे बँकांना उद्दिष्ट वाटप

  • आर्थिक वर्ष 2021-22 करीता 1500 लक्षांक
  • लक्षांक नसल्याचे कारण देवून बँकांनी कर्ज देण्यापासून लाभार्थ्याला वंचित ठेवू नये                                                                                                                                                      

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनातंर्गत आर्थिक वर्ष 2021-22 वर्षाकरीता बँकांना लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर लक्षांक 1500 प्रकरणांचा असून बँकांना शाखानिहाय देण्यात आला आहे. देण्यात आलेला लक्षांक हा कमीत कमी कर्ज प्रकरणांचा आहे. महामंडळाच्या योजनातंर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेकडून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा करण्यासाठी महामंडळ तत्पर आहे. मात्र बँकांनी कोणत्याही लाभार्थ्याला बँकेमार्फत लक्षांक नाही किंवा लक्षांक संपुष्टात आला आहे, असे कारणे देवून कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी कळविले आहे.

महामंडळाचे बँक निहाय कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

अलाहाबाद बँक : 8 कर्ज प्रकरणे, आंध्रा बँक : 8, बँक ऑफ बडोदा: 1, बँक ऑफ इंडिया : 14, बँक ऑफ महाराष्ट्र : 148, कॅनरा बँक : 30, सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 100, देना बँक : 5, आयडीबीआय बँक : 50, इंडियन ओव्हरसिस बँक : 20, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स : 10, पंजाब नॅशनल बँक : 10, स्टेट बँक ऑफ इंडिया : 300, सिंडीकेट बँक ऑफ इंडिया : 8, युको बँक : 8, युनीयन बँक ऑफ इंडिया : 30, विदर्भ कोकण ग्रामीण बँक : 100, एक्सिस बँक : 50, एचडीएफसी बँक : 50, आयसीआयसीआय बँक : 50, बीडीसीसी बँक : 100, अनुराधा चिखली को- ऑप बँक : 100, द चिखली अर्बन को- ऑप बँक : 300.  अशाप्रकारे 1500 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

******

एसटी च्या रातराणी सेवेत आणखी बससेवेची भर

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : एस टी महामंडळाची रातराणी बस सेवा कोविड मुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा 20 ऑगस्ट 2021 पासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या रातराणी बससेवेमध्ये आणखी सेवांची भर पडली आहेत. या बससेवांचे ऑनलाईन आरक्षण https://msrtc.maharashtra.gov.in संकेतस्थळावर व मोबाईलचे एमएसआरटीसी मोबाईल रिजर्वेशन ॲपद्वारे करता येणार आहे.

  रातराणी बस सेवेमध्ये बुलडाणा ते नागपूर रात्री 9 वाजता, चिखली ते मुंबई सायं 6.15 वाजता, चिखली ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं 6.30 वाजता,  बुलडाणा ते पुणे रात्री 9. 15 वा, मेहकर ते पुणे रात्री 7.30 वा, मलकापूर ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं 6.45 वाजता आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत महामंडळ जलद, वातानुकूलित शिवशाही आदी सेवेद्वारे प्रवाशी वाहतूक करीत आहे. तरी या रातराणी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 

******

 

No comments:

Post a Comment