Monday, 23 August 2021

DIO BULDANA NEWS 23.8.2021

 

                       अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा

·         अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

            बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसाय धारक, अन्न पदार्थ साठविणारे गोदाम, चिकन / मटन / मासे व इतर मांस विक्रेते, हातगाडीवर चहा / नास्ता, पाणी पुरी, भेळपूरी, अंडा आमलेट, फरसाण, फळे व भाजीपाला विक्रेते व इतर खाद्य अन्न पदार्थ विक्रेते, भाजी मंडईत असणारे विक्रेते आदींनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा.

   तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते, वखार महामंडळ, दुध संकलन केंद्र, घरोघरी दुध चालणारे विक्रेते, हातगाडीवर आईस्क्रीम व थंडपेय, पॉपकॉर्न, खवा / मावा विक्रेते तसेच इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करून परवाना व नोंदणी प्राप्त करून घ्यावी. त्यासाठी सेतू किंवा सीएससी केंद्र यांची मदत घेतल्या जावू शकते. अथवा स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते. तरी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी सदर सुविधेचा लाभ घेवून परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 663 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

  • 03 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 663 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 448 तर रॅपिड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 663 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा तालुका : देऊळघाट 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच आज 03 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 677910 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86673 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86673 आहे.  आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 677910 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86673 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment