रब्बी हंगामामध्ये खरेदी केलल्या
भरडधान्याचे जिल्ह्यातच होणार वितरण
- सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत
होणार वितरण
- माहे सप्टेंबर करीता
धान्य पासिंगचे परिमाण केले निश्चित
बुलडाणा, (जिमाका) दि. 26
: रब्बी
पणन हंगाम 2021 मध्ये किमान आधारभूत योजनेतंर्गत खरेदी करण्यात आलेल्या मका,
ज्वारी या भरड धान्याचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार खरेदी झालेल्या भरडधान्य
तसेच गव्हाचे माहे सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत
वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार माहे सप्टेंबर करीता धान्य पासिंगचे परिमाण
निश्चित करण्यात आले आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजना अंतर्गत तालुकानिहाय
धान्याचे परिमाण निश्चित केले आहे.
अंत्योदय
योजनेनुसार गहू, मका व ज्वारी धान्य प्रतिकार्ड 21 किलो व तांदुळ 14 किलो
प्रतिकार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यानुसार गहू, गहू ऐवजी मका, गहू ऐवजी
ज्वारी प्रति कार्ड वाटपाचे परिमाण वेगवेगळे असणार आहे. मात्र संपूर्ण धान्य 21
किलो पर्यंत राहणार आहे. तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेनुसारसुद्धा तालुकानिहाय
वेगवेगळे वाटपाचे परिमाण असणारआहे. प्राधान्य
कुटूंब योजनेनुसार गहू, मका व ज्वारी धान्य प्रति व्यक्ती 3 किलो व तांदुळ प्रति
व्यक्ती 2 किलो आणि शेतकरी लाथार्भीसाठी गहू 4 किलो प्रति व्यक्ती व तांदुळ प्रति
व्यक्ती 1 किलो प्रमाणे वितरण होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले
आहे.
*****
पोलीस
स्टेशनमधील वाहनांचा 15 मालकांनी मालकी हक्क दाखविला
- उर्वरित वाहन मालकांनी मालकी हक्क दाखविण्याचे जिल्हा
पोलीस दलाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि. 26 : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस
स्थितीत मिळून आलेले 177 दुचाकी वाहने जप्त करून सर्व बेवारस वाहने पोलीस मुख्यालय,
बुलडाणा येथील आवारात ठेवण्यात आली होती. त्या सर्व बेवारस वाहनांची निर्गती करणे
असल्याने जप्त करण्यात आलेल्या वाहनावर वाहनांचे कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क दाखविण्याचे
आवाहन करण्यात आले होते. त्यापैकी 15 वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे मूळ
कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविला. त्यामुळे याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून 25
ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड
यांच्याहस्ते सदर बेवारस वाहने त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधिक्षक
अरविंद चावरीया व अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी, सपोनि शांतीकुमार
पाटील, अभय पवार, यांनी सदर बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला. तरी ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले
बाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचे www.buldhanapolice.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांचे यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन
सहायक पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांनी
केले आहे.
******
कोरोना अलर्ट : प्राप्त
1594 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह
• 02 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 26
: प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी
एकूण 1596 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1594 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02
अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील
2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह
अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 364 तर रॅपिड टेस्टमधील 1230 अहवालांचा समावेश आहे.
अशाप्रकारे 1594 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे.राजा तालुका : सावखेड भोई 1, बुलडाणा शहर :
1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 683754 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 86686 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे
त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी
देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या
86686 आहे. आज रोजी 1594 नमुने
कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 683754 आहेत.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 87382 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86686 कोरोनाबाधीत
रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी
देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 24 सक्रीय रूग्ण उपचार
घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment