Monday, 30 August 2021

DIO BULDANA NEWS 30.8.2021

 कोरोना अलर्ट : प्राप्त 772 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 20 पॉझिटिव्ह                                                                                        • 05 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपीड अँटीजेन चाचणीमधील 13  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 482  तर रॅपिड टेस्टमधील 290 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 772 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दगडवाडी 1, चिखली तालुका : केळवद 1, पेठ 1, चिंचखेड 1, कोलारा 1, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, सिं. राजा तालुका : आंचली 1, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 6, वाडी वाघोली 1,  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 20 रूग्ण आढळले आहे.                                                                                    

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 689428 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86696 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86696 आहे.  आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 689428 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87413 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86696 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

                                                            ***********

अंढेरा तलाव पाच वर्षासाठी लिलावाद्वारे मासेमारीकरीता ठेक्याने देणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे विभागाचा 31 हेक्टर क्षेत्रफळाचा अंढेरा तलाव ता. दे. राजा सन 2021-22 ते सन 2025-26 पर्यंतचे पाच वर्षाचे कालावधीसाठी मासेमारीकरीता ठेक्याने देण्यात येणार आहे. यासाठी शासन निर्णय 3 जुलै 2019 मधील अटी, शर्तीचे अधिन राहून जाहीर लिलाव पद्धत अंवलबण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था / संघ यांच्याकडून जाहीर लिलाव पद्धतीने देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

   अंढेरा तलावासाठी 10 हजार 980 रूपये बयाणा रक्कमेचा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), बुलडाणा यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेची दर्शनी हुंडी (डिडी) सादर करणे आवश्यक आहे. बोली मध्ये भाग घेणाऱ्या इच्छुक संस्थेच्या बँक खात्यावर संबंधित तलावाची न्युनतम तलाव ठेका रक्कमेएवढी शिल्लक दर्शविणारे बँकेचे प्रमाणित केलेले स्टेटमेंट किंवा पासबुकाची प्रत सादर करावी. इच्छुक संस्था सद्यस्थितीत कार्यरत असलेबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांचे प्रमाणपत्र व संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे गत तीन वर्षाचे लेखापरीक्षण व सनदी अथवा प्रमाणीत लेखा पालाकडून प्रमाणीत केलेला ताळेबंद सादर करावा. संस्थेचे लेखा परीक्षण वर्ग हा किमान क वर्ग असावा. संस्था ही मत्स्यव्यवसाय विभागाची थकबाकीदार नसावी.

    जाहीर बोली लिलाव संच प्राप्त करण्याचा कालावधी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. लिलाव संच दाखल करण्याचे अंतिम तारिख 17 सप्टेंबर 2021 रोजी सायं 5 वाजेपर्यंत आहे. लिलाव पूर्व बैठकीची तारीख ही 24 सप्टेंबर 2021  असून जाहीर लिलाव हा 27 सप्टेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, बस स्थानकासमोर, बुलडाणा आहे. अधिक माहितीसाठी 07262- 242254 क्रमांकावर संपर्क साधावा.  लिलाव बाबत किंवा कार्यालयीन प्रक्रियेबाबत काही वाद निर्माण झाल्यास सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.  जलाशय / तलाव ठेका अनामत रक्कम ही बोलीने निर्धारीत केलेल्या जलाशय तालव ठेका रक्कमेच्या अथवा निवीदेद्वारे निश्चित केलेल्या ठेका रक्कमेच्या 20 टक्के राहणार आहे. तरी सदर तलाव मासेमारी ठेक्याने देण्यासाठी जिल्ह्यातील मस्त्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तसेच मत्स्यकास्तकार यांनी 27 सप्टेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर, बुलडाणा येथे दाखल करावे, असे आवाहन सहायक आयुक्त स. इ नायकवडी यांनी केले आहे.   

Sunday, 29 August 2021

DIO BULDANA NEWS 29.8.21

 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा बुलडाण्यात उभारणार


-    आमदार संजय गायकवाड

  • राष्ट्रीय क्रीडा दिन थाटात साजरा
  • ओपन जिमचे लोकार्पण, आंतरराष्ट्रीय –राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

बुलडाणा,(जिमाका) दि.29 : जिल्हयात आर्चरी या खेळाची कुठलीही आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा उपलब्ध नसताना बुलडाणा येथील धनुर्धर खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. येत्या 2024 च्या ऑलपिंक स्पर्धेत आर्चरीसह अन्य खेळांमध्ये पदके प्राप्त करण्यासाठी बुलडाण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यात येतील. त्यासाठी क्रीडा विभागास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिल्या जाईल, असे प्रतीपादन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले. हॉकीचे जादुगार स्व मेजर ध्यानचंद यांचे जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, बुलडाणा येथे आज करण्यात आले. त्यावेळी ते बालत होते. 

    याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. बुलडाणा शहरात भविष्यात आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज, तालुका क्रीडा संकुलाची उभारणी, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, कुस्ती हॉल, मॅट्स, कव्हर, मल्टीपर्पज हॉल, वातानुकूलीत हॉल, संकुलामध्ये येण्यासाठी चांगला रस्ता निर्माण करण्यात येईल, असेही यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यावेळी म्हणाले, कोणताही एक खेळ निश्चित करून त्या खेळासाठी तण, मन व धनाने खेळाडूंनी प्रयत्न करावे. निश्चित केलेल्या खेळामध्ये करीअर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील रहावे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने यावेळी ओपन जिमचे पुजन व फित कापून मान्यवरांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले.

  सर्वप्रथम स्व. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलन करण्यात आले.  तसेच यावेळी सन 2020- 21 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रतिक सुभाष जोहरी व संस्थेमध्से कृषीसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन, बुलडाणा यांना प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह तथा बक्षीसाचा धनादेश देण्यात आला. नुकत्याच पोलंड येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ युवा चॅम्पीयनशिपमध्ये सुवर्ण पदक प्राप्त खेळाडू मिहीर नितीन अपार व सहभागी खेळाडू प्रथमेश समाधान जवकार, मार्गदर्शक चंद्रकांत इलग यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हयातील विविध क्रीडा स्पर्धा तथा एकविध क्रीडा संघटनेच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग तथा प्राविण्य प्राप्त केलल्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आलेृ त्यामध्ये पवन पातोडे, कु. साक्षी हिवाळे, वैष्णवी पवार, भुषण सिरसाट, सुहास राऊत, शिवम भोसले, वैभव सोनोने, पंकज शेळके, प्रसाद रनाळकर, प्रेम बावस्कर, चेतन गवळी, ऋषीकेश जांभळे, सागर उबाळे, गौरी राठोड आदींचा समावेश आहे. तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई यांच्या नवमहाराष्ट्र अभियान अंतर्गत युवा सामाजिक पुरस्कार म्हणून जिल्हयातील एकमेव डॉ. गायत्री सावजी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.      

    संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, डॉ मनोज व्यवहारे, प्रा. कैलास पवार, प्रा. बाबाराव सांगळे, धर्मवीर आखाडा अध्यक्ष कुणाल गायकवाड, रवि पाटील, ॲड साखरे, विजय वानखेडे, राजेश डिडोळकर, औषध निरीक्षक गजानन घिरके, संदीप पाटील, ॲड दळवी, समधान जवकार, भरत ओळेकर, अंकुश बोराडे, नितीन अपार, संतोष शिंदे, दगडू सरकटे, डिगांबर पाटील, विठ्ठल इंगळे, गणेश जाधव, प्रविण चिम, सागर उबाळे, मोहम्मद इद्रीस, समाधान टेकाळे, शारिरीक शिक्षण शिक्षक, एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी बी. आर जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, जिल्हा संघटक सौ. मनीषा ढोके, वरिष्ठ लिपीक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले

Thursday, 26 August 2021

DIO BULDANA NEWS 26.8.2021

 

रब्बी हंगामामध्ये खरेदी केलल्या भरडधान्याचे जिल्ह्यातच होणार वितरण

  • सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणार वितरण
  • माहे सप्टेंबर करीता धान्य पासिंगचे परिमाण केले निश्चित

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : रब्बी पणन हंगाम 2021 मध्ये किमान आधारभूत योजनेतंर्गत खरेदी करण्यात आलेल्या मका, ज्वारी या भरड धान्याचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार खरेदी झालेल्या भरडधान्य तसेच गव्हाचे माहे सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणार आहे. त्यानुसार माहे सप्टेंबर करीता धान्य पासिंगचे परिमाण निश्चित करण्यात आले आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब योजना अंतर्गत तालुकानिहाय धान्याचे परिमाण निश्चित केले आहे.

   अंत्योदय योजनेनुसार गहू, मका व ज्वारी धान्य प्रतिकार्ड 21 किलो व तांदुळ 14 किलो प्रतिकार्ड देण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यानुसार गहू, गहू ऐवजी मका, गहू ऐवजी ज्वारी प्रति कार्ड वाटपाचे परिमाण वेगवेगळे असणार आहे. मात्र संपूर्ण धान्य 21 किलो पर्यंत राहणार आहे. तसेच प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेनुसारसुद्धा तालुकानिहाय वेगवेगळे वाटपाचे परिमाण असणारआहे.  प्राधान्य कुटूंब योजनेनुसार गहू, मका व ज्वारी धान्य प्रति व्यक्ती 3 किलो व तांदुळ प्रति व्यक्ती 2 किलो आणि शेतकरी लाथार्भीसाठी गहू 4 किलो प्रति व्यक्ती व तांदुळ प्रति व्यक्ती 1 किलो प्रमाणे वितरण होणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                                    *****

पोलीस स्टेशनमधील वाहनांचा 15 मालकांनी मालकी हक्क दाखविला

  • उर्वरित वाहन मालकांनी मालकी हक्क दाखविण्याचे जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि. 26 : जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला बेवारस स्थितीत मिळून आलेले 177 दुचाकी वाहने जप्त करून सर्व बेवारस वाहने पोलीस मुख्यालय, बुलडाणा येथील आवारात ठेवण्यात आली होती. त्या सर्व बेवारस वाहनांची निर्गती करणे असल्याने जप्त करण्यात आलेल्या वाहनावर वाहनांचे कागदपत्रे आणून आपला मालकी हक्क दाखविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यापैकी 15 वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांचे मूळ कागदपत्रे आणून मालकी हक्क दाखविला. त्यामुळे याबाबतची सर्व कार्यवाही पूर्ण करून 25 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड यांच्याहस्ते सदर बेवारस वाहने त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली.  

    जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया व अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी, सपोनि शांतीकुमार पाटील, अभय पवार, यांनी सदर बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेतला.  तरी ज्या नागरिकांचे वाहन चोरी झालेले, हरविलेले बाबत तक्रारी असल्यास त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाचे www.buldhanapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध आलेल्या वाहनांचे यादीची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील  यांनी केले आहे.

******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1594 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह                                                                                        • 02 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1596 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1594 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 364 तर रॅपिड टेस्टमधील 1230 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1594 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा तालुका : सावखेड भोई 1, बुलडाणा शहर : 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे.  तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 683754 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86686 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86686 आहे.  आज रोजी 1594 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 683754 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87382 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86686 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 24 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Wednesday, 25 August 2021

DIO BULDANA NEWS 25.8.2021

 

                     प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया सुरू होणार

  • महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे
  • 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान चालणार अर्जप्रक्रिया

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी.

   शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट ते दि.10 सप्टेंबर,2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम जिल्ह्यामध्ये कडधान्य हरभरा, पौष्टीक तृणधान्य, गळीत धान्य यासाठी राबविण्यात येणार आहे.

   जिल्ह्यात हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रूपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रूपये प्रती किलो, संकरीत मका 95 रूपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रूपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रूपये प्रती किलो, एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार  2 हजार ते 4 हजार रूपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कळविले आहे.

*******

       आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे बँक खात्यात जमा

  • गहू, ज्वारी, हरभरा व मका खरेदीचे चुकारे
  • 24 ऑगस्ट रोजी पोर्टलद्वारे केले जमा

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 :  जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत राज्य शासनाच्यावतीने हमी दराने मका, ज्वारी व गहू शेतमालाची खरेदी करण्यात आली होती. त्यामध्ये आतापर्यंत 193 शेतकऱ्यांकडून 8647.90 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. या खरेदीपोटी शेतकऱ्यांचे 1 कोटी 58 लक्ष रूपयांचे चुकारे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 1778 शेतकऱ्यांकडून 31691.39 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली. या खरेदीपाटी देय असलेली 8 कोटी 26 लक्ष रूपये आणि 20 शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या 486.25 क्विंटल खरेदी गहू खरेदी केलेली आहे.

    या खरेदीपोटी 12 लक्ष 73 हजार रूपये वितरीत करण्यात आले आहे. मका, ज्वारी व हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे ऑनलाईन पोर्टलद्वारे 24 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच या  योजनेतंर्गत नाफेड मार्फत 10 हजार 950 शेतकऱ्यांची  हरभरा खरेदी 189551.71 क्विंटल करण्यात आली. या खरेदीचे 96 कोटी 67 लाख रूपयेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, असे जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी कळविले आहे.

*******

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

• शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या बुलडाणा जिल्हयातील रहिवासी असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करून परिपुर्ण माहिती भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 3 सप्टेंबर 2021 पर्यंत सादर करावा. दिनांक 3 सप्टेंबर 2021 नंतर सादर करण्यात आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

*****

‘अपाम’च्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेत 762 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू

• वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व प्रकल्प कर्ज योजना

• योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.25: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज  व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत 762 लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे. तसेच आतापर्यंत 905 लाभार्थ्यांना बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहे.

    या कर्ज प्रकरणांमध्ये 64 कोटी 42 लक्ष 27 हजार 549 रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये 4103 अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी 1263 लाभार्थ्यांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले आहे. म्हणजे 1263 लाभार्थी पात्र ठरले. यापैकी 762 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. महामंडळाकडून 780 लाभार्थ्यांना व्याज परतावा मंजूर करण्यात आला. व्याज परतावा 762 लाभार्थ्यांना सुरूदेखील झाला. आजपर्यंत 6 कोटी 36 लक्ष 524 रूपये रक्कम व्याज परताव्यापोटी वितरीत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामंडळाची दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा आहे. यामध्ये 7 गटांनी अर्ज केले, 4 गटांना LOI (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले. यामध्ये 1 लक्ष 36 हजार 971 रूपयांची रक्कमेचा व्याज परतावा झालेला आहे. तसेच प्रकल्प कर्ज योजनांमध्ये 7 गटांची संख्या आहे. महामंडळ अंतर्गत एकूण 5 शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रत्येकी 10 लक्ष रूपये देण्यात आले आहे. अशाप्रकारे या तीनही योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.

   कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यामुळे अर्ज करण्यास लाभार्थ्यांना सुविधा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेकडे सदर प्रकरण मंजूरीसाठी पाठविण्यात येते. बँकेले पाठविण्यासाठी लेटर ऑफ इंटेन्ट देण्यात येते. लेटर ऑफ इंटेन्ट बँकेकडे देण्यात आल्यानंतर सदर कर्ज प्रकरणात कर्जाची रक्कम देण्यात येते. तरी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.in या संकेतस्थळावर,  व महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी केले आहे.

                                                            *****

कोरोना अलर्ट : प्राप्त 2099 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 08 पॉझिटिव्ह

     • 03 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                          

बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2107 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2099 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपिड अँटी जन चाचणी मधील 5  अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 404 तर रॅपिड टेस्टमधील 1695 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2099 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  दे.राजा शहर : बालाजी नगर 1, बुलडाणा शहर : 1, चिखली तालुका : ब्रह्मपुर वाडी 1, हिवरखेड 1, मेरा बु 2,  चिखली शहर : राउतवाडी 1, गजानन नगर 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 08 रूग्ण आढळले आहे.  तसेच आज 03 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 682160 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86684 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86684 आहे.  आज रोजी 1050 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 682160 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87380 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86684 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 24 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

 

 

Tuesday, 24 August 2021

DIO BULDANA NEWS 24.8.2021

 

कोरोना अलर्ट : जिल्ह्यात 19 सक्रीय रूग्ण;आजचे पॉझीटीव्ह ‘शून्य’

  • 08 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :   जिल्ह्यात कोरोना विषाणूने पुर्णपणे माघार घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज चौथ्यांदा नवीन संसर्गीत रूग्णाने शून्य गाठला आहे.  जिल्हावासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र तरीही जिल्ह्यात उपचार घेत असलेले 19 सक्रीय रूग्ण आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी मास्क वापरणे, हात वारंवार स्वच्छ धुणे किंवा सॅनीटाईज करणे व सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे या त्रि सुत्रींचा अवलंब करावा. तसेच पात्र लाभार्थ्यांनी कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

   प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2151 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आज एकही पॉझीटीव्ह रूग्ण आढळून आला नाही. सर्वच 2151 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 478 तर रॅपिड टेस्टमधील 1673 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2151 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    तसेच आज 08 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 680061 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86681 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86681 आहे.  आज रोजी 1379 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 680061 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86681 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 19 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

******

                  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजनांचे बँकांना उद्दिष्ट वाटप

  • आर्थिक वर्ष 2021-22 करीता 1500 लक्षांक
  • लक्षांक नसल्याचे कारण देवून बँकांनी कर्ज देण्यापासून लाभार्थ्याला वंचित ठेवू नये                                                                                                                                                      

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :  अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनातंर्गत आर्थिक वर्ष 2021-22 वर्षाकरीता बँकांना लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर लक्षांक 1500 प्रकरणांचा असून बँकांना शाखानिहाय देण्यात आला आहे. देण्यात आलेला लक्षांक हा कमीत कमी कर्ज प्रकरणांचा आहे. महामंडळाच्या योजनातंर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही बँकेच्या शाखेकडून देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज परतावा करण्यासाठी महामंडळ तत्पर आहे. मात्र बँकांनी कोणत्याही लाभार्थ्याला बँकेमार्फत लक्षांक नाही किंवा लक्षांक संपुष्टात आला आहे, असे कारणे देवून कर्ज देण्यापासून वंचित ठेवू नये, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी कळविले आहे.

महामंडळाचे बँक निहाय कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट

अलाहाबाद बँक : 8 कर्ज प्रकरणे, आंध्रा बँक : 8, बँक ऑफ बडोदा: 1, बँक ऑफ इंडिया : 14, बँक ऑफ महाराष्ट्र : 148, कॅनरा बँक : 30, सेंट्रल बँक ऑफ इंडिया : 100, देना बँक : 5, आयडीबीआय बँक : 50, इंडियन ओव्हरसिस बँक : 20, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स : 10, पंजाब नॅशनल बँक : 10, स्टेट बँक ऑफ इंडिया : 300, सिंडीकेट बँक ऑफ इंडिया : 8, युको बँक : 8, युनीयन बँक ऑफ इंडिया : 30, विदर्भ कोकण ग्रामीण बँक : 100, एक्सिस बँक : 50, एचडीएफसी बँक : 50, आयसीआयसीआय बँक : 50, बीडीसीसी बँक : 100, अनुराधा चिखली को- ऑप बँक : 100, द चिखली अर्बन को- ऑप बँक : 300.  अशाप्रकारे 1500 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.

******

एसटी च्या रातराणी सेवेत आणखी बससेवेची भर

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 : एस टी महामंडळाची रातराणी बस सेवा कोविड मुळे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. ही बस सेवा 20 ऑगस्ट 2021 पासून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या रातराणी बससेवेमध्ये आणखी सेवांची भर पडली आहेत. या बससेवांचे ऑनलाईन आरक्षण https://msrtc.maharashtra.gov.in संकेतस्थळावर व मोबाईलचे एमएसआरटीसी मोबाईल रिजर्वेशन ॲपद्वारे करता येणार आहे.

  रातराणी बस सेवेमध्ये बुलडाणा ते नागपूर रात्री 9 वाजता, चिखली ते मुंबई सायं 6.15 वाजता, चिखली ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं 6.30 वाजता,  बुलडाणा ते पुणे रात्री 9. 15 वा, मेहकर ते पुणे रात्री 7.30 वा, मलकापूर ते पुणे (पिंपरी चिंचवड) सायं 6.45 वाजता आदींचा समावेश आहे. सद्यस्थितीत महामंडळ जलद, वातानुकूलित शिवशाही आदी सेवेद्वारे प्रवाशी वाहतूक करीत आहे. तरी या रातराणी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 

******

 

Monday, 23 August 2021

DIO BULDANA NEWS 23.8.2021

 

                       अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा

·         अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

            बुलडाणा, (जिमाका) दि. 23 :  जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसाय धारक, अन्न पदार्थ साठविणारे गोदाम, चिकन / मटन / मासे व इतर मांस विक्रेते, हातगाडीवर चहा / नास्ता, पाणी पुरी, भेळपूरी, अंडा आमलेट, फरसाण, फळे व भाजीपाला विक्रेते व इतर खाद्य अन्न पदार्थ विक्रेते, भाजी मंडईत असणारे विक्रेते आदींनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा.

   तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते, वखार महामंडळ, दुध संकलन केंद्र, घरोघरी दुध चालणारे विक्रेते, हातगाडीवर आईस्क्रीम व थंडपेय, पॉपकॉर्न, खवा / मावा विक्रेते तसेच इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी सर्वांनी www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करून परवाना व नोंदणी प्राप्त करून घ्यावी. त्यासाठी सेतू किंवा सीएससी केंद्र यांची मदत घेतल्या जावू शकते. अथवा स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते. तरी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी सदर सुविधेचा लाभ घेवून परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

*******

कोरोना अलर्ट : प्राप्त 663 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह

  • 03 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 23 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 663 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 448 तर रॅपिड टेस्टमधील 215 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 663 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                       

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  बुलडाणा तालुका : देऊळघाट 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच आज 03 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                      

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 677910 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86673 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86673 आहे.  आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 677910 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87372 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86673 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 27 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Friday, 20 August 2021

DIO BULDANA NEWS 20.8.2021,1

 


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शॉर्ट मॅरेथॉन रॅली उत्साहात

            बुलडाणा, (जिमाका) दि. 20 :  केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाचे वतीने देशभरात स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्ताने आज दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वा. जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून शॉर्ट मॅरेथॉन रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी भुषण अहिरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचेवतीने रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अजयसिंग राजपुत, प्रकाश क्षेत्रे, रविंद्र गणेशे, राजेश डिडोळकर, विजय वानखेडे, प्रा.नंदु गायकवाड, श्री.हिंगे, एम.एम.राजपुत, सुभाष गिऱ्‍हे, नितीन भिसे, डॉ. राजपुत, श्री नेवरे, राहुल औशालकर, निलेश शिंदे, भरत ओलेकर, डिगांबर पाटील, दिनेश मानमोडे, धनंजय चाफेकर, समाधान टेकाळे, प्रविण चिम आदी उपस्थित होते. 

            सर्वप्रथम याप्रसंगी पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा आर्चरी स्पर्धेचे  आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुवर्ण पदक विजेता मिहीर अपार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सव व उपक्रमाच्या स्वरुपामध्ये 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 आठवड्यात 75 कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्यानंतर 2023 पयंत सर्व राज्यात त्यांच्या स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम राबविणे याबाबत जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार आजचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवा निमित्त शॉर्ट मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  उपजिल्हाधिकारी श्री. अहीरे यावेळी म्हणाले, नियमित  सरावामुळे  आरोग्यासोबत  राष्ट्राचे, राज्याचे व जिल्ह्यासोबत  स्वत:चे नाव कमविण्याची  संधी खेळामुळे मिळते. त्यासाठी प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ  खेळला पाहिजे. 

            या रॅलीमध्ये जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कबड्डी, खो खो, मैदानी, द्रोणाचार्य आर्चरी ॲकडमी चे खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच विविध सघटनेचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी नागरीक सहभागी होते.  संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी व आभार क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार यांनी मानले. या कार्यक्रमात पोलीस प्रशासन व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे वतीने ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजक अनिल इंगळे, रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, विजय बोदडे, श्रीमती मनिषा ढोके, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, भिमराव पवार, गणेश डोंगरदिवे, दिपक जाधव यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा यांनी कळविले आहे.

****

ऑलिम्पिकमध्ये पदक विजेता होण्याचा ध्यास असावा

- उपसंचालक विजय संतान

* जुने कुस्ती आखाड्यांना विनामूल्य कुस्ती मॅटचे नियोजन

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 :  ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या के.डी.जाधव यांनी हेलसिंकी 1952 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिले होते. आतापर्यंत देशाला ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कुस्ती या प्रकारामध्ये एकूण सात पदक मिळाले आहे.  महाराष्ट्राला कुस्तीचे माहेरघर सुद्धा म्हटले जाते. ऑलीम्पीकमध्ये पदक विजेता होण्याचा ध्यास खेळाडूने घ्यावा, असे आवाहन विजय संतान, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांनी केले आहे. याबाबत जिजामाता प्रेक्षागार येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जाधव तसेच क्रीडा अधिकारी, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे विद्यमानाने अमरावती विभाग मध्ये जिल्ह्यात कुस्ती कलेचा प्रसार, प्रचार व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी कुस्ती केन्द्र, जुने आखाडे व शाळा/महाविद्यालय या ठिकाणी कुस्ती मॅट नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अमरावती विभागामध्ये जिल्ह्यामध्ये कुस्तीचा विस्तार चांगल्यापैकी आहे. ज्‍या ठिकाणी प्रत्येक जुनी कुस्ती चे आखाडे /तालीम  आहेत. त्‍यांना  कुस्तीची मॅट नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तसेच जुने पारंपारिक पद्धतीचे  मातीत ग्रामीण भागात मुले कुस्तीचा सराव करतात ते हळूहळू आता बंद झाले असून, कुस्ती ला आधुनिक स्वरूप आले असून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीचा सराव मॅट वर होत आहे.  तरी याचा सर्व जुने कुस्तीचे आखाडे यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही उपसंचालक श्री. संतान यांनी केले आहे.

  सदर कुस्ती मॅट वितरणाची योजना उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.  तरी इच्छुक  जुने आखाडे, कुस्ती प्रशिक्षण केन्द्र, शाळा, महाविद्यालय यांनी  योजने चे समन्वयक लक्षमीशंकर यादव (राज्य क्रीडा मार्गदर्शक) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम,अकोला मोबाईल नंबर 9689300669  वर संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कुस्तीगीरांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

******

DIO BULDANA NEWS 20.8.2021

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 1029 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह                                                            • 02 रूग्णांना मिळाली सुट्टी                                                                                                                                                           

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1030 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1029 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड अँटींजेन टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 737 तर रॅपिड टेस्टमधील 292 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1029 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा तालुका : डोंगर सोयगांव 1  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे.  तसेच आज 02 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.                                                                                                       

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 674517 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86664 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86664 आहे.  आज रोजी 1468 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 674517 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87364 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86664 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 28 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.                                                                       

****

                    जिल्ह्यात पावसाची संततधार…!

  • संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परिणामी खरीपाची पिके पावसासाठी आसुसली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी सिंचन सुरू केले. तर व्यवस्था नसलेले शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करीत होते. मात्र दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, तर कुठे रिपरिप पाऊस होत आहे. पावसाची संततधार जिल्हावासियांना अनुभवायला मिळत आहे. जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील आकडेवारीनुसार संग्रामपूर तालुक्यात सर्वात जास्त 20.7 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.  

   जिल्ह्यात आज 20 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार पावसाची झालेली नोंद पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आतापर्यंत पडलेल्या पावसाची – सर्वात जास्त पाऊस संग्रामपूर : 20.7 मि.मी (395.6 मि. मी), मलकापूर : 20.6 (267.7 मि. मी), जळगांव जामोद : 16.6 (207.6), नांदुरा: 11.9 (296), दे.राजा : 10 (440.9),  शेगांव : 9.3 (240.7), लोणार : 8.3 (588.2), मोताळा : 8.3 (315.1), चिखली : 7.4 (505.6), सिं. राजा : 7 (632.7), बुलडाणा : 6.4 (430.5), खामगांव : 5.1 (435.8) आणि सर्वात कमी मेहकर तालुक्यात 4.9 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. आजपर्यंत सर्वात कमी 207.6 मि.मी पावसाची नोंद जळगांव जामोद तालुक्यात करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 136.5 मि. मी पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची सरासरी 10.5 मि. मी आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 776 मि.मी पाऊस मेहकर तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस जळगांव जामोद तालुक्यात 207.6 मि.मी झाला आहे. जिल्ह्यात 1 जुन 2021 पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी 425.6 मि. मी आहे.

******


जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिनाची शपथ

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ 20 ऑगस्ट हा दिवस  सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाची शपथ आज तहसिलदार शामला खोत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांना दिली. यावेळी सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी  नायब तहसिलदार संजय बंगाळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

*****

महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांचा दौरा

बुलडाणा, (जिमाका) दि. 20 : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर 21 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे: दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, शेगांव येथे आगमन व राखीव, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा स्व. शिवशंकरभाऊ पाटील यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 10 वा शेगांव येथून मोटारीने बाळापूर जि. अकोलाकडे प्रयाण करतील.