जिल्ह्यातील सर्व बार, मद्य
विक्री 31 मार्चपर्यंत बंद
·
कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·
गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 22 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या
उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी
सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बार व रेस्टॉरंट, देशी दारू
किरकोळ विक्री, विदेशी दारू विक्री, बार, क्लब आजपासून 31 मार्च 2020 पर्यंत
बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी
व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमी संपर्क यायला पाहिजे. त्यानुसार सर्व अबकारी
अनुज्ञप्त्यांमध्ये मद्य प्राशन करणाऱ्या ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेता
सर्व बार, मद्यविक्री बंद करण्यात आली
आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही
निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना
ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी
टाळण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात येत
आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
+++++
जिल्ह्यातील सर्व पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थ विक्री दुकाने 31
मार्चपर्यंत बंद
·
कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी
·
गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा, दि. 22 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या
उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्हाधिकारी
सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व
आस्थापना तसेच ज्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ, पाने, मावा, सुगंधी सुपारी व तत्सम
खाण्याचे, चघळण्याचे पदार्थ विक्री होतात अशा सर्व पानटपरी व दुकाने आजपासून
31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा वाढता
प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या जिल्हा
प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पानटपरी, तंबाखूजन्य
पदार्थ विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बंदमधून अत्यावश्यक
किराणा सामान, दुध, भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय, पेट्रोल पंप यांना
वगळण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही
निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना
ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी
टाळण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी
आदेशान्वये कळविले आहे.
**********************
No comments:
Post a Comment