कोरोना विषाणू प्रसार पार्श्वभूमी : विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करावे
· जिल्हा प्रशासनाचे आवाहन
· 31 मार्चपर्यंत गर्दी जमविणारे कार्यक्रम स्थगित
बुलडाणा, दि. 17 : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदींनुसार जिल्ह्यात ज्या ठिकाणी विवाह होवू घ्सातले आहे, असे विवाह कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने अत्यंत साध्या व शक्यतोवर नोंदणी पद्धतीने करण्यात यावे. साध्या पद्धतीने विवाह याचा अर्थ कमी गर्दी असावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विवाह समारंभात आयोजकांनी गर्दी जमवू नये. तसेच मंडप, सभागृह, मंगल कार्यालय येथे गर्दी जमणार नाही या करिता सर्व समारंभ 31 मार्च 2020 पर्यंत स्थगित ठेवण्यात यावे. मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन टाळावे.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गर्दी टाळण्याच्या उद्देशाने आवश्यकतेनुसार सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment