· मॉक ड्रील असल्याने कुणीही अफवा पसरवू नये
· जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पंडीत यांचे आवाहन
बुलडाणा, दि.23 : कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात 20 मिनीटांची ‘मॉक ड्रील’(प्रात्याक्षिक) 22 मार्च 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता घेण्यात आली. प्रात्याक्षिकात कोरोनाग्रस्त रूग्णाला रूग्णालयातील आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात आणून त्यावर उपचार सुरू करण्यात आले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. रूग्णाची संपूर्ण माहिती घेण्यात आली. अशी ती मॉक ड्रील आहे.
ही केवळ मॉक ड्रील असून अशा परिस्थितीत आरोग्य प्रशासन किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरली आहे. तरी ही केवळ आरोग्य प्रशासनाच्या तयारीचा भाग म्हणून घेण्यात आलेले प्रात्याक्षिक आहे. कुणीही मॉक ड्रीलमधून रूग्ण पॉझीटीव्ह आढळल्याची अफवा पसरवू नये. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवू शकते. या प्रात्याक्षिकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनीही सहभाग घेतला. तसेच डॉ. वासेकर व त्यांची चमू या प्रात्याक्षिकात सहभागी झाली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी केले आहे.
दिव्यांग तपासणीचे 25 मार्च रोजी होणारे शिबिर रद्द
बुलडाणा, दि.23 : जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथे नियमितपणे दिव्यांग बोर्ड सुरू असते. चौथ्या बुधवारला 25 मार्च 2020 रोजी गुढीपाडवा निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे त्या दिवशीचे अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण/मतिमंद, कान, नाक घसा संबंधीत दिव्यांग तपासणीबाबतचे शिबिर रद्द करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जिल्हा रूग्णालय, बुलडाणा येथील सदर अस्थिव्यंग, नेत्र, मनोरूग्ण/ मतिमंद, व कान-नाक-घसा संबधित दिव्यांग तपासणीस येवू नये. आल्यास झालेल्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.
कोरोना अलर्ट :
जिल्ह्यात परदेशातून आलेले 56 नागरिक ‘होम क्वारंटाईन’
· बुलडाणा आयसोलेशन कक्षातील संशयतीच्या रिपोर्टची प्रतीक्षा
बुलडाणा, दि. 23 : कोरेाना विषाणूचा प्रसार व संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. त्यामध्ये एका नागरिकाची भर पडली आहे. त्यानुसार काल दि. 22 मार्च 2020 पर्यंत विदेशातून आलेल्या 55 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 23 मार्च 2020 रोजी 1 नवीन नागरिकाला त्याच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 56 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बुलडाणा आयसोलेशन (विलगीकरण) कक्षात एक नागरिकाला संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. या नागरिकाचा स्वॅब व रक्त नमुने नागपूर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या संशयीताच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हयात आतापर्यंत 73 विदेशी भारतीय नागरिक आले. त्यांचे निरीक्षण व तपासणी करण्यात आली. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या 2 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच बुलडाणा स्त्री रूग्णालयात 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर 9 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. खामगांव आयसोलेशन कक्षातून 3 व बुलडाणा आयसोलेशन कक्षातून 2 नागरिकांचे तपासणी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.
***********
नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर
· मेहकर तालुक्यातील 3, सिंदखेड राजा तालुक्यातील 3 गावांचा समावेश
बुलडाणा, दि.23 - जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2019-2020 मध्ये समाविष्ट असलेल्या मेहकर व सिंदखेड राजा तालुक्यातील काही गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील उकळी, सावत्रा व मोहखेड या गावामध्ये पाणी टंचाई निवारणार्थ नळ योजना विशेष दुरूस्ती मंजुर करण्यात आली आहे. या उपाययोजनेची अंदाजपत्रकीय किंमत अनुक्रमे 6 लक्ष 30 हजार 180, 7 लक्ष 17 हजार 390 रूपये, 1 लक्ष 3 हजार 490 रूपये आहे. त्याचप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी टाका, दत्तापूर व हिवरखेड पूर्णा येथे नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. या कामांची अंदाजपत्रकीय किंमत अनुक्रमे 3 लाख 89 हजार 440, 1 लक्ष 25 हजार 710 व 2 लक्ष 44 हजार 940 इतकी आहे.
मंजूर नळ योजना विशेष दुरूस्ती ही किमान खर्चाची असल्याबाबत तसेच सदर मंजूर कामे वेळीच पूर्ण होऊन प्रत्यक्ष चालु टंचाई कालावधीत सदर योजनेतून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकेल, याची खात्री कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बुलडाणा व संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उप विभागीय अभियंता / अधिकारी यांनी केलयानंतरच मंजूर कामास सुरूवात करावी, अन्यथा संबंधितास जबाबदार धरण्यात येईल. या कामांमुळे सदर गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन
बुलडाणा, दि. 23 :- शहिद भगतसिंह, शहिद सुखदेव, शहिद राजगुरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 23 मार्च 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश बेल्लाळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी सुध्दा शहिदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
3 Attachments
No comments:
Post a Comment