जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन
बुलडाणा, दि.7 : जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक
संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन दरमहा करण्यात येते. त्यानुसार मंगळवार, दि. 13
जून 2017 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन
करण्यात आले आहे. सदर बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तरी
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारी पुराव्यासह दोन
प्रतीत लेखी स्वरूपात बैठकीत सादर कराव्यात. जेणेकरून आपल्या तक्रारींचे निराकारण
करता येईल, असे जिल्हा
पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
*****
मानसेवी होमगार्ड सदस्यांची 15 जून रोजी नोंदणी
·
117 पुरूष, तर 99 महिला सदस्यांकरीता नोंदणी
बुलडाणा, दि.7 : जिल्ह्यातील 7 तालुका पथकानुसार
रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्ड्सची सदस्य नोंदणी 15 जून 2017 रोजी पोलीस
मुख्यालय मैदानावर सकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे. अनुशेषातंर्गत पुरूष सदस्यांच्या 117 व महिलांच्या
99 जागांकरीता नोंदणी होणार आहे. या नोंदणीसाठी शिक्षण कमीत कमी इयत्ता 10 वी उत्तीर्ण
असणे आवश्यक आहे. तसेच वय 20 वर्ष पूर्ण व 50 वर्षाच्या आत असावे, पुरषांसाठी 1600
मीटर व स्त्री सदस्यांकरीता 800 मीटर धाण्याची पात्रता असणार आहे.
पुरूष सदस्यांकरीता 162 व महिलांना 150 से.मी उंची असावी. गोळाफेक पात्रतेमध्ये
पुरुषांनी 07.260 किलोग्राम, तर महिलांनी 4 किलो वजनाचा गोळा फेकणे आवश्यक आहे. संबंधित
उमेदवारास विहीत केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी द्यावी लागणार आहे.
निवड होऊन पात्र ठरलेले उमदेवार हे वेतनी सेवेत असतील, तर त्यांना कार्यालयाचे अथवा
मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक व इतर तपशीलाच्या
पृष्ठयार्थ जोडावे. संबंधित प्रमाणपत्रे तसेच 10 वी ची गुणपत्रिका, बोर्ड सर्टीफिकेट,
शाळा सोडल्याचा दाखला सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत, नोंदणीच्या वेळी उमेदवारांस
स्व:खर्चाने यावे लागेल, तसेच नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची
जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील. उमेदवारांची निवड पुर्णपणे गुणवत्तेनुसार करण्यात
येईल. उमेदवारांनी सोबत तीन रंगीत छायाचित्र सोबत आणावेत. अधिम माहितीसाठी संबंधित
तालुक्यातील होमगार्ड पथक कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा समादेशक संदीप
डोईफोडे यांनी कळविले आहे.
******
No comments:
Post a Comment