Monday, 19 June 2017

NEWS 19.6.2017 DIO BULDANA

जिल्हा नियोजन समिती निवडणूक
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
·        हरकत असल्यास तीन दिवसात सादर करावी
बुलडाणा,दि. 19 : महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम 1955 चे नियम 5 (3) नुसार बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी जिल्हा परिषद सदस्यांमधून व नगर परिषद सदस्यांमधून समिती सदस्य निवडून द्यावयाचे आहे. समितीची एकूण सदस्यसंख्या 40 आहे. त्यामध्ये खासदार, आमदार आधीच सदस्य आहेत.  या निवडणूकीची प्रारूप मतदार यादी 19 जुन 2017 रोजी प्रसिद करण्यात आली आहे. सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय, मुख्याधिकारी नगर परिषद बुलडाणा, चिखली, दे.राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगांव, शेगांव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा, मलकापूर यांच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. या यादीवर काही हरकती असल्यास प्रसिद्धीपासून तीन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नोंदवायच्या आहेत. हरकती तीन दिवसानंतर दाखल करता येणार नाही किंवा ती विचारात घेतली जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) यांनी कळविले आहे.
०००००
जळगाव जामोद येथील शासकीस वसतीगृह येथे प्रवेश देण्यास प्रारंभ

     बुलडाणा, दि. 19 : जळगाव जामोद येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर  शासकीय वसतिगृहात रिक्त झालेल्या जागांवर सन 2017-18 या शैक्षणिक सत्रामध्ये गुणवत्तेनिहाय व प्रवर्ग निहाय प्रवेश देणे सुरू आहे.  जळगाव जामोद तालुक्यातील इयत्ता 8 वी, 11 वी व प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
     विहीत नमुन्यातील प्रवेश अर्जाचा नमुना संबंधित वसतीगृहात उपलब्ध आहे. प्रवेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या सामाजिक आरक्षण व नियमावलीअन्वये करण्यात येणार आहे. तरी गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज घेवून जावून आवश्यक त्या कागदपत्रांसह विहीत कालावधीत वसतीगृहात जमा करावे.  वसतीगृहाचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह जळगाव जामोद, जि. बुलडाणा असा आहे, तरी मुलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment