लोकशाही दिनातील तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात
-
अप्पर जिल्हाधिकारी
·
लोकशाही दिनाची कार्यवाहीत 17 तक्रारी प्राप्त
बुलडाणा, दि.5 : लोकशाही
दिनाची कार्यवाही दर महिन्याच्या पहिल्या सोमवारला होत असते. यासाठी नागरिकांच्या
मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. लोकशाही
दिन कार्यवाहीच्या कक्षेत न येणाऱ्या तक्रारींना सामान्य तक्रारी म्हणून संबंधित
विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित विभागाकडून अशा तक्रारींवर त्वरित कार्यवाही
अपेक्षीत असते. मात्र संबधीत विभागाकडून ही कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी लोकशाही दिनातील तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना अप्पर
जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत
होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री.
जधवर, तहसीलदार शैलेश काळे, उपनिबंधक श्री. पालोदकर, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण
आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाही दिनाच्या कार्यवाहीची सुरूवात करताना अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले,
लोकशाही दिनाची कार्यवाहीला येताना अधिकाऱ्यांनी प्रकरणांचा अभ्यास करून यावे.
कारण लोकशाही दिन हे जनसामान्यांची जलकल्याणकारी कामे करण्याचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा
उपयोग सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्यासाठी व्हायला पाहिजे. ही प्रशासनासाठी
संधी असते. लोकशाही दिन कार्यवाहीला वेळेवर येण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी
दिले.
या
लोकशाही दिनामध्ये एकूण 17
तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी एक तक्रार
स्वीकृत करण्यात आली. तसेच 16 तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात
आल्या. मागील तक्रारींपैकी 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्य
कार्यकारी अधिकारी, जि.प बुलडाणा व तहसीलदार, खामगांव यांच्याकडील तक्रारींचा
समावेश आहे. लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित
होते.
****
भ्रष्टाचार निर्मुलन
समितीच्या बैठकीचे 12 जून रोजी आयोजन
बुलडाणा दि. 5 - भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे आयोजन 12 जून 2017 रोजी जिल्हाधिकारी
कार्यालयाचे सभागृहात दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींना
भ्रष्टाचाराबाबतच्या तक्रारी व गाऱ्हाणी दाखल करावयाच्या असतील, त्यांनी
प्रतिज्ञापत्रावर तक्रार स्पष्ट शब्दात सबळ पुराव्यानिशी समिती समोर दाखल करावी.
जेणेकरून भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करता येईल. तरी नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी
कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
*****
माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता शिक्षणासाठी
आर्थिक मदत मिळणार
·
इयत्ता
9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यां 30 जून 2017 पर्यंत अर्ज करावे
·
इयत्ता
10 व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी 31 जुलै पर्यंत अर्ज करावे
बुलडाणा,दि. 5 - केंद्रीय सैनिक कल्याण
बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिक,
युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता आर्थिक मदत देण्यात येते. या
योजनेतंर्गत 1 ली ते 9 वी आणि 11 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही
आर्थिक मदत देण्यात येते. विद्यार्थी हा
केंद्रीय स्कूल, जिल्हा परिषद शाळा, नगर पालिका किंवा कोणतीही खाजगी शाळा,
महाविद्यालयात शिक्षण घेत असावा.
इयत्ता 1
ली ते 9 पर्यंत आणि इयत्ता 11 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 30
जून 2017, इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 31 जुलै व पदवी
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी 31 ऑगस्ट 2017 अर्ज करण्याची अंतिम तारिख आहे.
सर्व अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावीत. अर्जासोबत
विद्यार्थ्याचा स्वत:चा पासपोर्ट फोटो, डिस्जार्ज पुस्तकाची पूर्ण झेरॉक्स, मागील
वर्षी पास झाल्याची गुणपत्रिका, माजी
सैनिकाचे ओळखपत्र, माजी सैनिकाचे व पाल्याचे आधार कार्ड, अन्य संस्थेकडून कोणतीही
आर्थिक मदत मिळत नसल्याबाबतचे माजी सैनिकाचे स्वयं घोषणापत्र, एसबीआय किंवा पंजाब
नॅशनल बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पीपीओ आणि स्वत:चा इमेल ॲड्रेस
पासवर्डसह आणणे आवश्यक आहे. आरएमडीएफ च्या मदतीची प्रकरणे सेक्रेटरी केंद्रीय
सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडे www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावीत.
यासाठी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बस स्थानकाजवळ, बुलडाणा येथे संपर्क साधावा. ही
सर्व ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून अर्ज व स्वयंघोषणापत्र जिल्हा सैनिक कल्याण
कार्यालयात जमा करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment