बुलढाणा, दि.30 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी शेत पाणंद रस्ते हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील शेत व पाणंद रस्त्यांच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा आमदार संजय गायकवाड, श्वेता महाले, मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, विभागीय वन अधिकारीजमीर शेख, यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ना. पाटील म्हणाले, योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे. पाणंद रस्त्यांची कामे हाती घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवावा. यासाठी नियमित बैठका घेऊन कामांमध्ये येणाऱ्या अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. शेतकऱ्यांच्या दळणवळणाची सुविधा सुलभ...