७ डिसेंबरला नागपूर येथे होणार गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम स्मृती सोहळा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
मुंबई/ बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य सरकारतर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि अमरावती विभागातील सुरू असलेल्या विविध कार्यक्रम, प्रचार उपक्रम व व्यवस्थापनाची आज अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला बुलढाणा येथून निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उप शिक्षणाधिकारी अनिल देवकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, एसटी महामंडळाचे अधिकारी आदी दूरदृष्ट प्रणालीद्वारे उपस्थित होते. ...