Monday, 10 April 2023

DIO BULDANA NEWS 07.04.2023

 महात्मा ज्योतीराव फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

*प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरावर सत्कार
बुलडाणा, दि. ७ : महात्मा ज्योतीराव फुले जयंतीनिमित्त दि. 11 एप्रिल 2023 रोजी जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरावर सत्कार करण्यात येणार आहे.
विविध कार्यक्रमात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, मी सावित्रीबाई बोलतेय किंवा मी ज्योतीराव बोलतोय या विषयावर एकांकिका स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त जिल्हास्तरावर आणि संपूर्ण जिल्ह्यात महाविद्यालय, शाळा, वसतिगृहे, आश्रमशाळांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरावर दि. 11 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सत्कार करण्यात येणार आहे.
दि. 11 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून बॉईक रॅलीला सुरुवात होऊन महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे समाप्त होईल. याठिकाणी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्प्हार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सायंकाळी 6 वाजता महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आणि चांदणे स्वरांचे गीत रजनी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामध्ये क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधिक्षक सारंग आवाड, उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे. 
000000

No comments:

Post a Comment