अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा कोलवड येथे
प्रवेश प्रकिया सुरु
बुलडाणा, दि. 9 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागतंर्गत
अनु. जाती मुलांची शासकीय निवासी शाळा,
अजिंठा रस्ता, कोलवड ता.जि.बुलडाणा येथील निवासी शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. येथे
मोफत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सोयी
सुविधा आहेत. या निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2018-19 करिता 6 वी साठी संपूर्ण नवीन
प्रवेश तथा इयेत्ता 7 वी ते 10 वी मधील रिक्त जागांसाठी अनु. जाती,
अनु.जमाती,विजाभज, विमाप्र व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थाच्या प्रवेश दिनांक 15
एप्रिल 2018 पासून कार्यालयीन वेळेत तथा सुटीचे दिवस वगळून प्रवेश अर्ज विनामुल्य
मिळणार आहेत..
अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख 20
मे 2018 आहे. यानंतरच्या रिक्त जागेच्या प्रवेश फेरी 30 सप्टेबर 2018 च्या पूर्वी
घेतल्या जातील. याबाबत वेळापत्रक शाळेच्या सूचनाफलकावर लावण्यात आलेले आहे. सदरचे
प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणाच्या ठरविलेल्या टक्केवारीनुसार दिले जातील. अधिक
माहितीसाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण बुलडाणा तथा अनुसूचित जाती मुलांची
शासकीय निवासी शाळा कोलवड ता. जि. बुलडाणा येथे संपर्क साधावा असे आवाहन
मुख्याध्यापक एस.व्ही.पहुरकर यांनी केले आहे.
*********
भूमापन दिनानिमित्त आज भूमि अभिलेख प्रदर्शनाचे
आयोजन
बुलडाणा, दि. 9 : भूमि अभिलेख विभागाकडून उद्या 10
एप्रिल 2018 रोजी भूमापन दिनानिमित्त भूमि अभिलेख प्रदर्शनीचे आयोजन उपअधिक्षक
भूमि अभिलेख कार्यालय, प्रशासकीय इमारत, बुलडाणा येथे करण्यात आले आहे. प्रदर्शन सकाळी
10.30 ते सायं 5 वाजेदरम्यान जनतेसाठी खुले राहणार आहे. सदरच्या प्रदर्शनात भूमि अभिलेखाचा
इतिहास ते आजपावेतोची वाटचाल या विषयीचे प्रदर्शन भित्तीचित्राद्वारे दर्शविण्यात
आलेले आहे. तरी सर्व जनतेने सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक
भूमि अभिलेख सुजितकुमार जाधोर यांनी केले आहे.
*******
मत्स्यव्यवसायाठी तलाव ठेक्याने देण्यात येणार
- नोंदणीकृत
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असावी
बुलडाणा, दि. 9 : सन 2018-19 या वर्षाकरीता जिल्ह्यातील
अनुक्रमे 200 हेक्टर वरील व 200 हेक्टर खालील सर्व जलाशय / तलाव ठेक्याने देण्याचे
प्रस्तावित आहे. ठेक्याने देण्यात येणाऱ्या तलावांमध्ये 30 जून 2018 रोजी मुदत
संपुष्टात येणारे जलाशय / तलाव असणार आहेत. असे तलाव/ जलाशयांच्या निर्धारीत कार्यक्षेत्रातील
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना शासन निर्णयातील अटी व शर्तीचे अधिन न्यूनतम ठेका
रक्कमेने अथवा बोली लिलाव प्रक्रियेने प्रादेशिकस्तरीय / जिल्हास्तरीय तलाव ठेका
वाटप समितीचे मान्यतेने देण्याचे प्रस्तावित आहे.
तलाव ठेका प्रक्रियेकरिता नोंदणीकृत
मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था असणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेकरीता तलाव ठेका
नमुना – 1, तलाव ठेका मागणीबाबतचा संस्थेचा ठराव व अर्ज, संस्था ही भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय
सहकारी संस्था म्हणून नोंदणी झालेली असावी, नाहरकत प्रमाणपत्र / उपविधी
प्रमाणपत्र/ संस्था नोंदणी प्रमाणपत्र असावे, संस्था बंद अवसायनात नसल्याबाबतचे
सहकार विभागाचे प्रमाणपत्र असावे, संस्था शासनाचे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, संबंधित
संस्थेचा मागील तीन वर्षाचे अद्ययावत लेखा परीक्षणअहवाल, 2017-18 चा अहवाल नसल्यास
लगतच्या वर्षांचा म्हणजेच सन 2016-17 चा लेखा परीक्षण अहवाल असावा.
तसेच संस्थेच्या उपविधीनुसार संस्थेचे कार्यक्षेत्र
नमुद असलेल्या उपविधी पृष्ठाची सत्यप्रत व 97 वी घटना दुरूस्तीची प्रत सोबत आणावी.
त्याचप्रमाणे मागील पाच वर्ष तलाव ठेका कालावधीचा प्रतिवर्ष मत्स्यबीज संचयन व
मत्स्योत्पादन अहवाल, संस्थेच्या बँक खात्यामध्ये शासन निर्णयामधील तरतुदीनुसार,
न्युनतम तलाव ठेका रक्कम आणि रूपये 15 हजार किंवा तलाव ठेका रक्कमेच्या 50 टक्के
रक्कम यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या बँक
खात्यामध्ये जमा असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे
30 जून 2017 नुसार 0 ते 20 हेक्टर जलक्षेत्राचे तलावास प्रति हेक्टर 1800
रूपयांप्रमाणे आकारणी निर्धारीत करण्यात आलेली आहे. तसेच संबंधित तलाव / जलाशय
ठेका सुत्राप्रमाणे करण्यात येणार आहे. हे
सूत्र तलाव ठेका रक्कम बरोबर तलावाचे
क्षेत्र (हेक्टर) गुणीले अपेक्षित मत्स्योत्पादन प्रति हेक्टर गुणीले प्रति किलो
मासळीचा बाजारभाव ( 60 रूपये) गुणीले 2 भागीले
100 असे आहे.
तरी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,
मत्स्यव्यवसाय विभाग, बुलडाणा या कार्यालयात
संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त स. इ. नायकवडी यांनी केले आहे.
******
राष्ट्रीय कुटूंबलाभ
अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांना धनादेश वाटप
- गतवर्षात सिंदखेड राजा तालुक्यात 40 लाभार्थी
बुलडाणा, दि. 9 : राष्ट्रीय कुटूंबलाभ अर्थसहाय्य
योजनेतंर्गत कुटूंबातील कर्ता पुरूष किंवा कर्ती स्त्री मयत झाल्यास त्यांचा वारसास
20 हजार रूपयांचा मदतीचे वाटप करण्यात येते. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती
पात्र आहे. योजनेच्या लाभासाठी दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र,
वारसाचा दाखला व मृत्यू रजिष्टर पानांची फोटो सत्यप्रत आवश्यक असते. मृत्यू
दिनाकानंतर अर्ज एका वर्षाच्या आत दाखल करण्यात यावा. तसेच वारस व्यक्ती जर महिला
असेल तर अशा महिलेला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेमध्ये अर्ज
करता येतो.
या महिलेस दरमहा 600 रूपयांप्रमाणे
लाभ देण्यात येतो. त्यानुसार सिंदखेड राजा
तालुक्यातील 9 लाभार्थ्यांना नुकताच या योजनेचे धनादेश वितरण करण्यात आले. सदर
धनादेश उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक काळे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार
संतोष कणसे, नायब तहसिलदार श्रीमती प्रिती जाधव, कर्मचारी एस. बी रोकडे, आर. आर
कऱ्हाळे, यु. एल मुंढे, व्ही.पी सरदार आदी उपस्थित होते.
सिंदखेड राजा तालुक्यात येथील तहसिल
कार्यालयातंर्गत या योजनेचे गत 5 वर्षापासून 299 अर्ज मंजूर करण्यात आले. यालाभापोटी
59 लक्ष 80 हजार रकमेचे वितरण करण्यात आले. तसेच गत आर्थिक वर्षामध्ये 40 लाभार्थ्यांना राष्ट्रीय
कुटूंब लाभ योजनेतंर्गत लाभ देण्यात आला, असे सिंदखेड राजा तहसिलदार यांनी कळविले
आहे.
******
तीन
गावांसाठी टॅंकर मंजूर
- बोथा, उटी व महार चिकणा गावांचा समावेश
बुलडाणा, दि. 9- मेहकर तालुक्यातील बोथा व उटी, लोणार तालुक्यातील महार
चिकणा येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता या गावांसाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर
मंजूर करण्यात आले आहे. बोथा गावाची लोकसंख्या 959 असून येथे एक टँकर मंजूर
करण्यात आले आहे. तसेच उटी गावची लोकसंख्या 3100 असून येथे एक टँकर मंजूर
आहे.त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील महार चिकना गावची लोकसंख्या 1468 आहे. या गावासाठी
एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीला नोंद
घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी.
निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे
जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
*******
ग्राहक
मार्गदर्शन शिबिराचे आज आयोजन
बुलडाणा, दि.9 : भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, मुंबई
यांच्यावतीने ग्राहक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह,
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे उद्या 10 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30
वाजता करण्यात आले आहे. ग्राहकांचेहित
जपणाऱ्या प्रत्येक बाबीवर या शिबिरात विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी
या कार्यक्रमाला ग्राहक संरक्षण चळवळी संबंधित व्यक्ती, संघटना तसेच नागरिकांनी
उपस्थित रहावे. त्याचप्रमाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमधील अशासकीय सदस्यांनी
सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले
आहे.
******
तेनझिंग
नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित
- 20 एप्रिल 2018 पर्यंत प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 9- केंद्र शासनाच्या पत्रान्वये युवक कल्याण योजनेतंर्गत
जमिन, हवाई आणि जल या प्रत्येक क्षेत्रातील साहसी कार्याबाबत, तसेच साहसी
क्षेत्रातील भरीव कार्याबाबत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2017 करीता
नामांकनाचे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. सदर प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयात 20 एप्रिल 2018 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
प्रस्तावासोबत नामांकन सादर करणाऱ्या
खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील म्हणजेच सन 2014, 2015 व 2016 मधील असणे
आवश्यक आहे. साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे, खेळाडूंची
कामगिरी अतिउत्कृष्ठ असणे आवश्यक असून त्याबाबतची माहिती 2 ते 3 पानांमध्ये हिंदी किंवा
इंग्रजी भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तेनझिंग
नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन 2017 करीता नामांकनाचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलडाणा येथे सादर करावे. अधिक
माहितीसाठी सदर कार्यालयाशी संपर्क करावा,
असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.
*****
बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत
पोहचविण्यासाठी लोकराज्य सशक्त माध्यम
-
जिल्हाधिकारी
- लोकराज्यच्या महामानवास अभिवादन विशेषांकाचे विमोचन
बुलडाणा, दि. 9- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने लोकराज्य
मासिकाचा एप्रिल 2018 चा अंक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर काढलेला
आहे. या अंकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरीत होतात. बाबासाहेबांचे
विचार खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकराज्य एक सशक्त माध्यम आहे,
अशी प्रतिक्रिया प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी आज दिली.
लोकराज्य मासिकाचा एप्रिल महिन्याचा
विशेषांक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आहे. या अंकाचे विमोचन आज
जिल्हाधिकारी कार्यालयात प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्याहस्ते करण्यात
आले. त्यावेळी प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी
ललीत वराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त मनोज मेरत, माहिती सहायक निलेश
तायडे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, लोकराज्यचा हा अंक
संग्राह्य असून जनतेने तो खरेदी करावा. अत्यंत सहजरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचे जीवनचरित्र या अंकातून पुढे येते. दुर्मिळ छायाचित्र, त्यांच्या वरील लेख या
अंकाचे महत्व अधिकच वाढवितात. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी यांनीही आपली
प्रतिक्रिया नोंदविली.
*******
जिल्हा
कारागृहात कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
बुलडाणा, दि. 9- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय
बुलडाणा, इंडियन मेडीकल असोसिएशन बुलडाणा व पंचशील होमियोपॅथी खामगांव, शांतीवन
कुष्ठधाम चावर्दा ता. मोताळा व जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य
साधून पार पडले. या शिबिरात कारागृहातील कैद्यांनी सहभाग घेवून
रेागनिदान करून घेतले, शिबिरातच कैद्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधी उपलब्ध
करून देण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
सहायक धर्मदाय आयुक्त एस.एम जोशी होते. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये इंडियन मेडीकल
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एल. के राठोड, डॉ. जे. बी राजपूत, डॉ. योगेश गोडे, डॉ.
शेंडे, डॉ. सवडतकर, डॉ. सचिन घोंगटे, डॉ. विजय निकाळे, डॉ. पबीतवार, डॉ. संदेश
राठोड, डॉ. अशोक भवटे, डॉ. विप्लव चव्हाण, डॉ. गायकवाड, डॉ. रामप्रसाद मोरे आदींनी
सहभाग घेतला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सामान्य रूग्णालयातील डॉ. जे. बी गायकवाड,
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील डी. पी गवते, डी.एस खांडेकर, श्री. बोराडे व
कारागृहातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, असे सहायक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले
आहे.
*******
कापूस
पिकावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किड व्यवस्थापन करावे
·
एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी
·
कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी, युरीया खताचा
जास्त वापर टाळावा
·
किडींच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी
पिकांची फेरपालट करावी
बुलडाणा, दि.9 - जिल्ह्यात खरीप हंगाम 2017 मध्ये कापूस पिकांवर
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे. त्यामुळे कापूस
उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. गत हंगामामध्ये गुलाबी
बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने खरीप हंगाम 2018 मध्ये
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्याचे दृष्टीने आतापासून नियोजन करणे
अत्यावश्यक आहे. त्यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत केल्याशिवाय तरणोपाय
नाही.
असे करा व्यवस्थापन : एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. यामुळे
किडीच्या जमिनीत असलेल्या अवस्था (उदा.कोष) वर येवून उन्हामुळे नष्ट होतील किंवा
पक्षी त्यांना टिपून खाऊ शकतील. कपाशीची धसकटे, पालापाचोळा जमा करून कंपोस्ट
खड्ड्यात टाकावीत. याप्रमाणे स्वच्छता मोहिम राबवून संपूर्ण शेती तथा बांध स्वच्छ
करण्यात यावे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे
अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कापूस घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापूस
लागवड करू नये. पुर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य लागवड केलेली जमीन कापूस
लागवडीसाठी निवडण्यात यावी. या हंगामात कपाशीच्या सभोवताली नॉन बी.टी कपाशीची
लागवड करावी. तसेच कापूस पिकावरील किडीच्या नैसर्गिक शत्रु किटकांचे संवर्धन
होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ
लावावी. याप्रमाणे नियोजन केल्यास निश्चितच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करणे शक्य
होईल.
शेतकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावरून खात्रीच्या बियाणेची खरेदी करावी व
खरेदीची पावती संबंधित कृषि सेवा केंद्राकडून घ्यावी. तसेच ती जतन ठेवावी. तसेच
पेरणीच्या वेळी पिशवी उलट्या बाजूने फाडून पिशवीवरील अत्यावश्यक माहिती उदा. लॉट
नंबर, वाण, स्वत:कडे जपून ठेवावी. कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी, पिकाच्या
सुरूवातीच्या वाढीच्या तीन महिन्यापर्यंत किटकनाशकाचा वापर टाळावा, जेणेकरून मित्र
किडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पती जन्य किटकनाशके, जैव किटकनाशके, मित्र
किडीचा वापर करावा. पिकांच्या लागवडीनंतर 45 दिवसांत फेरोमन ट्रॅप्सचा वापर प्रति हेक्टरी 5
याप्रमाणे वापर करावा व पिकांतील बदल निरीक्षणाची नोंद घ्यावी.
पिक
लागवडीपासून काढणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील किडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे
सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानीची
पातळी गाठली असल्यास केवळ रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. रासायनिक
किटकनाशकांचा वापर आवश्यकता असेल तेव्हाच व शिफारस केल्याप्रमाणे करावा. अधिकाधिक
किटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा जास्त मात्रेत फवारणी घातक ठरू शकते ती टाळावी. तरी पुढील हंगामात कपाशीवरील बंदोबस्तासाठी
शेतकरी बांधवांनी एकात्मिक किडरोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन
विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment