अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थ्यांचे गहू
व तांदुळाचे मासिक नियतन जाहीर
बुलडाणा, दि 7 - राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यांकरिता माहे सप्टेंबर
2017 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची
शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश
पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन
लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 15 सप्टेंबर 2017
पर्यंत करावी लागणार आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक
खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू 1667
क्विंटल व तांदूळ 900, चिखली गहू 556 व तांदुळ 900, अमडापूर
गहू 338 व तांदूळ 100, दे.राजा गहू 700 व तांदूळ 700, मेहकर गहू 776 व तांदूळ 1000, डोणगांव गहू 338 व तांदूळ 100, लोणार गहू 1678 व तांदूळ 1200, सिं.राजा गहू 772 व तांदूळ 800, साखरखेर्डा गहू 614 व तांदूळ 250, मलकापूर गहू 1117 व
तांदूळ 500, मोताळा गहू 1411 व
तांदूळ 600, नांदूरा गहू 1148 व तांदूळ 600, खामगांव गहू 1204 व तांदूळ 350,
शेगांव गहू 563 व तांदूळ 250, जळगांव जामोद गहू 341 व तांदूळ 450, संग्रामपूर गहू 738 व तांदूळ 610
क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 13 हजार 960 व तांदूळ 9 हजार 310 क्विंटल पूरवठा
करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे
मासिक नियतन जाहीर
* 15 सप्टेंबर 2017 पर्यंत करावी लागणार धान्याची
उचल
बुलडाणा, दि 7 - राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांकरिता
माहे सप्टेंबर 2017 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे.
या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन लॉजिस्टीक्स प्रा. लि,
टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 15 सप्टेंबर 2017 पर्यंत धान्याची उचल
करावी लागणार आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक
खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू
4751 क्विंटल व तांदूळ 3674, चिखली गहू 4622 व तांदुळ 3094, अमडापूर
गहू 1198 व तांदूळ 750, दे.राजा गहू 2651 व तांदूळ 1667, मेहकर गहू 4790 व तांदूळ 2827, डोणगांव गहू 1773
व तांदूळ 806, लोणार गहू 2653
व तांदूळ 1800, सिं.राजा गहू 2682 व तांदूळ 1514, साखरखेर्डा गहू 2367
व तांदूळ 727, मलकापूर गहू 2770 व तांदूळ 2050, मोताळा गहू 3293 व तांदूळ 1850, नांदूरा गहू 1454 व तांदूळ
1850, खामगांव गहू 5323 व तांदूळ 4000, शेगांव गहू 2501 व तांदूळ 1450, जळगांव जामोद गहू 1198 व तांदूळ 1250, संग्रामपूर गहू 1353
व तांदूळ 950 क्विंटल आहे. अशाप्रकारे गहू 45 हजार 380 व तांदूळ 30 हजार 260 क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
****
प्रादेशिक सेनेच्या पर्यावरण
दलासाठी माजी सैनिकांसाठी कोल्हापुरात भरती
- 14 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणार भरती
बुलडाणा, दि. 7 :
कोल्हापुरातील कृषि महाविद्यालयाच्या पटांगणात 14 ते 19 सप्टेंबर या कालावधीत 136
इन्फन्ट्री बटालियन (टी.ए.)
महारच्यावतीने पर्यावरणीय दलासाठी राज्यस्तरीय भरती होणार आहे. प्रादेशिक सेनेतील
या भरतीसाठी केवळ सैन्यदलातून
निवृत्त झालेल्यांनाच अर्ज करता येणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्याची भरती
कोल्हापुरात होणार आहे.
भरती प्रक्रिया झाल्यानंतर 136
टी.एस.बटालियनचा तळ औरंगाबादमध्ये असेल. भरतीसाठी अर्ज करणारा
उमेदवार निवृत्त सैनिक असणे आणि
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. ही भरती 14 आणि 15, 16 आणि 17,
18 आणि 19 सप्टेंबर अशी तीन टप्प्यात होणार असून प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या
जिल्ह्यातील
उमेदवारांसाठी होणार आहे.
भरतीसाठी पात्रतेच्या अटी आणि
वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे- सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर 5 वर्षाच्या
आतील सर्व जवान आणि जे सी ओ
यांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा याप्रमाणे-माजी सुभेदार 48 वर्ष, माजी
नायब सुभेदार/हवालदार 45 वर्ष,
माजी सैनिक 42 वर्ष वयाच्या 50 वर्षापर्यंत त्यांना सेवा बजावता येणार आहे.
सेवानिवृत्तीवेळी कोणत्याही
पदावरती असलेल्या उमेदवाराला शिपाई म्हणूनच भरती केले जाईल तर ज्युनिअर कमिशंड
ऑफिसर यांना नायब सुभेदार
म्हणून भरती केली जाणा आहे. सैन्य दलातून सेवानिवृत्ती झालेल्यांना पहिल्यांदा दोन
वर्षासाठी रुजू करुन घेण्यात
येईल. त्यानंतर त्या व्यक्तीचे कार्य तपासून एक वर्षासाठी त्यात वाढ करण्यात येईल.
जर
त्यांचे कार्य असमाधानकारक असेल
तर कार्यमुक्त केले जाईल. अर्जदार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे अपेक्षित आहे
तसेच त्याचे चारित्र्य स्वच्छ
असावे. अर्जदार विरोधात एफ.आय.आर/पोलीस तक्रार झालेली असून नये तसेच त्याला
कोणत्याही न्यायालयाने शिक्षा
दिलेली असू नये.
एकापेक्षा अधिक विवाह केलेल्यांचा अर्ज
स्वीकारला जाणार नाही. अर्जदार केवळ महाराष्ट्र राज्यातील
रहिवासी असणे अपेक्षित आहे. भरती
केवळ गुणवत्तेवर आणि उपलब्ध जागांच्या आधारावरच केली जाणार आहे. या
ठिकाणी झालेली सेवा कोणत्याही
पेन्शनसाठी पात्र होणार नाही. अपात्र आणि अयोग्य अर्जदारांना सेवेतून कमी केले
जाईल. पात्र अर्जदारांची वैद्यकीय
चाचणी केली जाणार आहे.
शारीरिक पात्रता- किमान 160 सेंटीमीटर उंची, वजन
किमान 50 किलो, छाती 82 सेंटीमीटर. शारीरिक
क्षमता- 7 मिनिट 9 सेकंदमध्ये 1
मैल धावण्याची क्षमता, 9 फूट लांब उडी, उंचीवरील मचाणांवर चालण्याची क्षमता,
वयोमानानुसार बिम हाताळण्याची
क्षमता. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी होणार असून सर्व जिल्ह्यांची भरती
प्रक्रिया कोल्हापुरात राबवली जाणार आहे. भरतीमध्ये पात्र उमेदवारांची 136 टी ए
बटालियन औरंगाबाद मध्ये ठेवली जाईल.
दि. 14 आणि 15 सप्टेंबर 2017 या
दोन दिवसात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,
सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यासाठी भरती पक्रिया राबविण्यात येणार आहे.
दि. 16 व 17 सप्टेंबर 2017 रोजी
औरंगाबद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली,
अहमदनगर, धुळे, जळगांव, नंदुरबार
आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातच भरती प्रक्रिया होणार आहे.
दि. 18 आणि 19 सप्टेंबर 2017 या
दोन दिवशी अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, भंडारा,
चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया,
नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात भरती प्रक्रिया होणार आहे.
*******
शेतकरी लाभार्थ्यांचे गहू व तांदुळाचे मासिक नियतन
जाहीर
* 15 सप्टेंबर 2017 पर्यंत करावी लागणार धान्याची
उचल
बुलडाणा, दि 7 - राष्ट्रीय
अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत शेतकरी कुटूंबियांचे माहे सप्टेंबर
2017 चे नियतनातील गहू व तांदुळ धान्याची
शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश
पारित करण्यात आले आहे. या धान्याची उचल भारतीय अन्न महामंडळाच्या ब्लॅक स्टोन
लॉजिस्टीक्स प्रा. लि, टेंभुर्णा फाटा, खामगांव यांचे गोदामातून 15 सप्टेंबर 2017
पर्यंत धान्याची उचल करावी लागणार आहे.
गोदामनिहाय धान्याची वाहतूक
खालीलप्रमाणे करावी. बुलडाणा गहू
552 क्विंटल व तांदूळ 450, चिखली गहू 1926 व तांदुळ 400, अमडापूर
गहू 552 व तांदूळ 100, दे.राजा गहू 1071 व तांदूळ 500, मेहकर गहू 758 व तांदूळ 450, डोणगांव गहू 624 व
तांदूळ 150, लोणार गहू 1584 व
तांदूळ 400, सिं.राजा गहू 1505 व तांदूळ 300, साखरखेर्डा गहू 1050
व तांदूळ 110, मलकापूर गहू 592 व तांदूळ 250, मोताळा गहू 1560 व तांदूळ 200, नांदूरा गहू 1113 व तांदूळ 200,
खामगांव गहू 1035 व तांदूळ 200, शेगांव गहू 1406
व तांदूळ 200, जळगांव जामोद गहू 1357 व तांदूळ 200, संग्रामपूर गहू 555 व तांदूळ 200 क्विंटल आहे.
अशाप्रकारे गहू 17 हजार 240 व तांदूळ 4 हजार 310
क्विंटल पूरवठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
**********
उमाजी नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात
अभिवादन
बुलडाणा, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज 7 सप्टेंबर 2017
रोजी क्रांतीकारक उमाजी नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे यांनी
त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी तहसीलदार सुनील शेळके, शैलेश
काळे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment