Tuesday, 12 September 2017

football festival news 12.9.2017, dio buldana

कर्जमाफीचे अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज भरावे
-       जिल्हाधिकारी
•       15 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदत
•       अर्ज भरण्यासाठी उरले थोडे दिवस..
•       कर्जमाफीमध्ये ऑनलाईन नाव पाहण्यासाठी http://CSMSSY.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी
बुलडाणा, दि. 12 : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेनुसार 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरण्याची मुदत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले नसतील, अशा शेतकऱ्यांनी त्वरित ग्रा.पं. आपले सरकार *सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्रांच्या* माध्यमातून अर्ज भरून घ्यावे. मुदत संपत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
    जिल्ह्यात 1210 केंद्रांवर बायोमॅट्रीक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रांवरून विनाशुल्क शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरून घ्यावेत.  तसेच शेतकऱ्यांनी कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाईन पाहण्यासाठी http://CSMSSY.in या संकेतस्थळाला भेट देवून नावाची खात्री करून घ्यावी. जर नाव नसेल तर पुन्हा अर्ज भरून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
                                                                        असे पहा आपले नाव
सर्वप्रथम http://CSMSSY.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळाच्या खालील बाजूस अर्जदाराची यादी अशी लिंक असेल, ही लिंक निवडावी, त्यानंतर आपला जिल्हा, तालुका व गाव निवडावे. आपल्या गावाची यादी आपल्या समोर येईल. या यादीमध्ये आपले नाव असल्याची खातरजमा करावी. जर नाव नसेल तर अर्ज भरून घ्यावा.                                                                                              *******
नेहरु युवा केंद्राव्दारे निबंधस्पर्धा व लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन
बुलडाणा, दि. 12 : नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दीतक  या विषयांतर्गत निबंध स्पर्धा व लघुचित्रफीत स्पर्धेचे आयोजन 14 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येत असून जिल्हास्तरावर निवड झालेला स्पर्धक राज्यस्तरासाठी व राज्यस्तरावर निवड झालेला स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरणार आहे.
निबंध स्पर्धेचे विषय : मी स्वच्छतेसाठी काय करु शकतो / शकते ?
नियम व अटी : 250 शब्द मर्यादा. वेळ : 1 तास,  निबंध निळयाशाईने लिहावा, निबंध लेखन स्पर्ध दरम्यान मोबाईल/इलेक्टॉनिक वस्तूंचा वापर करता येणार नाही,  निबंध भाषा : इंग्रजी/ हिंदी /मराठी असावी.
लघुचित्रपट स्पर्धेचे विषय : माझा देश स्वच्छ करण्यासाठी माझे योगदान.
नियम : कालावधी : 2/3 मिनिट, स्पर्धकाने लिखीत स्वरुपात लघुपट तयार केला असल्याचे सादर करावे,  कोणत्याही वादाच्या बाबतीत त्यांना वैयक्तीक जबाबदार धरले जाईल, स्पर्धकाने ओळख म्हणून पुढील तपशिलाचा उल्लेख करावा, लघुचित्रपटाचे नांव, कालावधी, स्पर्धकाचे नांव, लिंग,वय,पुर्णपत्ता,ईमेल व मोबाईल क्रमांक  दयावा.
या स्पर्धेकरीता जिल्हास्तरावरील बक्षीस - प्रथम रु. 500, व्दितीय रु.300/- आणि तृतीय रु.200/-, राज्यस्तरावरील बक्षीस प्रथम रु. 5000, व्दितीय रु.3000/- आणि तृतीय रु.2000/-आणि राष्टीयस्तरावरील बक्षीस प्रथम रु. 25000, व्दितीय रु.10000/- आणि तृतीय रु.5000/- असे आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या महाविदयालयात अथवा नेहरु युवा केंद्र बुलडाणा कार्यालयात संपर्क साधावा व जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा युवा कार्यक्रम समन्वयक डॉ. दत्ता देशमुख यांनी केले आहे.
************
अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय.. जिल्ह्यात रंगणार फुटबॉल फेस्टीवल
  • जिल्ह्यातील 587 शाळांचा असणार सहभाग
  • जिल्ह्यात पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंट
  • 15 सप्टेंबर 2017 रोजी फुटबॉल फेस्टीवल
बुलडाणा, दि. 12 : जगात सर्वात जास्त लोकप्रीय असलेला सांघिक क्रीडा प्रकार म्हणजे फुटबॉल होय. या सर्वात लोकप्रीय खेळाचा 17 वर्षाखालील खेळाडूंचा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 6 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान होत असून या स्पर्धेचे 6 सामने राज्यात होत आहे. यामध्ये एकूण 24 देशांचे संघ सहभागी होणार आहे. राज्यात स्पर्धेच्या अनुषंगाने फुटबॉल खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी फुटबॉल मिशन 1 मिलीयन कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2017 रेाजी फुटबॉल फेस्टीवल रंगणार आहे. अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला आहे.
   फुटबॉल फेस्टीवलची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. देशमुख, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदी उपस्थितहोते.
   जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात फुटबॉलमय वातावरण निर्मितीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत असलेल्या शाळा व वसतीगृह तयारीला लागले आहे. फुटबॉलचे सामने 15 सप्टेंबर 2017 रोजी होणार असून यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
   जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील 587 शाळा या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे. तसेच स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या 287 शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल, तर शाळा नोंदणी न केलेल्या शाळांना प्रत्येकी 2 फुटबॉल देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात या फेस्टीवलमध्ये 30 महाविद्यालये, न.पच्या 8 शाळा सहभागी होणार असून 720 ठिकाणच्या मैदानांवर फुटबॉलचे प्रदर्शनीय सामने आयोजित केल्या जाणार आहे. फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने पाच ठिकाणी विशेष सेल्फी पॉईंटची उभारणी केली आहे. त्यामध्ये शेगांव येथील आंनद सागर प्रवेशद्वार, नांदुरा येथील हनुमान मुर्तीजवळ, लोणार सरोवराजवळ, सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्याजवळ आणि हिवरा आश्रम येथील विवेकानंद नगर या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यात किमान 50 हजार खेळाडू एकाच दिवशी फुटबॉल खेळतील याबाबत प्रयत्न सुरू आहेत.
    फुटबॉल फेस्टीवलमध्ये 30 बाय 20 मीटर प्रमाणे मैदान आखणी करण्यात येणार असून 15 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी 8 ते 12 सामने खेळविले जातील. प्लॅस्टीक कोन, विटा आदी साहित्य वापरून गोलपोस्ट तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक सामना हा 30 मिनीटांचा असणार आहे. मध्ये 5 मिनीटांचा ब्रेक असणार आहे. एका संघात पाच खेळाडू राहतील. तसेच दोन खेळाडू राखीव असतील. एकापेक्षा जास्त संघ असतील तेथे संघ क्रमांक ठरवून देण्यात येणार आहे, अशी माहितीही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली.  
                                                                        ****
जिल्हास्तर शालेय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धेचा सुधारीत कार्यक्रम.

            बुलडाणा, दि. 12 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन 14 ते 15 सप्टेंबर 2017 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, मलकापूर येथे करण्यात आले होते.  परंतु काही अपरिहार्य कारणास्तव सदरच्या स्पर्धांचे आयोजन 25 सप्टेंबर 2017 रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे करण्यात आलेले आहे.  तरी या तारीख व स्थळ बदलाची नोंद जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, एकविध खेळ संघटना, खेळाडू, पालक व नागरीकांनी घ्यावी असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment