Posts

Showing posts from March, 2026

शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

  बुलढाणा, दि. २ (जिमाका): माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेश दि. १७ फेब्रुवारी २०२६ नुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनामध्ये भास्तन, मच्छिद्रखेड, डोलारखेड, भोनगांव, पहूरपुर्णा, मनमगांव, गोळेगांव बु., पाडसुळ, आडसुळ, झाडेगांव, श्री क्षेत्र नागझरी, हिंगणा वेज, वरखेड बु., जवळा बु., जवळा पळ., गव्हाण, तित्रव, वरुड, तरोडा कसवा, शिरसगांव निळे, गायगांव बु., टाकळी विरो, चिंचोली का., अळसणा, सांगवा, जानोरी, तरोडा तरोडी, खेड, गोलखेड, पहूरजिरा, जलंब, मोरगांव दि., बेलूरा व माटरगांव बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्रभाग रचना कार्यक्रमानुसार तहसिलदार यांनी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीतून प्रभाग सीमा निश्चित करणे, तसेच तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे आदी टप्प्यांची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रच...

२ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी, ३ हजार ८२७ जणांचे आधार सीडिंग प्रलंबित; प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन

  बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांपैकी जिल्ह्यातील २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी तर ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) प्रलंबित असल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांनी आपली प्रलंबित ई-केवायसी, आधार सीडिंग तसेच बँक खाते DBT Enable करण्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे खाते DBT Enable नाही, त्यांनी India Post Payments Bank मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून DBT Enable करून घ्यावे, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६ हजार रुपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत राज्य शासनाकडून वार्षिक प्रत्येकी ६,००० रुपये असे एकूण १२ हजार रुपये प्रतिवर्षी शेतकरी कुटुंबांना वितरित केले जात आहेत. या लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग करणे अत्यावश्यक असून, प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकरी लाभा...

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव;बुलडाण्यात विक्री प्रदर्शन, मिनी सरस ५ ते ९ मार्चदरम्यान

  PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : ग्रामविकास विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विक्री प्रदर्शन, मिनी सरस व पौष्टिक तृणधान्य जिल्हास्तरीय कृषी महोत्सव तसेच PMFME योजनेंतर्गत खरेदी-विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि. ५ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे होणार आहे. अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके व पौष्टिक तृणधान्यांचा प्रसार, मूल्यवर्धन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि कृषी संलग्न विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत लाभार्थी व उत्पादक गटांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. कृषी महोत्सवात अन्नधान्य व पौष्टिक तृणधान्ये (नाचणी, ज्वारी, बाजरी आदी) यांचे प्रदर्शन व विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व स्वयं सहाय्यता गट (SHG) ...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविले

  बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार तसेच लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार यांचा समावेश आहे. सन 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी संबंधित पुरस्कारांकरिता शासनामार्फत दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र व्यक्ती व संस्थांनी संबंधित पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत. अर्ज संबंधित कार्यालयाकडून प्राप्त चेकलिस्टनुसार प्रस्ताव तयार करून चार प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांच्या कार्यालयात दि. 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत. सदर अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयात उपलब्ध असून महाराष्ट्र शा...

शेगाव तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ • एकाच छताखाली मिळणार १५ विभागांच्या सेवा

    • ५ मंडळांत शिबिर   • महसूल प्रशासनाचा लोकाभिमुख उपक्रम बुलढाणा (जिमाका), दि. ०२ : सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या शासकीय कामांमधील अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत “ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ ” शेगाव तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी खामगाव उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तहसील कार्यालय, शेगाव येथे विभाग प्रमुखांची बैठक पार पडली. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे अभियान राबवले जात आहे. शेगाव तालुक्यातील   जवळा बु. मंडळ येथे 7 मार्च रोजी, 14 मार्चला जलंब मंडळ, 10 एप्रिलला मनसगाव मंडळ, 8 मेला   शेगाव (शहर) मंडळ तर 15 मे रोजी माटरगाव मंडळ येथे शिबिर होणार आहे. या विशेष शिबिरात महसूल विभागासह महिला व बालविकास, आरोग्य विभाग, सहकार विभाग, निवडणूक विभाग, नगर पालिका, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र राज्य व...