Friday, 8 April 2022

DIO BULDANA NEWS 8.4.22

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हयातील बेरोजगाांना रोजगाराची सुवर्णसंधी

     बुलडाणा, (जिमाका) दि 8:  ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित  बेरोजगार युवक  युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेवुन  उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम  शासनाने ऑगष्ट 2019 पासुन  मुख्यमंत्री रोजगार ‍ निर्मिती  कार्यक्रम सुरु केलेला आहे.  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेस बुलडाणा ‍जिल्हयात गेल्या दोन  वर्षापासुन अतिशय  चांगल्या प्रकारे  प्रतिसाद मिळत आहे  मोठया प्रमाणात  कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असुन विविध बँक शाखांचे माध्यमातुन कर्जप्रकरणांना मंजुरी मिळत आहे.

    सन 2022-23 साठी शासनाने  जिल्हयास गेल्या वर्षापेक्षा चार पट अधिक निधी  उपलब्ध  करुन ‍ दिल्याने  एकुण 500 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातुन लाभ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या  योजनेतुन  मोठया  प्रमाणात रोजगार निर्मिती  होणार असल्याने मुदतीत लक्षांक पुर्ती  होण्यासाठी  वर्षाचे सुरवातीपासुन प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेत लाभ घेण्यासाठी कुठलेही स्था यी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी  ज्यांचे वय  18 वर्षे पुर्ण  अ धिकतम मर्यादा  45 वर्ष (अनु.जाती /जमाती /महिला/अपंग/माजी  सैनिक  यांना पाच वर्ष   शिथील आहे)  शैक्षणिक पात्रता रु.10 लाखावरील प्रकल्पासाठी  सातवी पास  तसेच रु.25 लाखावरील प्रकल्पासाठी  10 वी पास आहे.

  ेया योजनेत सेवा  उद्योग तसे च कृषी पुरक उद्योग/व्यवसायांसाठी  रु.10 लाख तसेच उत्पादन प्रकारच्या प्रवर्गातील प्रकल्पांसाठी रु.50 लाखापावेतो कर्ज   सुविधा उपलब्ध असुन एकुण प्रकल्प किंमतीचे शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पावेतो  मोठया प्रमाणावर अनुदान उपलब्ध होणार आहे  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असुन  आपला उद्यो ग  व्यवसाय  उभारणीसाठी  शासनाच्या https://maha-cmegp.gov.in/homepage संकेतस्थळावर भेट देवुन  आपले गांव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची निवड करुन  अर्ज  जवळच्या सेतु सुवि धा केंद्रात जावुन अथवा मोबाईल वरुन दाखल करावा बुलडाणा  जिल्हयातील प्रत्येक  गांव / शहरातील   सु शि क्षि त बेरोजगार   युवक युवतींनी या योजनेचा लाभ  घ्यावा  स्वत ची तसेच गावाची प्रगती साधावी. सदर बातमीपत्र आपल्या सर्व  गरजु मित्र  मै त्रि णी / नातेवाईक  यांना व्हॉटस ॲप / फेसबुक चे  माध्यमातुन   फॉरवर्ड   करुन उद्योजक होण्यासाठी सहकार्य करावे  असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बुलडाणा यांनी केले आहे.

****

कोविडमुळे निधन झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना धनादेश वितरण

  बुलडाणा, (जिमाका) दि 8: कोविड काळात शासकीय कर्तव्यावर असताना कोविडमुळे निधन झालेल्या शासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्या वारसांना 50 लक्ष रूपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार जिल्ह्यात अंत्री खेडेकर येथील अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा श्रीकिसन खेडेकर यांचे कोविडमुळे निधन झाले होते. तसेच भास्करराव शिंगणे विद्यालय, पळसखेड दौलत ता. चिखली येथील शिक्षक दिपक विणकर यांचेसुद्धा कोविड काळात कर्तव्यावर असताना निधन झाले. या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आज 8 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते 50 लक्ष रूपये आर्थिक मदतीचे धनादेश वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे, शिक्षणाधिकारी श्री. मुकूंद आदी उपस्थित होते.

                                                                                    ***************  

 

स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

 

  बुलडाणा, (जिमाका) दि 8: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती 6 एप्रिलपासून पुढील 10 दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या त्रयीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. समता कार्यक्रम राबविण्याचे नियोजन सामाजिक न्याय विभागाने केले आहे. त्यानुसार विभागाने जिल्ह्यात दहा दिवस दैनंदिन उपक्रम आयोजित केले आहे. त्याप्रमाणे 8 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपा लाभाच्या प्रमाणपत्राचे वितरण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी स्वाधार योजनेचे महत्व व योजनेच्या लाभाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विशेष अधिकारी श्री. धर्माधिकारी, सहायक लेखा अधिकारी श्री. गोटीवाल, समाज कल्याण निरीक्षक श्री. पर्वतकर, स्वाधार योजनेचे लाभार्थी कु. शिवानी अर्जुन गायकवाड, चि. कुणाल सोपान इंगळे, आदी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचलन श्री. बाहेकर यांनी केले.

                                                                        ******

ज्येष्ठ नागरिक शिबिर व मेळाव्याचे 9 एप्रिल रोजी आयोजन

  बुलडाणा, (जिमाका) दि 8: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्ताने 9 एप्रिल रोजी 2022 रोजी ज्येष्ठ नागरिक जनजागृती शिबिर व मेळाव्याचे आयोजन स्वामी विवेकानंद आश्रम, ता. मेहकर येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी सदर जनजागृती शिबिर व मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

                                                                        *******

सामाजिक समता सप्ताह निमित्ताने जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन

  • 11 एप्रिल रोजी वेबिनार, तर 12 एप्रिल रोजी एकदिवसीय शिबिर

  बुलडाणा, (जिमाका) दि 8: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे परिपत्रकानुसार 6 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्ताने जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार 11 एप्रिल रोजी https://meet.google.com/        tfn-zodq-zoc या संकेतस्थळावर दुपारी 4 ते 5 या वेळेत गुगल मिट प्रणालीद्वारे वेबीनार आयोजित करण्यात आले आहे. तर 12 एप्रिल रोजी शिवाजी महाविद्यालय, चिखली येथे जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अनुषंगाने एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  

   इयत्ता 11 व 12 वीत विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी, प्राधान्याने विज्ञान शाखेतील विद्यार्थी / सीईटी देणारे, डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेले विद्यार्थ्यांनी तारखेस व महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचा परिपूर्ण ऑनलाईन अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे तसेच मूळ कागदपत्रांसह हजर रहावे. सदर दिवशी समितीतील अधिकारी व कर्मचारी वर नमूद तारखेड या महाविद्यालयात उपस्थित राहून अर्ज स्वीकारणार आहेत. तसेच वैधता प्रमाणपत्र देण्याची पुढील कार्यवाही करणार आहे.

    इयत्ता 11 व 12 वीत विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी ज्यांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले नाहीत. त्यांनी 12 एप्रिल रोजी शिवाजी महाविद्यालय, चिखली येथे परिपूर्ण ऑनलाईन अर्ज, आवश्यक कागदपत्रे व मूळ कागदपत्रांसह शिबिरामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विजय साळवे यांनी केले आहे.

                                                                                                ***********

 

--

No comments:

Post a Comment