Tuesday, 12 April 2022

सघन कुक्कुट विकास गट स्थापन करण्यासाठी मेहकर व नांदुरा तालुक्याची निवड

सघन कुक्कुट विकास गट स्थापन करण्यासाठी मेहकर व नांदुरा तालुक्याची निवड

  • 30 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 12: सन 2021-22 करीता राज्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गट स्थापन करणे अंतर्गत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. पशुपालकांनी संबंधित राज्यातील परसातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर 50 टक्के अनुदानावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापनाकरण्या करीता सन 2021-22 करीता मेहकर व नांदुरा तालुक्याची निवड करण्यात आली आहे.

     योजनेतील उदिष्टानुसार निवड समिती मार्फत प्रती तालुका 1 लाभार्थ्यांची निवड करावयाची असल्याने, सर्व प्रवर्गातील इच्छुक पशुपालकांकडून संबंधित तालुक्यांतून पशूधन विकास अधिकारी (वि), पंचायत समीती स्तरावर उपलब्ध असलेले अर्ज दिनांक 13 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत दोन प्रतित पशुसंवर्धन विभाग, पशूधन विकास अधिकारी (वि), पंचायत समीती स्तरावर सादर करावे. सदर पशुपालकाकडे स्वत:ची 2500 चौ.फुट जागा  असावी, दळणवळण, पाण्याची व्यवस्था व विद्युतीकरणाची सुविधा असावी. या योजनेमध्ये प्रकल्पाची किंमत 10 लक्ष 26 हजार असुन प्रकल्प शासनाच्या मार्गदर्शक सुचना व शासन निर्णयानुसार पुर्णता कार्यान्वीत झाल्यानंतर 50 टक्के अनुदान रूपये 5 लक्ष 13 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरण (DBT) करण्यात येणार आहे. या बाबतची सविस्तर माहीती पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती यांच्याकडे उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बी.एस.बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, बुलडाणा यांनी केले आहे.

                                                                                                ************ 

No comments:

Post a Comment