वैरणाकरीता शेवगा लागवडीसाठी 30 हजार रूपये अनुदान उपलब्ध
- 30 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 12: केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रती हेक्टर 30 हजार रूपये प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
वैरणीसाठी शेवगा लागवड योजनेअंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाण्याची किंमत 6 हजार 750 व उर्वरित 23 हजार 250 अनुदान लाभार्थ्यांना हे दोन टप्प्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. यात पशुपालकांना बियाण्याचा थेट पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी, पशुपालक यांनी संबंधित तालुक्यातून पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असलेले अर्ज दिनांक 13 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत दोन प्रतित पशुसंवर्धन विभाग, पशूधन विकास अधिकारी (वि), पंचायत समीती स्तरावर सादर करावे. या बाबतची सविस्तर माहीती पशूधन विकास अधिकारी (वि) पंचायत समीती यांच्याकडे उपलब्ध आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बी.एस.बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, बुलडाणा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment