Tuesday, 14 January 2020

DIO NEWS BULDANA 14.1.2020




संत चोखामेळा जन्मस्थान विकास आराखडा पूर्ण करणार
-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
·        संत चोखामेळा जन्मोत्सव यांचा 752 वा उत्साहात साजरा
     बुलडाणादि. 14 : या महिन्यात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, संत चोखामेळा जन्मोत्सव सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात साजरे करण्यात येतात. त्यामुळे मतदारसंघात चैतन्य निर्माण होते. संत चोखामेळा जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. येथील विकासाकरीता 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मागील काळात 50 लक्ष रूपये मिळाले. उर्वरित निधी मिळवून हा विकास आराखडा पूर्ण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
   मेहुणा राजा. ता. दे.राजा येथे संत चोखा मेळा यांचा 752 वा जन्मोत्सव सोहळा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ,  जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जि.प सभापती दिनकर देशमुख, दे.राजा पंस सभापती हरीष शेटे, जि.प सदस्य सर्वश्री मनोज कायंदे, रियाजखॉ पठाण, शिला शिंपणे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसिलदार सारीका भगत,  मंगळवेढा येथील अप्पासाहेब पुजारी,  शिवराज महाराज, रजनी शिंगणे, प्रा. कमलेश खिल्लारे, पं.स सदस्य रेणुका बुरकूल, माजी जि.प सदस्य बाबुराव नागरे, शिक्षणाधिकारी एजाज खान, सरपंच राधा भरत कांबळे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
   संत चोखामेळा हे संत परंपरेतील मोठे नाव असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, संत चोखामेळा यांचे मेहुणा राजा हे गांव सर्व जाती – धर्माचे आहे. येथे सर्व जाती – धर्मातील नागरिक गुण्या गोविंदाने नांदतात. येथील केवळ भौतिक विकासच नाही, तर पर्यटनीयदृष्ट्या विकास झाला पाहिजे. या आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
  याप्रसंगी सभापती श्री. शेटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागिल भूमिका त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान प्रा. कमलेश खिल्लारे, मंगळवेढा येथील श्री. पुजारी, दिपक खार्डे यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मागील काळात याठिकाणी केलेली विकासकामे सांगितली. हर्षवर्धन सपकाळ यांनी हा जन्मोत्सव सोहळा लोकोत्सव होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाचे संचलन श्री. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संत चोखामेळा यांचे पूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर मेहुणा राजा गावातील संत चोखामेळा यांच्या दिंडीमध्ये सहभागी होत त्यांचे पालखीचे दर्शन घेतले.
*****
नारायणखेड उपसा सिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
     बुलडाणादि. 14 : दे. राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील डाव्या मुख्य कालव्यावरील नारायणखेड उपसा सिंचन योजनेचे जलपूजन व उद्घाटन आज 14 जानेवारी 2020 रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले.  सुरूवातीला नारायणखेड येथील वितरण कुंडामध्ये जलपूजन करून उपसा सिंचन योजनेच्या फलकाचे फित कापून अनावरण करण्यात आले. त्यानंतर पंपहाऊस, गावातील नळयोजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, खडकपूर्णा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, उपअभियंता श्री. विश्वकर्मा, ॲड काझी आदींसह लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
  सदर उपसा सिंचन योजनेकरीता 115 अश्वशक्तीचे दोन पंप आहेत. या योजनेमुळे नारायणखेड, सरंबा, दे.मही, धोत्रा नंदई या गावातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेतंर्गत 1019 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सदर सिंचन 7.70 किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा व 9 लघु कालव्यांद्वारे होते.
  याप्रसंगी नारायणखेड पाणी वापर संस्थेचे गजानन चेके, पंढरी गिते, शिवानंद मुंडे व अन्य लाभधारक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक अभियंता योगेश कापडणीस, खडकपूर्णा प्रकल्पाचे जी. बी खोत, नितीन डोईफोडे, श्री. व्यवहारे, श्रीमती दिशा चिकटे, श्री. उईके, प्रकाश वीर, श्री. दोडके,श्री. बहुरे आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
                                                                        ******

No comments:

Post a Comment