क्रीडांगण विकास अनुदान योजनेकरीता प्रस्ताव सादर करावे
· जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन
· 30 जानेवारी 2020 पर्यंत अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 16 : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अनुषंगाने तसेच ग्रामीण तथा शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या अनुदानासाठी सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
सदर योजनेअंतर्गत अनुदानासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या पात्र संस्थांसाठी प्राधान्यक्रम पुढीलप्रमाणे: स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था असावी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालय तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय ग्रामीण रुग्णालय, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवुन 5 वर्ष पुर्ण झालेले आहे, असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील. क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय कार्यालये हे अनुदानासाठी पात्र राहतील.
क्रीडांगण विकास अनुदानाअंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मी. अथवा 400 मी. चा धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे / तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह / चेंजींग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर माततीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर अथवा आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे आदी बाबींसाठी अनुदान देण्यात येईल.
अनुसुचित जाती उपयोजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करतांना सदर क्रीडांगण मागासवर्गीय वस्तीत असल्याबाबतचे गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उपरोक्तप्रमाणे नमुद संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथुन प्राप्त करुन घेऊन. आवश्यक कागदपत्रांसह द्वि-प्रतीत परिपुर्ण प्रस्ताव दिनांक 30 जानेवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क साधवा असे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करावे
· सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजनेतंर्गत मिळणार अनुदान
· 30 जानेवारी 2020 पर्यंत अंतिम मुदत
बुलडाणा, दि. 16 : राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अनुषंगाने तसेच ग्रामीण / शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्याकरीता, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा मार्फत, व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्याकरीता (सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजना या करीता) परिपुर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर योजनेअंतर्गत अनुदानासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या पात्र संस्थांसाठी प्राथम्यक्रम पुढीलप्रमाणे असा आहे.
शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कॅन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या शाळा व महाविद्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाद्वारे मान्यता दिलेल्या शैक्षणिक शाळा व महाविद्यालयांना शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवुन 5 वर्ष पुर्ण झालेले आहे असे शाळा व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील. क्रीडा विभागाच्या विविध समित्या तसेच पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग, शासकीय कार्यालये/ जिमखाना हे अनुदानासाठी पात्र राहतील.
व्यायामशाळा विकास अनुदानाअंतर्गत किमान 500 चौ.फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधकाम करणे, याशिवाय बांधकामामध्ये कार्यालय तसेच भांडारगृह, प्रसाधनगृह आदी बाबींचा समावेश असावा, व्यायामशाळा नुतणीकरण व दुरुस्ती करणे, जुन्या नियमानुसार बांधकाम पुर्ण झालेल्या व्यायामशाळा व वर उल्लेखीत क्षेत्रफळाच्या नविन व्यायामशाळांना अत्याधुनिक व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे, खुली व्यायामशाळा उभारणे (Open Gym) या बाबींसाठी किमान 7 लक्ष रूपये इतके अनुदान मंजुर करण्यात येईल.
अनुसुचित जाती उपयोजनेसाठी शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीच्या गावातील आणि आदर्श गावातील तसेच शासनाने घोषित केलेल्या आदिवासी भागातील गावांना अनुदान मंजुर करण्यात येईल. प्रस्ताव सादर करतांना सदर व्यायामशाळेची जागा दलीत वस्तीत असल्याबाबतचे संबंधीत गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच सर्वसाधारण योजनेअंर्गत अनुदान प्राप्तीकरीता शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीच्या गावाची व संबंधीत प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. उपरोक्तप्रमाणे नमुद संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथुन प्राप्त करुन घेऊन, आवश्यक कागदपत्रांसह द्वि-प्रतीत परिपुर्ण प्रस्ताव 30 जानेवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावेत तसेच अधिक माहिती करीता या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
वीरपत्नी व विधवा पत्नी यांची माहिती तात्काळ सादर करावी
· जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन
बुलडाणा, दि. 16 : जिल्ह्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नी व सेवारत सैनिक विधवा पत्नी यांचा अहवान सेना मुख्यालय, पुणे यांना सादर करावयाचा आहे. तरी वीरपत्नी व सेवारत सैनिक विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे आपले ओळखपत्र, डिस्जार्ज बुक, पीपीओ, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, इसीएचएस कार्ड, कॅन्टीन कार्ड व एटीएम कार्ड यांची छायांकित प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील कल्याण संघटक सुर्यकांत सोनटक्के यांच्याकडे तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
‘फिट इंडिया’ सायकल रॅलीचे 18 जानेवारी रोजी आयोजन
बुलडाणा, दि. 16 : फिट इंडिया मुव्हमेंट व राष्ट्रीय युवा सप्ताहाअंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा सायकलींग असोसिएशन व जिल्ह्यातील सायकल प्रेमी नागरिकां च्यावतीने शनिवार, दि. 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आले आहे. या रॅलीची सुरूवात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथून होणार आहे. रॅली जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, पंचशील चौक, त्रिशरण चौक, सर्क्युलर रोड, राऊत मंगल कार्यालय, तहसिल कार्यालय मार्गे जावून पुन्हा जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथे पोहोचणार आहे. रॅलीचा याठिकाणी समारोप होणार आहे. तरी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी आपल्या स्वत:च्या सायकलसह या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment