Wednesday, 15 January 2020

DIO BULDANA NEWS 15.1.2020

एकलव्य रेसिडेंशियल स्कुलमध्ये प्रवेशाकरीता अर्ज करावे
·        विद्यार्थ्यांनी 24 जानेवारी पर्यंत सादर करावे
 बुलडाणा, दि. 15 : इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लीक स्कुलमध्ये दिनांक 15 मार्च 2020 रोजी स्पर्धा परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. सदर परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होणार आहे.  परीक्षेचे ठिकाण शासकीय आश्रमशाळा कोथळी ता. बार्शिटाकळी व शासकीय आश्रमशाळा घाटबोरी ता. मेहकर राहणार आहे.  विद्यार्थ्यांनी आपले अर्ज दिनांक 24 जानेवारी 2020 पर्यत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे.
    प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता 5, 6, 7 व 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील. सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परीक्षचे आवेदन पात्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेवून, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोलाकडे सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांचेकडे विनामुल्य  उपलब्ध  आहेत. सदर अर्ज 24 जानेवारी 2020 पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापक यांच्यामार्फत सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले  आहे.
                                                                        *******
अमरावती येथे ‘शोभिवंत मत्स्यव्यवसाय कौशल्य विकास’ कार्यक्रमाचे आयोजन
·        जिल्ह्यातील मच्छीमार क्षेत्रातील नागरिकांनी प्रदर्शनात सहभागी व्हावे
·        सहभाग नोंदणीचा अर्ज मत्स्यव्यवसाय कार्यालयात उपलब्ध
·        इच्छूकांनी 18 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज द्यावे
बुलडाणा दि. 15 :   प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय अमरावती येथे ‘शोभिवंत मत्स्यव्यवसाय कौशल्य विकास’ या तीन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मत्स्यिकी विकास बोर्ड हैद्राबाद व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जानेवारी ते 24 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात आले आहे.
    सदर तीन दिवसीय कौशल्य विकास कार्यक्रमाचे कार्यशाळेमध्ये प्रात्याक्षिकासह शोभिवंत मत्स्यव्यवसायाचे तंत्र तसेच यातील संधी, राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना आदी विषयानुषंगाने तज्ज्ञ अधिकारी यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  त्याचप्रमाणे या कार्यक्रमात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती  व महिला उमेदवारांना प्राधन्य राहणार आहे. एका प्रशिक्षण कार्यक्रमात प्रति दिन 500 रूपये भत्ता अनुज्ञेय राहील. प्राथम प्राप्त 25 प्रशिक्षणार्थी यांचेसाठी हा भत्ता राहणार आहे.
               जिल्ह्यातील इच्छूक मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यउद्योजक, मत्स्यप्रेमी, शोभिवंत माशांचा व्यवसाय करणारे किंवा व्यवसाय करण्यास इच्छूक असणाऱ्या तसेच आवड असणाऱ्या उमेदवारांकरीता  कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त (तांत्रिक), पहिला मजला, प्रशासकीय इमारत, बस स्थानकासमोर बुलडाणा येथील कार्यालयामधून प्राप्त करुन घ्यावा. तसेच सदर कार्यालयात 18 जानेवारी 2020 पर्यंत सादर करण्यात यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) स. इ. नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*******
  शेतकरी लाभार्थ्यांसाठी गहू व  तांदूळ धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 जानेवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 15 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत फेब्रुवारी 2020 चे नियतनातील एपीएल केशरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदुळाची भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 जानेवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण गहू 2 रूपये प्रति किलो प्रति लाभार्थी 4 किलो,  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो प्रति लाभार्थी  1 किलो आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 1474 व तांदूळ 368 क्विंटल, बुलडाणा : गहू 975 व  तांदूळ 244,  दे.राजा गोदामाकरीता गहू 932 व तांदूळ 233, अमडापूर : गहू 320 व तांदूळ 80,   मोताळासाठी गहू 776 व तांदूळ 194, नांदुरासाठी गहू 1256 व तांदूळ 314, खामगांव गोदामकरीता गहू 1177 व तांदूळ 293, शेगांवकरीता गहू 1088 व तांदूळ 272, जळगांव जामोदकरीता गहू 1051 व तांदूळ 263, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 784 व तांदूळ 196, मेहकरसाठी गहू 1202 व तांदूळ 301, लोणारकरीता गहू 1215 व तांदूळ 304 क्विंटल, सिंदखेड राजाकरीता गहू 1108 व तांदूळ 277 क्विंटल, मलकापूर : गहू 935 व तांदूळ 234, साखरखेर्डा : गहू 493 व तांदूळ 123 आणि डोणगांवकरीता गहू 494 व तांदूळ 124 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 15280 व तांदूळ 3 हजार 820 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
****
प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 जानेवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणादि‍ 15 -  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2020 चे नियतनातील गहू व तांदूळाची भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 जानेवारी  2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे परिमाण हे गहू 3 किलो प्रति लाभार्थी असून वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो आहेत. तसेच तांदुळासाठी 3 रूपये प्रतिकिलो दर व परिमाण 2 किलो प्रति लाभार्थी आहे.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी. चिखली गोदामासाठी गहू 4268  क्विंटल व तांदूळ  2846, बुलडाणा : गहू 5026 क्विंटल व तांदूळ 3351,  दे.राजा गोदामाकरीता गहू 2087 क्विंटल व तांदूळ 1392, अमडापूर : गहू 1387 व तांदूळ 925, मोताळासाठी गहू 2959 व तांदूळ 1973, नांदुरासाठी गहू 2997 व तांदूळ 1998, खामगांव गोदामा करीता गहू 5464 व तांदूळ 3643,  शेगांवकरीता गहू 2631 व तांदूळ 1754जळगांव जामोदकरीता गहू 2747 व तांदूळ 1832, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 2556 व तांदूळ 1702, मेहकरसाठी गहू 3721 व तांदूळ 2481, लोणारकरीता गहू 2471 व तांदूळ 1648, सिंदखेड राजाकरीता गहू 1667 व तांदूळ 1112, मलकापूर : गहू 3017 व तांदूळ 2011, साखरखेर्डा : गहू 1265 व तांदूळ 844 आणि डोणगांवकरीता गहू 1317 व तांदूळ 878 क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 45580 तांदूळ 30390 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ********
 अंत्योदय लाभार्थ्यांसाठी धान्याचे वाहतूक आदेश पारीत
  • 31 जानेवारी 2020 पर्यंत करावी लागणार धान्याची उचल
बुलडाणा,दि‍ 9 - राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत फेब्रुवारी 2020 चे नियतनातील अंत्योदय योजने करीता गहू व तांदूळाची  भारतीय अन्न महामंडळाच्या वखार महामंडळ टेंभूर्णा, खामगांव यांचे गोदामातून शासकीय गोदामात वाहतूक करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर धान्याची उचल गोदामातून 31 जानेवारी 2020 पर्यंत करावी लागणार आहे. या लाभार्थ्यांसाठी वाटपाचे दर गहू 2 रूपये प्रतिकिलो व  तांदूळ 3  रूपये प्रतिकिलो आहे. तर परिमाण प्रति कार्ड 15 किलो गहू व तांदुळ 20 किलो आहेत.
     गोदामनिहाय धान्याची वाहतूक खालीलप्रमाणे करावी.   चिखली गोदामासाठी गहू 514 क्विंटल व तांदूळ 685, बुलडाणा : गहू 1050  क्विंटल व तांदूळ  1399,  दे.राजा गोदामाकरीता गहू 427 क्विंटल व तांदूळ 569, अमडापूर : गहू 175  क्विंटल व तांदूळ 233,  मोताळासाठी गहू 882  क्विंटल व तांदूळ  1174, नांदुरासाठी गहू 912 क्विंटल व तांदूळ  1215, खामगांव गोदामकरीता गहू 755 क्विंटल व तांदूळ 1007, शेगांवकरीता गहू 456 क्विंटल व तांदूळ  608जळगांव जामोदकरीता गहू 757 क्विंटल व तांदूळ 1008, संग्रामपूर गोदामाकरीता गहू 913 क्विंटल व तांदूळ 1217, मेहकरसाठी गहू 635  क्विंटल व तांदूळ  846, लोणारकरीता गहू 975 क्विंटल व तांदूळ 1299, सिंदखेड राजाकरीता गहू 418 क्विंटल व तांदूळ 558, मलकापूर : गहू 680 क्विंटल व तांदूळ 907,  साखरखेर्डा गहू 232 क्विंटल व तांदूळ  309 आणि डोणगांव करीता गहू 199  क्विंटल व तांदूळ 266  क्विंटल असणार आहे. अशाप्रकारे एकूण गहू 9980 व तांदूळ 13 हजार 300 क्विंटल  पूरवठा करण्यात येणार  आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                            *****
श्री स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल
 बुलडाणा, दि. 15 : हिवरा आश्र ता. मेहकर येथे 17 जानेवारी 2019 पर्यंत  श्री  स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा मोठया प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. या सोहळयाला जिल्ह्यातून व राज्यभरातुन मोठया संख्येने अनेक संघटनांचा सहभाग असतो. श्री स्वामी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा स्थळ राज्यमार्ग क्रमांक 206 वर असून  त्यामुळे या सोहळयास उपस्थित राहणाऱ्या जनतेच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या सुनियमांसाठी या महामार्गावरील वातुकीस पर्यायी मार्गाने वळविणे क्रमप्राप्त आहे.
    मुंबई पोलीस कायद्याचे कलम 33 (1) सह कलमान्वये बुलडाणा पोलीस अधिक्षक यांनी  बुलडाणा राज्यमार्ग 206 वरील मेहकर ते चिखली मार्गे हिवरा आश्रमकडे  येणारी वाहतूक दि. 17 जानेवारी 2020 पर्यंत  सकाळी 10 वाजेपासून ते सायं 7 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविली आहे. सध्याच्या प्रचलित मार्गानुसार  मेहकर – हिवरा आश्रम- लव्हाळा फाटा- चिखली  या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्ग मेहकर- देऊळगांव माळी फाटा - साखरखेर्डा - लव्हाळा फाटा – चिखली अशी वळविण्यात आली आहे. तसेच शासकीय वाहने (केंद्र सरकार, राज्य सरकार) सर्व अति महत्वाच्या व्यक्तींची वाहने,  तात्काळ सेवा - रुग्णवाहीका, शववाहीनी, अग्नीशामक दलाची वाहने व जिवनावश्यक वस्तुंची वाहने वगळता सर्व वाहनासाठी नमुद कालावधी करीता लागु राहील, असे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ यांनी कळविले आहे.
                                                                        ******
जिल्हा बँकेने लेखी संमतीपत्र दिलेल्या 1781 कर्जदार सभासदांच्या कर्जाचे केले पुनर्गठण
 बुलडाणा, दि. 15 : सन 2018-19 च्या हंगामात संलग्न असलेल्या ग्रामसेवा, विविध कार्यकारी सहकारी संस्थामार्फत 12 हजार 958 कर्जदार शेतकऱ्यांना 5129.11 लाख रूपयांचे पिक कर्ज वाटप केलेले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सदर सभासद विहीत मुदतीत कर्जाची परतफेड करू शकत नसल्यामुळे 1781 कर्जदार सभासदांनी पुनर्गठण सवलतीचा लाभ मिळण्याकरीता लेखी संमती पत्र दिले आहे. त्यानुसार बँकेने संपूर्ण जिल्ह्यात लेखी संमती पत्र दिलेल्या 1781 कर्जदार सभासदांच्या कर्जाचे पुनर्गठन संबंधित ग्रामसेवा अथवा विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या ठरावानुसार केलेले आहे.
   सन 2018-19 च्या हंगामात शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती घोषीत केलेली आहे. त्यानुसार बाधित क्षेत्रातील कर्जदार सभासद विहीत मुदतीत कर्जभरणा करू शकत नसल्यामुळे त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणेबाबत लेखी संमतीपत्र घ्यावे व कर्जवसुलीस स्थगिती द्यावी, अशा सुचना प्राप्त झालेल्या आहेत, असा खुलासा मुख्याधिकारी, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक यांनी केला आहे.
                                                                                    ******
विषय समिती सभापती पदाची 21 जानेवारी रोजी निवडणूक
 बुलडाणा, दि. 15 : जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूकीसाठी विशेष सभेचे 21 जानेवारी 2020 रोजी शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, बुलडाणा येथे आयोजन करण्यात आले आहे.त्याबाबतच्या नोटीसेस संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना तहसिलदार यांचेमार्फत बजावण्यात आलेल्या ओहत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

No comments:

Post a Comment