पुनर्रचित हवामान आधारीत
फळपिक विम्याचे जिल्ह्यात 8 फळपिकांना ‘विमा कवच’
- संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब व लिंबू या फळपिकांचा
समावेश
- गारपीट नुकसानकरीता स्वतंत्ररित्या विम्याची मदत
बुलडाणा, दि. 3
- सन 2017-18 साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक
विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब व लिंबू
या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिक निहाय विमा संरक्षण
रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या फळपिकांना विम्याचे कवच
प्राप्त झाले आहे.
ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची असून बिगर
कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छीक आहे. योजना 4 समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह
एक मध्ये इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व तीनमध्ये एचडीएफसी
इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह 4 मध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स
कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना विमा हप्ता दर संरक्षीत रक्कमेच्या
पाच टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांनी भरावयाची
आहे. उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे.
आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळींब या
पाच फळपिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष
फळपिकाकरीता 15 ऑक्टोंबर, लिंबूकरीता 14 नोव्हेंबर, आंबा फळपिकासाठी 31 डिसेंबर,
तर संत्रा व काजू फळपिकाकरीता 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत प्रस्ताव बँकांना सादर
करावयाचे आहेत.
योजनेनुसार कमी /जास्त पाऊस, वेगाचा वारा,
गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत
शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी
कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व
संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता
जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
अशी आहे संरक्षीत रक्कम व विम्याचा हप्ता (प्रति हेक्टर)
द्राक्ष: संरक्षित रक्कम - 3 लक्ष 73 हजार 300 व विम्याचा हप्ता 18 हजार 665 रूपये, केळी : संरक्षित रक्कम 1 लक्ष 60 हजार व विम्याचा हप्ता 8 हजार, आंबा: संरक्षित रक्कम – 1 लक्ष 46 हजार 700 व विमा हप्ता 7 हजार 335 रूपये, डाळींब : संरक्षित रक्कम – 1 लक्ष 46 हजार 700 व हप्ता 7 हजार 335, संत्रा : संरक्षित रक्कम – 93 हजार 300 व विमा हप्ता 4 हजार 665, मोसंबी : संरक्षित रक्कम – 93 हजार 300 व विमा हप्ता 4 हजार 665, लिंबू : संरक्षित रक्कम – 80 हजार व विमा हप्ता 4 हजार आणि पेरू : संरक्षित रक्कम – 66 हजार 700 व विमा हप्ता 3 हजार 335 रूपये असा आहे.
फळपिक विमा योजनेत समाविष्ट तालुके व महसूल मंडळ
द्राक्ष: तालुके व मंडळ- बुलडाणा : बुलडाणा, मोताळा : बोराखेडी, जळगांव जामोद : जळगाव जामोद, संग्रामपूर : बावनबीर व सोनाळा. मोसंबी : सिं.राजा : सिं.राजा, सोनोशी, किनगांव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, डाळींब: चिखली- पेठ, चिखली, चांधई, हातणी, धोडप, अमडापूर, एकलारा, उंद्री, कोलारा, शेलगांव अटोळ, मेरा खु. बुलडाणा- बुलडाणा व धाड, मोताळा- शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धामणगांव बढे, जळगांव जामोद- पिंपळगांव काळे, पेरू : बुलडाणा-साखळी बु, चिखली- चिखली, हातणी व चांदई, मेहकर- डोणगांव, हिवरा आश्रम, शेलगांव देशमुख. केळी: बुलडाणा-बुलडाणा, मोताळा- बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी, पिंपळगांव देवी, धामणगांव बढे, रोहीणखेड, जळगांव जामोद- जळगांव, जामोद, संग्रामपूर- बावनबीर, सोनाळा व संग्रामपूर, चिखली- मेरा खु, खामगांव- हिवरखेड, काळेगांव, वझर, लाखनवाडा, पिंपळगांव राजा, मेहकर- डोणगांव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ, नायगांव द. संत्रा: मेहकर- डोणगांव, हिवरा आश्रम, जानेफळ, नायगांव द, मेहकर, शेलगांव देशमुख, लोणार : बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर, लोणार व हिरडव, खामगांव : आडगांव, लाखनवाडा,हिवरखेड, काळेगांव, वझर, संग्रामपूर : बावनबीर व सोनाळा, सिंदखेड राजा: शेंदूर्जन, साखरखेर्डा व मलकापूर पांग्रा, दे.राजा: अंढेरा व दे.मही, जळगांव जामोद- जामोद. आंबा : सिं.राजा- सिं.राजा,
*******
उडीद व मुग खरेदीसाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्र
- नाफेडच्यावतीने केंद्र शासनाच्या हमीभावानुसार खरेदी
- आज पासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी
- तालुका खरेदी विक्री संघ व चिखली येथे जिनिंग
प्रेसिंग सहकारी संस्थेमार्फत ऑनलाईन नोंदणी
बुलडाणा, दि. 3
- हंगाम 2017-18 मध्ये राज्यात
नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार उउीद व मूग
शेतमालाची खरेदी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या
प्रक्रियेकरीता 3 ऑक्टोंबर 2017 पासून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू
करण्यात आली आहे. जिल्ह्यात शेगांव, चिखली, बुलडाणा, खामगांव, मलकापूर, लोणार,
मेहकर, संग्रामपूर, सिंदखेड राजा व दे.राजा असे 10 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली
आहे. त्यासाठी जिल्ह्यात चिखली येथे तालुका जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था व
उर्वरित ठिकाणी तालुका खरेदी-विक्री
सहकारी संस्थांमार्फत ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी तसेच त्यानंतरची प्रक्रिया पार
पाडण्यात येणार आहे.
तरी उडीद-मूग उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री करावयाचे मुग/उडीद शेतमालाचे वजन, 7/12
उतारा, चालू वर्षाचा मुग-उडीद पेरा प्रमाणपत्र,
आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुकचे प्रथम पानाची छायांकित प्रत व मोबाईल
क्रमांक नोंदणी करतेवेळी सादर करावे. कोणत्याही परिस्थितीत अपुर्ण कागदपत्रावर नोंदणी
ऑनलाईन होणार नाही. नोंदणी झाल्यानंतर ज्यावेळी खरेदी सुरू होईल त्यावेळी शेतकऱ्यांना
खरेदीसाठी त्यांचा शेतमाल खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणणेबाबत नोंदणी केलेल्या
मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. तरी सर्व उडीद व मुग उत्पादक
शेतकऱ्यांनी शेतमाल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करणेसाठी त्यांचे नावाची नोंद
आवश्यक कागदपत्रांसह संबंधित संस्थेमध्ये जावून त्वरित करून घ्यावी, असे
आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण व
जिल्हा मार्केटींग अधिकारी एम.डी कापुरे यांनी केले आहे.
*********
तक्रारींचे निरसन करून तक्रारदाराला समाधान द्यावे
-
जिल्हाधिकारी
·
लोकशाही दिनाची कार्यवाहीत 8 तक्रारी प्राप्त
·
चार तक्रारी निकाली
बुलडाणा, दि.3 : लोकशाही
दिन कार्यवाहीला नागरिक विविध विभागांच्या संबंधीत तक्रारी दाखल करीत असतात. या तक्रारींवर विहीत कालावधीत कार्यवाही होवून
तक्रारदाराला उत्तर मिळायला पाहिजे. तरी विभागांनी तक्रारींचे निसरन करून
तक्रारदाराला समाधान द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाच्या कार्यवाहीचे आयोजन
करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी
षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद देशमुख,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे,
निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, भूमि अभिलेख अधिक्षक श्री. जधवर, तहसीलदार
शैलेश काळे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण आदींसह विविध विभागांचे अधिकारी व
कर्मचारी उपस्थित होते.
या लोकशाही दिनामध्ये एकूण 8 तक्रारी प्राप्त झाल्या असून
त्यापैकी लोकशाही दिन कार्यवाहीसाठी 4 तक्रार स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तसेच 4
तक्रारी सामान्य तक्रार म्हणून अन्य विभागांकडे पाठविण्यात आल्या. तसेच चार
तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. लोकशाही दिन कार्यवाहीला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
***********
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री
यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बुलडाणा
दि. 3 - राष्ट्रपिता
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोंबर 2017
रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी ललीत
वराडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी उपस्थित अधिकारी
व कर्मचारी यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. यावेळी उपजिल्हाधिकारी
राजेंद्र देशमुख, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. मारबते, जिल्हा सूचना व विज्ञान
अधिकारी श्री. चव्हाण आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
******
रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार ऑनलाईन
* www.mahaswayam.in या संकेतस्थळावर सुविधा
उपलब्ध
बुलडाणा
दि. 3 - कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक
सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून
त्यासाठी www.mahaswayam.in संकेतस्थळ
विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक/आस्थापना यांनी सेवायोजन कार्यालये कायदा 1959
अन्वये त्रैमासिक ईआर-1 ची माहिती बंधनकारक असलेली माहिती या संकेतस्थळावर द्यावी
लागणार आहे. सप्टेंबर 2017 अखेर संपणाऱ्या त्रैमासिककरीता माहिती या संकेतस्थळावर
त्यांचे युजन आयडी व पासवर्ड लॉग ईन करून ऑनलाईन सादर करावयाची आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र
संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे.
ऑनलाईन ईआर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा या कार्यालयाशी संपर्क
साधावा. अथवा दुरध्वनी क्रमांक 07262-242342 यावर संपर्क साधावा. ईआर-1 सादर
करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2017 आहे. यामध्ये कसुरदार आस्थापनांवर विहीत नियमानुसार
कार्यवाही करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी, असे सहायक संचालक श्री
चिमणकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment