बुलडाण्यात राज्यस्तरीय
शालेय कराटे क्रीडा स्पर्धांचे आयोजन
·
25 ते 28 ऑक्टोंबर दरम्यान आयोजन
·
8 विभागातून 552 खेळाडूंचा सहभाग
बुलडाणा, दि. 24 - स्थानिक
चिखली रस्त्यावरील सहकार विद्या मंदीर येथे राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा
स्पर्धांचे आयोजन 25 ते 28 ऑक्टोंबर 2017 दरम्यान करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा 14,17
व 19 वर्षाआतील मुले/मुली या वयोगटात विविध वजनगटानुसार आयोजित करण्यात आल्या
आहेत. ही स्पर्धा प्रथमच विदर्भात होत असून अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यास
स्पर्धा आयोजनाचे यजमानपद मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर
पाटील यांनी दिली. कराटे स्पर्धेची माहिती देण्यासाठी जिल्हा क्रीडा संकूल येथे
पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी क्रीडा अधिकारी बी. आर जाधव, कराटे
महाराष्ट्र स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रतिनिधी फहीम सौदागर, श्री. अंबुसकर आदी उपस्थित
होते.
स्पर्धेचा उद्घाटीय कार्यक्रम 25 ऑक्टोंबर 2017
सायंकाळी 6 वाजता सहकार विद्या मंदीर येथे पार पडणार आहे. स्पर्धेसाठी खेळाडूंची
निवास व भोजन व्यवस्था सहकार विद्या मंदीर येथे करण्यात आली आहे. या स्पर्धेत
प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंची निवड शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार
आहे. ही स्पर्धा तेलंगणा, दिल्ली व मध्यप्रदेश मध्ये होणार आहे. स्पर्धेकरीता 8
विभागातून 552 खेळाडू, 48 संघ व्यवस्थापक, 30 पंच व सामनाधिकारी, तीन तांत्रिक
समिती सदस्य व इतर स्वयंसेवक, क्रीडा कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या
उद्घाटनाला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे, अशी माहितीही जिल्हा क्रीडा
अधिकारी यांनी दिली.
*****
मृद आरोग्य
पत्रिकांच्या वितरणामध्ये जिल्हा आघाडीवर..!
·
जिल्ह्यात 92 हजार 388 मातीच्या
नमुन्यांची तपासणी
·
5 लक्ष 60 हजार 367 मृद आरोग्य
पत्रिकांचे वितरण
बुलडाणा, दि. 24 - राष्ट्रीय
शाश्वत शेती अभियानातंर्गत जमिन आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम संपूर्ण राज्यात
सुरू आहे. जमिनीचे आरोग्य समजून त्याप्रमाणे पीक घेता यावे यासाठी मृद आरोग्य
पत्रिका वितरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जमिनीचे पोत कसे, कुठला घटक कमी
किंवा जास्त आहे हे समजणे याकरीता मृद आरोग्य पत्रिका असणे अत्यंत गरजेचे आहे. या
पत्रिकेनुसार खतांची मात्रा देता येते. तसेच पीक पद्धतीत सुधारणा करण्यास मदत
होते. या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेताची जमिन आरोग्य पत्रिका दर दोन
वर्षांनी उपलब्ध करून देणे हा या मागील उद्देश आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम सन
2015-16 पासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार
सन 2015-16, 2016-17 व 2017-18 या तीन वर्षात 5 लक्ष 60 हजार 367 मृद आरोग्य
पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. गत दोन वर्षात कृषी आयुक्तालय, पुणे
यांच्याकडून वितरीत मृद नमुने काढणे, तपासणी व जमिन आरोग्य पत्रिका वाटप लक्षांक 100
टक्के साध्या करण्यामध्ये जिल्हा यशस्वी ठरला आहे. एकूणच मृद आरोग्य पत्रिकांच्या
वितरणामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
मृद
नमुने काढण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मृद नमुना
घेतलेल्या ठिकाणच्या अक्षांश व रेखांश नोंदी घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण
गावांची संख्या 1420 असून खातेदार शेतकऱ्यांची संख्या 4 लक्ष 30 हजार 188 आहेत. तसेच
लागवडीलायक क्षेत्र 655051 हेक्टर आहे. यापैकी जिरायत क्षेत्रातून 56444 नमुने, तर
35844 नमुने बागायत जमिनीमधून तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. सन 2015-16 मध्ये जिल्ह्यातील
500 गावे निवडण्यात आली.
यामध्ये
लक्षांक 30 हजार 894 नमुने तपासण्याचा देण्यात आला. उद्दिष्टापेक्षा जास्त 30 हजार
966 मृद नमुने तपासण्यात आले. यामधून तालुका स्तरावर 144190 मृद आरोग्य पत्रिकांचे
वितरण करण्यात आले. तत्कालीन वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त मेहकर तालुक्यात 19
हजार 623 पत्रिका वितरीत करण्यात आल्या.
तसेच सन 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 939
गावांतून 62210 नमुना तपासणीचे लक्षांक होते. प्रत्यक्षात तालुका स्तरावर 62 हजार
583 नमुने काढण्यात आले. प्रयोगशाळेत संपूर्ण नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या
नमुना तपासणीतून तालुका स्तरावर जिल्ह्यामध्ये 4 लक्ष 5 हजार 863 मृद आरोग्य
पत्रिकांचे वितरण करण्यात आले. या वर्षात जिल्ह्यात सर्वात जास्त चिखली तालुक्यात
58 हजार 202 पत्रिकांचे वितरण करण्या आले. या तालुक्यातून 7445 नमुने तपासणीकरीता
पाठविण्यात आले होते.
सन
2017-18 मध्ये सद्यस्थितीत 688 गावांमध्ये 44 हजार 764 मृद नमुने तपासणीचे
उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापकी आतापर्यंत 24 हजार 733 नमुने तालुका स्तरावर
काढण्यात आलेले आहे. प्रयोगशाळेत 21 हजार 336 नमुने तपासणीसाठी प्राप्त झालेले
आहे. त्यापैकी 3777 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. या नमुन्यांमधून 10 हजार
314 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आलेले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त
दे.राजा तालुक्यात 4688 पत्रिकांचे वितरण करण्यात झाले आहे. मदृ आरोग्य पत्रिका योजना ही शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी
योजना ठरली असून त्यामुळे शेती उत्पादकतेत मोठी वाढ झाली आहे. तर कृषी निवीष्ठा
खर्चामध्ये कपात झाली आहे. पत्रिकेत पिकांनुसार शिफारसी, आवश्यक पोषक तत्वे व त्या
शेतीनुसार आवश्यक असणारी खते यांचा गोषवारा दिल्या जात आहे. ही योजना तीन टप्प्यात
होणार असून दोन वर्षाच्या काळात प्रथम टप्प्यात अमरावती विभागात जिल्हा अव्वल ठरला
आहे.
******
No comments:
Post a Comment