मनरेगाच्या माध्यमातून भरीव काम करावे
-
जिल्हाधिकारी
· ‘सक्षम मनरेगा’ कार्यशाळेचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 11 - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अत्यंत महत्वाची
योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटचा घटक असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बलांच्या
आयुष्यात संपन्नता आणता येणे शक्य आहे. यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये
गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून
विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेच्या सक्षम मनरेगा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटनीय
कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी
षण्मुखराजन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेंद्र देशमुख, उपमुख्य
कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, अमरावतीचे कार्यकारी अभियंता असलम खान, कृषी
सहसंचालक कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहायक किशोर चावंदे, नरेगा गटविकास अधिकारी
चंदनसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
सक्षम
मनुष्यबळाचा उपयोग करून 'माथा ते पायथा' जलसंधारण कामांचा अवलंब करण्याच्या
सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, मनरेगामधून पाणी अडविता येण्याजोग्या ठिकाणांचा
शोध घेवून त्याठिकाणी जलसंधारणाची कामे घ्यावीत. हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्याला या
बदलाची जाणीवसुद्धा होत आहे. अशा परिस्थितीत पावसाळा अनियमित व अवेळी स्वरूपाचा
होत आहे. या परिणामांपासून समाजाचा बचाव करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना
प्राधान्य द्यावे लागणार आहे. मनरेगामधून ही काम करता येणार आहे.
याप्रसंगी दिपप्रज्वलन करून कार्यशाळेचे
उद्घाटन करण्यात आले. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनीसुद्धा मार्गदर्शन
केले. प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक
उपजिल्हाधिकारी रोहयो श्री. देशमुख यांनी केले. कार्यशाळेला तहसीलदार, रोहयो विभागातील
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******
व्हिडीओ
रेकॉर्डिस्ट भाडे तत्वावर घेण्यासाठी निवीदा आमंत्रित
बुलडाणा, दि. 11 –
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातंर्गत योग्यता
प्रमाणपत्र जारी करताना वाहनांची तपासणी करण्यात येते. या तपासणीचे व्हिडीओ
रेकॉर्डींग केल्या जाते. वाहन तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी आवश्यक असणाऱ्या
कॅमेराशिवाय एका व्हिडीओ रेकॉर्डिस्ट उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भाडेतत्वावर
घ्यावयाचा आहे. याबाबत दरपत्रक, निवीदा सुचना कार्यालयाच्या सुचना फलवार प्रसिद्ध
करण्यात आली आहे. तरी इच्छूकांनी निवीदा सादर कराव्यात व अधिक माहितीसाठी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन
कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
*****
वाचन प्रेरणा
दिनानिमित्त 13 ऑक्टोंबर रोजी ग्रंथप्रदर्शनीचे
आयोजन
बुलडाणा, दि. 11 -
देशाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल
कलाम यांचा जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त
13 ऑक्टोंबर 2017 रेाजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथप्रदर्शन व एपीजे
अब्दुल कलाम यांच्या जीवनावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे
उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुळकर्णी यांच हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख
उपस्थितीमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी व अन्य प्रशासनातील अधिकारी राहणार आहेत. तरी
ग्रंथप्रदर्शनीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिष
जाधव यांनी केले आहे.
******
पिण्याच्या
पाणी आरक्षणाची मागणी कळवावी
· बुलडाणा
पाटबंधारे विभागाचे पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायतींना आवाहन
बुलडाणा, दि. 11 –
बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील तलावांवरून पिण्याचे
पाणी आरक्षणाची मागणी नोंदवावी. नगर परिषद, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व
संबंधीत ग्रामपंचायत यांनी त्वरित मागणी पाटबंधारे कार्यालयाकडे नोंदवावी. जिल्हा
पाणी आरक्षण समितीची सभा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते ऑक्टोंबर 2017
अखेर आयोजीत करण्यात येणार आहे. या सभेमध्ये धरणांतील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या
पाण्याचे आरक्षणास मंजूरी बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबंधित बिगर
सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी. ही माहिती 23 ऑक्टोंबर 2017 पूर्वी सर्व
पाणी पुरवठा योजनांची मागणी पाटबंधारे कार्यालयास प्राप्प होतील अशा पद्धतीने मागणी
करावी. त्यानुसार सदर मागणी मंजुरीसाठी सभेपुढे
ठेवण्यासाठी कार्यवही करणे शक्य होईल, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे
विभाग यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment