Wednesday, 18 October 2017

mahaklrjmafi .... news dio buldana 18.10.17


कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना पुढे जाण्याची ताकद मिळणार
-         पालकमंत्री पांडुरंग फुंडकर
·                                                                                                                         कर्जमाफी प्रमाणपत्रांचे पालकमंत्री यांच्याहस्ते वितरण
·                                                                                                                         21 शेतकरी कुटूंबांचा प्रमाणपत्र, साडी – चोळी देवून सन्मान
·                                                                                                                         कर्जमाफीच्या याद्या ऑडीटसह सादर करण्यामध्ये जिल्हा राज्यात अव्वल
·                                                                                                                         दिवाळीला शेतकऱ्यांना आनंददायी भेट
·                                                                                                                         जिल्ह्यात कर्जमुक्ती अभियानाचा प्रारंभ
   बुलडाणा, दि. 18  - राज्य शासनाने शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून कर्जमाफीच्या माध्यमातून मोठा दिलासा दिला आहे. विविध संकटांच्या फेऱ्यांमधून शेतकरी जातो. हवामान बदलामुळे तर त्याच्यापुढे संकटांची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीत शासन सतत शेतकऱ्यांच्या पठीशी खंबीरपणे उभे आहे. आर्थिक क्षमतेवर ढासाळलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीला सावरण्याचे काम कर्जमाफीमुळे होणार आहे. या कर्जमाफीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना पुढे जाण्याची ताकद मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे कृषि तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केला.
   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत प्रतिनिधीक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र, साडी-चोळी, कुर्ता देवून शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, डॉ. शशिकांत खेडेकर, जि. प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात आदी उपस्थित होते.
  राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीला कर्जमाफीची मिळालेली ही आनंददायी भेट असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना या शासनाने घोषणा झाल्यानंतर केवळ साडे तीन महिन्यामध्येच कर्ज माफीची भेट दिली आहे. यापूर्वी कर्ज माफीची रक्कम खात्यात जमा करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागला होता. शासनाने शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पाळला असून त्यामुळे ही दिवाळी शेतकऱ्यांची संस्मरणीय ठरणार आहे.
   ते पुढे म्हणाले, कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांच्या याद्यांचे ऑडीट करण्यात आले. त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ऑडीटसह शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे सादर करण्यात आल्या. यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. हे कार्य जिल्हा प्रशासनाने अभिनंदनीय कार्य असून यामध्ये सहभाग घेतलेल्या यंत्रणेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे  हे श्रेय आहे. पुर्नगठीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचेही शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ केले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याचे काम नाही.
  याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती व आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. शासनाच्या कार्यसिद्धीचे त्यांनी आभार मानले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. मोताळा तालुक्यातील काबरखेड येथील शेतकरी सिद्धार्थ खराटे यांनी मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाप्रसंगी 21 शेतकरी कुटूंबांना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे कर्ज माफी प्रमाणपत्र, साडी-चोळी वितरण करण्यात येवून त्यांचा सन्मान करण्यात आला. संचलन व आभार डॉ. अशोक खरात यांनी केले.  कार्यक्रमाला सहकार, महसूल, कृषि विभागाचे अधिकारी, सत्कारमूर्ती शेतकरी कुटूंबीय व नागरिक उपस्थित होते.


या शेतकऱ्यांचा झाला सन्मान

कर्जमाफी योजनेचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात पुंजाजी भिकाजी बदर सहपरीवार पळसखेड दौलत, ता. चिखली, शालीकराम किसान कुटे तेल्हारा, ता. चिखली, स्वप्नील ओमप्रकाश गुप्ता सहपरीवार रा. खेळ गोबाजी ता जळगांव जामोद, गजानन श्रीरंग भालेराव सहपरीवार सुकळी ता. जळगांव जामोद, गयाबाई मधुकर सातव रा. लांजुड ता. खामगांव, जगन्नाथ हरीभाऊ वानखडे कुंबेफळ ता. खामगांव, हरीभाऊ जयाजी सोसे सहपरीवार रा. वढव ता. लोणार, विश्वनाथ  मारोती अवचार सहपरीवार रा. राजणी ता. लोणार, कलाबाई सिताराम इंगळे रा. मलकापूर ता. मलकापूर,  सखुबाई मारोती अवचार रा. भानगुरा ता. मलकापूर, मदन अंबादास जाधव सहपरीवार रा. भोसा ता. मेहकर, शिलाबाई भिमराव वानखेडे रा. लोणी गवळी ता. मेहकर, विमल पुरूषोत्तम वखरे रा. काबरखेड ता. मोताळा, सिद्धार्थ नामदेव खराटे काबरखेड ता. मोताळा, गोकुळा वसंत तळपते रा. माळेगांव ता. नांदुरा, उखर्डाबाई सोनाजी चित्रंग रा. विटाळी ता. नांदुरा, यमुनाबाई प्रकाश मुरकुट रा. मलकापूर पांग्रा ता. सिं.राजा, यशोदा श्रीराम मुरकुट रा. डोरव्ही ता. सिं. राजा, सै. अजीज सै. गफ्फुर व सहपरीवार रा. बावनबीर ता. संग्रामपूर, सविताबाई शेषराव ढाकरके रा. डोरव्ही ता. सिं. राजा, प्रकाश उत्तमाप्पा बोंद्रे रा. सिंदखेड राजा ता. सिं.राजा. 

No comments:

Post a Comment