Saturday, 5 August 2017

NEWS 5.8.2017 DIO BULDANA

                                
पिक कर्ज वितरणासाठी जिल्हा बँक तत्पर
-         जिल्हाधिकारी
·        जिल्हा बँकेत 10 हजार रूपयापर्यंतच्या मर्यादेत तातडीने पिक कर्ज उपलब्ध
·        जिल्हाधिकारी यांच्याहस्ते कर्ज वितरण
बुलडाणा, दि. 5 : राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्हा बँकेला संलग्न  ग्रामसेवा, विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून 10 हजार रूपयांच्या मर्यादेत तातडीने पिक कर्ज वाटप करण्यात येत आहे. या पिक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँक तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले.
  जिल्हा बँकेच्या सभागृहात पीक कर्ज वाटप शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, सर्व मुख्याधिकारी, विभागीय अधिकारी, चिखली येथील संस्थेचे अध्यक्ष, सचिव व लाभार्थी शेतकरी सभासद उपस्थित होते.
   जिल्हा केंद्रीय सहकारी बँक 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकरी सभासदांना खरीप पिक पेरणीसाठी 10 हजार रूपयांच्या मर्यादेत तातडीने पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 14 व 20 जून 2017 च्या शासन निर्णयास अधिन राहून पात्र सभासदांना खरीप पिक पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित संस्थेचे गटसचिव/ संलग्न बँक शाखेमध्ये सादर करून 10 हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत तातडीने कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पात्र शेतकरी सभासदांनी स्वयंघोषीत शपथपत्र, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीसाठी पात्र सभासदांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची पावती, सभासदाचा 7/12, गाव नमुना 8 –अ, कलम 48 अंतर्गत घोषणापत्र, मोबाईल क्रमांक नमूद करून स्वत:च्या सहीने प्रमाणीत केलेल्या आधार कार्डची छायांकित प्रत, मतदान ओळखपत्र, असल्यास पॅन कार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डची छायांकित प्रत, बँकेचा विहीत नमुन्यातील किसान क्रेडीट कार्डचा अर्ज, दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र,
                                                                                    **********
                                 अंशकालीन उमेदवारांना ऑनलाईन नुतनीकरण व आधार लिंक करणे बंधनकारक
·        www.mahaswayam.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध
बुलडाणा, दि. 5 : राज्य शासनाच्या  सुशिक्षीत बेरोजगार आर्थिक सहाय्य योजना भाग – अ अंतर्गत तहसिलदार यांचे अधिन शासनाच्या विविध कार्यालयात अंशकालीन उमेदवार म्हणून तीन वर्ष पूर्ण काम केलेले पदवी / पदविकाधारक आहेत. अशा अंशकालीन उमेदवारांनी नुतनीकरण करून आधार क्रमांक संलग्न करावयाचे आहे. ही सुविधा विभागाच्या www. mahaswayam.in या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे.
   उमेदवारांची नुतनीकरण करताना आधार कार्ड लिंक करण्याऐवजी पुन्हा नव्याने नोंदणी होत असल्याचे निर्दशनास येत आहे.  यामुळे एकाच उमेदवाराची दुबार नोंदणी होत असून त्यांची मुळ नोंदणी आधार लिंक होत नाही. याकरीता प्रत्येक उमेदवाराने नुतनीकरण करत असताना काळजीपूर्वक आपले जुन्या नोंदणी कार्डास आधार लिंक करून नुतनीकरण करून घ्यावे. उमेदवारांची वरीलप्रमाणे नुतनीकरण करत असताना आधार कार्ड लिंक करणेऐवजी नवीन नोंदणी होवून दुबार नोंदणी झाली, अशा उमेदवारांनी सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा यांचे समक्ष उपस्थित रहावे व  साध्या कोऱ्या कागदावरील त्यासंबंधी सविस्तर माहिती 11 ऑगस्ट 2017 पर्यंत सादर करावी. त्यासाठी कुठलाही खर्च दिल्या जाणार नाही. तसेच उपरोक्त प्रक्रिया करताना काही अडचण आल्यास दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे सहायक संचालक डी. एल ठाकरे यांनी कळविले आहे.
                                                                                    *****
शिष्यवृत्तीच्या नवीन संगणकीय प्रणालीबाबत तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन
बुलडाणा, दि. 5 : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची ऑनलाईन संगणकीय प्रणाली www.mahadbt.gov.in  या संकेतस्थळावर 3 ऑगस्ट 2017 पासून सुरू झालेली आहे.  या संगणकीय प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आलेले आहेत. ही प्रणाली आधारबेस असल्यामुळे सर्व अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न करणे आवश्यक आहे. त्यानुसार महाडीबीटी पोर्टलबाबत तालुकानिहाय ई-शिष्यवृत्ती ऑनलाईन संगणकीय प्रणालीचे प्रात्याक्षिक दाखविण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधीकडून तालुकानिहाय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे  करण्यात आलेले आहे.
   त्यानुसार बुलडाणा, चिखली तालुक्यांसाठी 9 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 12 वाजता, संग्रामपूर, शेगांव, जळगांव जामोद व नांदुरा तालुक्यांसाठी 11 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 12 वाजता, लोणार, मेहकर, दे.राजा व सिं.राजा तालुक्यांकरीता 14 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 12 वाजता, मलकापूर, मोताळा व खामगांव तालुक्यांमध्ये 16 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.
     या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्ती योजनेचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांनी कार्यशाळेला न चुकता हजर रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.
                                                                        *******
शिष्यवृत्ती योजनेची नवीन www.mahadbt.gov.in संगणकीय प्रणाली विकसित
·        विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे
बुलडाणा, दि. 5 : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन www.mahadbt.gov.in  संगणकीय प्रणाली विकतिस करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ 3 ऑगस्ट 2017 पासून सुरू झालेली आहे. या ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आला आहे. ही प्रणाली आधारबेस असल्यामुळे सर्व अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे. या प्रणालीमध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे बंधनकाकर आहे.
   या प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्षात मागील वर्षीप्रमाणे विद्यार्थी नुतनीकरण करण्याची सुविधा नसल्यामुळे सर्व पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करावेत. माहवद्यालयाच्या प्राचार्यांनी पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यायकरीता अवगत करून लेखी सुचीत करावे. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता महाविद्यालयाच्या सूचना फलकांवर सुचना द्याव्यात. कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची महाविद्यालय प्राचार्य यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त , समाज कल्याण यांनी केले आहे.
                                                            *********
      पालकमंत्री पांडुरंग फुंडकर जिल्हा दौऱ्यावर
बुलडाणा,दि. 5 : कृषि व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर हे दिनांक 6 ऑगस्ट, 2017 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  दिनांक 6.08.2017 रोजी सकाळी 05.28 वाजता मुंबई येथून हावडा मेलने शेगाव येथे आगमन व शासकीय मोटारीने खामगावकडे प्रयाण. सकाळी 06.00 वाजता खामगाव येथे आगमन व राखीव. दिनांक 7 ऑगस्ट 2017 रोजी खामगांव येथे राखीव, सायंकाळी 7.15 वाजता खामगाव येथून शासकीय मोटारीने नांदूरा रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायंकाळी 7.40 वाजता नांदूरा येथे आगमन व हावडा मेलने मुंबईकडे प्रयाण करतील.
                        

No comments:

Post a Comment