कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे फाटक बंद करून
पाणीसाठा करावा
-
पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर
- नादुरूस्त
कोल्हापूरी बंधाऱ्यांची दुरूस्ती करावी
बुलडाणा, दि. 15 – जिल्ह्यात कोल्हापूरी पद्धतीचे
बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची फाटके नादुरूस्त झाली असून त्यांची तातडीने दुरूती
करावी. तसेच या बंधाऱ्यांची फाटके कायमची बंद करून यामध्ये पाणीसाठा निर्माण
करावा, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये कोल्हापूरी
पद्धतीच्या बंधाऱ्यांची फाटके बंद करून पाणीसाठा निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यासंदर्भात
बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.
चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराज, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी बी.बी नेमाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे आदी
उपस्थित होते.
कोल्हापूरी बंधाऱ्यांची उंची एक मीटरने वाढवून पाणीसाठा
निर्माण होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, नदी पात्राची रूंदी लक्षात घेता बंधाऱ्यांची
उंची वाढवावी. मागे पाणी पात्राशेजारील शेतांमध्ये घुसणार नाही, याची काळजी
घ्यावी. तसेच यासाठी विशेष मोहिम राबवावी. सध्या असलेल्या बंधाऱ्यांची फाटके तुटलेल्या
अवस्थेत आहेत. अशी फाटके पूर्णपणे काढून त्याठिकाणी बंधाऱ्याची उंची वाढवावी. जेणेकरून
पाणी थांबून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. शेतामधील भूजल पातळी वाढून शेतकरी सिंचन
करू शकतील. नदी पुनरुज्जीवनामध्ये सीएसआर निधीचा उपयोग करावा. यामध्ये बियाणे, औषध
कंपन्यांनाही निधी देण्याचे सांगितल्या जाईल.
बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता
श्री. सुपेकर, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कचरे, लघुपाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चौधरी, रोहयो उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख
आदी उपस्थित होते.
**************
शेतकरी आठवडी बाजाराच्या माध्यमातून
सेंद्रीय भाजीपाला मिळणार
-
पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर
·
संत
शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन
·
नगरपालिका
शाळा क्रं 2 मध्ये दर बुधवारला दुपारी 2 ते सायं 7 पर्यंत भरणार बाजार
·
नागरिकांनी
आठवडी बाजाराचा लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 15 - शेतकऱ्यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम
राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला ग्राहकांना
मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री
पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.
जयस्तंभ चौक स्थित नगर पालिकेच्या शाळा
क्रमांक दोनच्या आवारात शेतकरी आठवडी
बाजाराचा उद्घाटनीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी
पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे,
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प सभापती श्वेताताई महाले, माजी आमदार
धृपदराव सावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींदर बुधवत, योगेन्द्र गोडे, मुख्याधिकारी
करणकुमार चव्हाण, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक आदी उपस्थित होते.
कृषी पणन कायद्यात दुरूस्ती करून शेतकरी आठवडी
बाजारांना अधिकृत दर्जा मिळाला असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, या शेतकरी
आठवडी बाजारांमध्ये दलालांची साखळी नसणार आहे. त्यामुळे याचा लाभ थेट शेतकऱ्यांना
मिळणार आहे. शेतकरी कृषी उत्पादक कंपन्यांचे बियाणे महामंडळाने खरेदी करण्यासाठी व
बियाणे विक्रीस परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकरी कृषी उत्पादक
कपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतमाल उत्पादन, विपणनाचे मोठे काम जिल्ह्यात उभे
राहीले आहे. या कंपन्यांच्या पाठीशी राज्याचा कृषी विभाग उभा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक
कंपनी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश सुरडकर यांनी केले. आठवडी बाजाराचे फित कापून
सर्वप्रथम उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी शेतकरी उत्पादक
कंपनीच्यावतीने उभारण्यात आलेल्या भाजीपाला स्टॉलला भेट दिली. यावेळी पालकमंत्री व
जिल्हाधिकारी यांनी भाजीपालासुद्धा खरेदी केला. तसेच शेतकऱ्यांची विचारपूस करून माहिती
घेतली. सदर बाजार दर बुधवारला दुपारी 4 ते
सायंकाळी 7 वाजेपदरम्यान भरविल्या जाणार आहे. तरी नागरिकांनी बाजाराचा लाभ घ्यावा,
असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन गोपाळ जाधव यांनी तर आभार
प्रदर्शन अजय देशमुख यांनी केले. याप्रसंगी बुलडाणा जिल्हा शेतकरी उत्पादक कंपनीचे
पदाधिकारी , नगरपालिकेचे पदाधिकारी, शेतकरी बंधू, कंपन्याचे संचालक आदींची मोठ्या
संख्येने उपस्थिती होती.
**********
कृषि यांत्रिकीकरण अभियानातंर्गत
पालकमंत्री यांच्याहस्ते कृषी अवजारे वाटप
बुलडाणा, दि. 15 – उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिम सन 2017-18 कृषि
यांत्रिकीकरण अभियानातंर्गत पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते ट्रॅक्टरचे
चावी देवून वाटप करण्यात आले. यावेळी जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, जिल्हाधिकारी
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जि.प सभापती
श्रीमती श्वेताताई महाले, आत्माचे प्रकल्प संचालक नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि
अधिकारी संतोष डाबरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी लाभार्थी लक्ष्मण हरीभाऊ विसपूते
रा. मासरूळ, बाबूलाल हरवते रा. रायपूर, माधव सखाराम तायडे रा. म्हसला खु, श्रीमती
चंद्रकला विजय शेवाळे रा. ढासाळवाडी, रामदास रखमजी वाघ रा. चिखली यांना कृषी
अवजारे वितरीत करण्यात आली.
**********
No comments:
Post a Comment