ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण
मिळेल
-
ए.पी भंगाळे
बुलडाणा, दि.
21 : ग्रहकांचे हक्क, कर्तव्य व कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सेवा
महत्वाच्या आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे निर्माण
करण्यात आलेले आहेत. या कायद्यांप्रमाणे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण केले जाईल.
त्यामुळे ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, असा विश्वास राज्य
ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्या. ए.पी भंगाळे यांनी व्यक्त केला.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या इमारत नुतनीकरणाचा कार्यक्रम इमारतीच्या
परीसरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष
ॲड विजय सावळे, जिल्हा मंचचे अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य मनिष वानखडे आदी उपस्थित
होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी सेवा
हमी कायद्यावर प्रकाश टाकीत शासनाला विहीत कालावधीत नागरिकांना सेवा द्यावयाच्या
आहेत. सेवा म्हणजे उत्पादन व नागरिक म्हणजे ग्राहक. त्यामुळे नागरिकांना सेवा
विहीत कालावधीत मिळण्याची हमी मिळाली आहे. ॲड. सावळे व श्री. ढवळे यांनीसुद्धा
यावेळी आपले विचार व्यक्त केले. संचलन राहूल दाभाडे यांनी, तर आभार प्रदर्शन श्रीमती
जयश्री खांडेभराड यांनी केले. कार्यक्रमाला जळगांव येथील भरत देशमुख, जळगांव
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत भंगाळे, माजी अध्यक्ष श्री. शिंदे, पक्षकार,
जिल्हा मंचचे सर्व कमचारी उपस्थित होते.
-------------------------
शासकीय कर्मचाऱ्यांचा तयार होणार
सर्वंकष माहितीकोष
- 16 ऑगस्ट 2017 ते 28
फेब्रुवारी 2018 कालावधीत होणार तयार
बुलडाणा, दि. 21 : नियोजन विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थ
व सांख्यिकी संचालनालयामार्फत शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष-2017 तयार
केल्या जाणार आहे. हा कोष 16 ऑगस्ट 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत तयार
होणार आहे. तरी शासकीय कार्यालय यांनी कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांची कार्यालय व
आहरण, संवितरण अधिकारीनिहाय सदर माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून पुरविण्यात
येणाऱ्या https:mahasdb.maharashtra.gov.in/CGE/home.do या संगणकीय आज्ञावलीमध्ये अद्ययावत करून
30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावयाची आहे. माहिती सादर केल्यानंतर जिल्हा सांख्यिकी
कार्यालयाकडून माहिती सादर केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र 1 सप्टेंबर ते 30
नोव्हेंबर 2017 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे.
सदर प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2017 च्या वेतन
देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. तसेच सादर केलेली माहिती बरोबर असल्याचे दुसरे
प्रमाणपत्र 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत प्राप्त करून घ्यावे.
हे प्रमाणपत्र फेब्रुवारी 2018
चे वेतन देयकासोबत सादर करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय सदर महिन्यांची वेतन देयके
संबंधीत प्राधिकारी किंवा जिल्हा कोषागार कार्यालयाकडून स्वीकारली किंवा पारीत
केले जाणार नाहीत. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी याबाबत जिल्हा सांख्यिकी
कार्यालयाशी संपर्क साधून कार्यालयबाबतचा युजर आयडी व पासवर्ड 31 ऑगस्ट 2017
पर्यंत प्राप्त करून घ्यावा. तसेच तात्काळ माहिती उपरोक्त आज्ञावलीमध्ये द्यावी,
असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी सं.मो राठोड यांनी केले आहे.
----------------------------
गणेशोत्सवामध्ये मिरवणूक काढण्यासाठी
परवानगी आवश्यक
- जाहीरनामा 25 ऑगस्ट 2017 पासून
लागू
- मिरवणूकीदरम्यान कायदा व
सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवावी
बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यात 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017
दरम्यान गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यावर
अथवा रस्त्याच्या आसपास सार्वजनिक शांतता भंग न होण्याच्यादृष्टीने गणेशोत्सवा
निमित्य होणारे मेळावे, दिंडी, मिरवणूकीत भाग घेणाऱ्या लोकांच्या नियमनाकरीता मुंबई
पोलीस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 प्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहे. हा
जाहीरनामा 25 ऑगस्ट 2017 चे सकाळी 6 वाजेपासून ते 5 सप्टेंबर 2017 च्या रात्री 10
वाजेपर्यंत अंमलात असणार आहे. गणेशोत्सवामध्ये कुणालाही मेळावे, पालख्या, वाद्यासहीत
मिरवणूक काढावयाची असल्यास त्या व्यक्तीने 36 तासांपूर्वी संबंधीत पोलीस
ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेतली पाहिजे. अशी लेखी परवानगी
घेतल्याशिवाय या कालावधीत कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास मनाई आहे. हा नियम
मात्र प्रेतयात्रेला लागू राहणार नाही.
लेखी अर्जाद्वारे ठाणेदार यांच्याकडे मुख्य
आयोजकाचे नाव व पत्ता, परवाना पाहिजे असण्याचे कारण, मेळावा अथवा मिरवणूकीचे वर्णन
व मंडळाचे नाव, कोणकोणत्या ठिकाणी जाण्याकरीता परवाना पाहिजे ती तारिख व वेळ, ज्या
रस्त्याने मिरवणूक जाणार असेल तो रस्ता, ज्या तारखेचा किंवा वेळेचा परवाना पाहिजे
ती तारिख व वेळ, मिरवणूक चालकाचे व सदस्यांचे पूर्ण नाव, पत्ता, मुख्य आयोजकाने मिरवणूकीतील
किंवा मेळाव्यातील प्रत्येक व्यक्तीचे योग्य शांत वर्तनाबद्दल तो स्वत: जबाबदार आहे
असे अर्जावर लिहून देणे आवश्यक आहे. मिरवणूकीमध्ये वापरावयाचे वाहन उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी, बुलडाणा यांचेकडून तपासून घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे.
मिरवणूक सार्वजनिक जागेतून नेतांना संबंधित व्यक्तीजवळ असा परवाना असावयास
पाहिजे व दंडाधिकारी यांनी तो पहावयास मागितल्यास त्यांनी दाखविला पाहिजे. श्री
गणपती विसर्जनाचे दिवशी मिरवणूक अथवा मेळावा रात्री 10 वाजेपर्यंत मिळालेल्या परवान्यात
नमूद केलेल्या रस्त्यानेच व वेळेनुसार काढण्यात यावी. दुसऱ्या रस्त्याने जावू दिले
जाणार नाही. मिरवणूकीमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्या मुख्य आयोजक जबाबदार धरल्या
जाईल. कोणत्याही प्रसंगी मिरवणूकीने प्रेतयात्रेला अग्रक्रम दिला पाहिजे. मिरवणूकीमुळे
शांतता धोक्यात येईल, जातीय तंटे निर्माण होतील, जमातीत संघर्ष निर्माण होईल्, असे
कुठलेही कृत्य, भाषण, जाहीरात प्रदर्शन, अंगविक्षेप, सोंग काढणे, गैरवर्तन करण्यास
सक्त मनाई आहे. त्याचबरोबर वाद्य साहित्य,
खेह, दिंड्या, आखाडे, सोंग फलके आहेत अशा लोकांनी रस्त्याने जाताना आजूबाजूस
राहणाऱ्या लोकांना त्रास होईल अशा रितीने थांबू नये. जनावरे बावरणाऱ्यावेळी
जनावरांना शांततेने जावू द्यावे.
मशीद
जवळून मिरवणूक जातांना मशीदीपुढे न थांबता पुढे निघून जावे. रेंगाळू नये, मिरवणूकीतील
काही मुले पदे म्हणू लागली असता मुख्य आयोजकाने रस्त्यावरून वाहनास अडथळा होणार
नाही, अशी व्यवस्था केली पाहिजे. अशा अडथळ्यांना तो आयोजक जबाबदार राहील.
मिरवणूकीत कोणत्याही परवान्याशिवाय अग्नीशस्त्र, मशाल, तलवार, खंजीर, कट्यार,
चाकू, काठ्या, बांबू, छोटे दगड आदीपैकी दुखापत करता येणारे साहित्य घेवून जावू
नये. तसेच जवळ बाळगू नये. वस्तू सापडल्यास त्यांचे जवळून ते घेवून पोलीसांच्या ताब्यात
देण्यात येणार आहे.
मुंबई
पोलीस कायदा 1951 चे कलम 33, 37 व 40 नुसार जाहीरनामा काढण्यात येत आहे. यामधील
कुठलयाही शर्तीचे विरूद्ध जो कुणीही गुन्हा करेल तो कलम 135 अन्वये शिक्षेस पात्र
राहील. अशा गुन्हेगारांवर मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 152 नुसार भारतीय दंड संहीतेनुसार
ख्रटला भरण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
-------------------
शालेय
क्रीडा स्पर्धेत नवीन वयोगटांचा समावेश
बुलडाणा, दि. 21 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या
परिपत्रकानुसार सन 2017-18 या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील 13 क्रीडा
प्रकारांमध्ये नविन वयोगटांचा समावेश करण्यात आला आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या
शैक्षणिक संस्थेने जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या स्पर्धा पुस्तिकेत नमूद केलेल्या स्पर्धा
संयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच सन 2017-18 या सत्रात जिल्हास्तर
चॉकबॉल स्पर्धेचे आयोजन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. नव्याने टेबल
सॉकर 17 व 19 वर्ष मुले अथवा मुली या
गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक
शैक्षणिक संस्थेने, खेळाडूंनी जिल्ह्यातील टेबल सॉकर संघटनेशी संपर्क साधून आपला प्रवेश
निश्चित करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी कळविले आहे.
-
नव्याने
समाविष्ट वयोगटातील खेळ-
कुस्ती फ्रीस्टाईल : वयोगट 14, 17 व 19 वर्ष
मुले/मुली, कुस्ती ग्रीकोरोमन : वयोगट 17, 19 वर्ष मुले, रग्बी : वयोगट 14, 17 व
19 वर्ष मुले/मुली, रस्सीखेच : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, पावर लिफ्टींग :
वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, डॉजबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, फिल्ड
आर्चरी : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, कॉर्फबॉल : वयोगट 17 व 19 वर्ष
मुले/मुली, कुडो : वयोगट 17 व 19 वर्ष
मुले/मुली, मिनी गोल्फ : वयोगट 17 व 19 वर्ष मुले/मुली, स्पीडबॉल : वयोगट 17 व 19
वर्ष मुले/मुली, टेंग सु डो : वयोगट 14, 17 व 19 वर्ष मुले/मुली, वुडबॉल : वयोगट
17 व 19 वर्ष मुले/मुली.
************
आदिवासी
बांधवांना 100 टक्के अनुदानावर साहित्य वाटप
- लाभार्थ्यांनी अर्ज
करावे
बुलडाणा, दि. 21 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या,
नाशिक यांच्या धारणी प्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासी बांधव लाभार्थ्यांना 100
टक्के अनुदानावर एच. डी. पी. ई पाईप या योजनेकरीता अर्ज वाटप सुरू आहे. इच्छूक
लाभार्थ्यांनी अकोला येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात अर्ज जमा करावे.
प्रकल्प कार्यालय, धारणीकडून
100 टक्के अनुदानावर तेलपंप, विजपंप मंजूर किंवा मिळालेला असावा, लाभार्थ्याला प्रकल्प
कार्यालय, अकोला या कार्यालयाकडून एच. डी. पी. ई पाईप या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला
नसावा, 7/12 व नमुना 8-अ (शेती सामुहिक असल्यास संमती पत्र जोडणे आवश्यक आहे), राशन
कार्ड, बी.पी.एल कार्ड असल्यास छायाप्रत सोबत जोडावे, जातीचा दाखला, ओलीत असल्याचा
दाखला, रहिवासी दाखला, ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र व रंगीत छायाचित्र सोबत जोडावे.
सर्व कागदपत्रे छायांकित असावी. तसेच लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालय, अकोला
येवूनप अर्ज जमा करावे, असे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
***********
जिल्हाधिकारी
कार्यालयात सद्भावना दिन साजरा
बुलडाणा,
दि.
20 - देशाचे
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ उपस्थिताना दिली. याप्रसंगी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद
देशमुख, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी श्री
.चव्हाण, तहसीलदार शैलेश काळे, तहसीलदार श्री. शेळके आदींसह अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment