Posts

७ डिसेंबरला नागपूर येथे होणार गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम स्मृती सोहळा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

           मुंबई/ बुलढाणा, (जिमाका) दि. 3 :   हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त राज्य सरकारतर्फे नागपूर, नवी मुंबई आणि नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये ७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव सहाय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.               या पार्श्वभूमीवर नागपूर आणि अमरावती विभागातील सुरू असलेल्या विविध कार्यक्रम, प्रचार उपक्रम व व्यवस्थापनाची आज अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला बुलढाणा येथून निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उप शिक्षणाधिकारी अनिल देवकर, प्र. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड, एसटी महामंडळाचे अधिकारी आदी दूरदृष्ट प्रणालीद्वारे उपस्थित होते.          ...

10 नगरपरिषद निवडणुकीत 69.42 % मतदान

  ·          3,10,690 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क ·          सिंदखेड राजात 85 टक्के रेकॉर्ड ब्रेक मतदान ·          मतमोजणी 21 डिसेंबरला   बुलढाणा, (जिमाका) दि. 3 :   जिल्ह्यातील 10 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरळीतपणे पार पडले असून सरासरी 69.42 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत 3,10,690 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिले आहे या नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत एकूण 504 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेमध्ये 1,48,293 स्त्री, 1,68,293 पुरुष आणि 5 इतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पडले. नगरपरिषदनिहाय मतदानाच्या टक्केवारीनुसार बुलढाणा 54.20 %, चिखली 71.02 %, जळगाव जामोद 67.87 %, खामगाव 70.65 %, लोणार 72.26 %, मलकापूर 74.04 %, मेहकर 74.41 %, नांदुरा 74.59 %, शेगाव 68.98 %, सिंदखेड राजा 85.08% सरासरी 69.4...

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा

  बुलढाणा, (जिमाका) दि. 3 :   भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांसाठी आधुनिक, जलद व वापरण्यास सुलभ अशा सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप (Self-Booking & Doorstep Pickup Service) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेवेमुळे ग्राहकांना आता घरी किंवा कार्यालयात बसूनच स्पीड पोस्ट, रजिस्ट्रर्ड, पार्सल इत्यादींचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे, बुकिंगनंतर डाक विभागाचे कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी येऊन पार्सलचे पिकअपही करतील. ही सुविधा व्यवसायिक, व्यापारी, स्टार्टअप्स, कार्यालये तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, अनावश्यक प्रवास टाळून वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. सेल्फ बुकींग सुविधा   वापरण्यासाठी ग्राहकांनी www.indiapost.gov.in किंवा India Post Mobile App वर जाऊन “ Self Booking ” हा पर्याय निवडून संबंधित माहिती भरावी. तर डोरस्टेप पिकअप सुविधेसाठी त्याच अॅप/वेबसाईटवरून पिकअप विनंती नोंदवता येते. निश्चित वेळेत डाक कर्मचारी पिकअपसाठी भेट देतात. या दोन्ही सेवा पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक असून ट्रॅकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. ...

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंध) अधिनियम; अत्याचारात मृत्यू झालेल्या वारसांना नोकरी

   •      जिल्ह्यात 18 प्रकरणांचा समावेश  •      पात्र वारसांना दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील सन 2026-2025 या काळातील एकुण 18 प्रकरणांचा समावेश असून, केवळ 4 प्रकरणी प्रस्ताव प्राप्त आहेत. उर्वरित प्रकरणांत पात्र वारसांनी दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त मनोज मेरत यानी केले आहे. दरम्यान, शासन निर्णयानंतर २८ नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात पीडित कुटुंबीयांची सभा घेण्यात आली. सभेत नोकरीसाठी आवश्यक निकष, कागदपत्रे आणि प्रक्रियेची माहिती देण्यात आली. त्यावेळी ४ पात्र वारसांनी त्वरित प्रस्ताव सादर केले, तर इतर १४ कुटुंबीयांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रस्ताव प्रलंबित कुटुंबांनी आवश्यक कागदपत्रे तत्काळ दाखल करावीत. शासनाच्...

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे होणार विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय

  मुंबई/ बुलढाणा, दि. ३ :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि.   ८ ते   रविवार दि. १४   डिसेंबर २०२५   या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे.   दि. १३ डिसेंबर शनिवार आणि दि. १४   डिसेंबर रविवार   शासकीय सुट्टीच्या दिवशीही   दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.   विधानभवन येथे   विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची   बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, विधानसभा सदस्य   सर्वश्री सुधीर मुनगंटीवार,दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू,अमीन पटेल विधानपरिषद सदस्...

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

Image
    बुलढाणा, (जिमाका) दि. 2:    नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सरस्वती विद्यालयातील मतदान केंद्रावर भेट देत इतर मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी नागरिकांना लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे, पारदर्शकपणे आणि उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले. मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही चूक, गैरप्रकार किंवा बनावटपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही दिला. जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यांनी सर्व नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. पिंक मतदान केंद्राला भेट बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रातील महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पिंक मतदान केंद्र सुरु केले होते. या केंद्रात मतदान केंद्र अध्यक्षापासून सर्व कर्मचारी हे महिला वर्ग नियुक्त करण्यात आले होते. या पिंक मतदान केंद्राला जिल्हाधिकार...

नगरपरिषद व नगरपंचायींच्या निवडणुकांसाठी १ डिसेंबरला रात्री १० पर्यंत प्रचाराची मुदत

  बुलढाणा, (जिमाका) दि. 01: (रानिआ): नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत 'महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५' मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० पर्यंत असेल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही. 00000