Wednesday, 8 December 2021

DIO BULDANA NEWS 8.12.2021

 विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१

निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचा संपर्क क्रमांक
बुलडाणा,दि.८ (जिमाका)- विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक २०२१ साठी अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे हे निवडणूक निरीक्षक आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९०९६३८९२७९ हा आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक २०२१ बाबत काही तक्रारी, अडचणी असल्यास संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांनी केले आहे.   
                                                                       ********
जिल्हाधिकारी कार्यालयात
        संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन                            
बुलडाणा,दि.८ (जिमाका) - जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
*******
                                
 विधान परिषद निवडणूक कोरड्या दिवसात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
*८ गुन्ह्यांची नोंद, ९ आरोपींना अटक
*२ लक्ष ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा, (जिमाका) दि. ८: राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे,  तसेच  अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली १ ते ७

डिसेंबर या कालावधीमध्ये एकुण ८ वारस गुन्हे नोंदवुन ९ आरोपींना दोन वाहनांसह अटक करण्यात आली.  तसेच एकुण २ लाख ९६  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुक २०२१ च्या पार्श्वभुमीवर दिनांक ८ ते १० डिसेंबर  रोजी जाहीर केलेल्या कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने ७ डिसेंबर रोजी  प्र. निरीक्षक आर.आर उरकुडे, बुलडाणा यांचे पथकाने मौजे अंबाशी ता. चिखली भिकाजी संतोष रिंढे यांचे राहते घरी देशी दारूचे ३६ बॉक्स असे एकुण १ लाख ५ हजार ६०० रुपयांचा मुद्येमाल जप्त केलेला आहे. आरोपी भिकाजी संतोष रिंढे रा. अंबाशी यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ क,ड नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत निरीक्षक श्री. उरकुडेसह जवान अमोल तिवाने, पी. ई. चव्हाण, एन. ए. देशमुख, आर. ए. कुसळकर सहभागी होते.
   तसेच  प्र. निरीक्षक वा. रा. बरडे, बुलडाणा यांचे पथकाने मौजे साखरखेर्डा ता. सि. राजा येथे विजय हनुमान जैस्वाल व अनिल हनुमान जैस्वाल यांचे राहते घरी देशी दारूचे ३९ बॉक्ससह एकुण १ लाख ११ हजार ४२६ रुपयांचा मुद्येमाल जप्त केलेला आहे. आरोपी विजय हनुमान जैस्वाल व अनिल हनुमान जैस्वाल यांचेविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ क,ड नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत निरीक्षक श्री. बरडेसह दुय्यम निरिक्षक एस. डी चव्हाण, जवान एन. एम सोळंकी, एस. बी. निकाळजे, ए. एम. सोळंकी, एम. एस. जाधव, कु. सोनाली उबरहंडे सहभागी होते. त्याचप्रमाणे धुपेश्वर शिवार ता. मलकापूर येथे अवैध हातभट्टीची वाहतूक करताना एक मोटार सायकल जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत ५३ हजार रुपये आहे. 
   तसेच आपल्या परिसरात अशी अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास या विभागास या विभागाचे टोल फी नंबर १८०० ८३३३३३ वर किंवा व्हॉटअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excises uvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर माहिती कळवावी. तसेच ज्याप्रमाणे वाहन चालवितांना वाहनांचा परवाना आवश्यक आहे त्याप्रमाणे मद्य बाळगतांना,मद्य सेवण,मद्य वाहतुक करतांना या विभागाचा मद्यसेवन परवाना असणे आवश्यक आहे. तसेच अवैध ढाब्यांवर मद्यसेवन करतांना अथवा मद्यविक्री करतांना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध धावा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल,याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment