उत्पादन शुल्क विभागाचा कारवाईचा धडाका सुरूच
- डिसेंबर महिन्यात 93 गुन्हे नोंदवित 94 आरोपींना अटक
- 34 लाख 77 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे तसेच अधीक्षक श्रीमती भाग्यश्री प.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये एकूण 93 गुन्हे नोंदविण्यात आले असून 87 वारस गुन्हे, 6 बेवारस गुन्हे नोंदवुन 94 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 10 वाहनांसह एकुण 34 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 29 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक एन. के मावळे, दुय्यम निरीक्षक आर. के फुसे, एस डी चव्हाण यांचे पथकाने शेंदला, ता. मेहकर येथील आरोपी इसम नामे संतोष सरदार यांचे राहते घरी दारूबंदी गुन्ह्याकामी छापा टाकला. त्याठिकाणी गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली, राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली विदेशी दारू ब्ल्यु 7 एक्स्ट्रा स्मुथ व्हिस्की या ब्रँण्डच्या 750 मिलीच्या 36 बाटल्या, राज्यातील मॅकडॉल क्रमांक 1 व्हिस्की या ब्रँण्डच्या जुन्या बाटल्यामध्ये भरलेल्या बनावटी विदेशी मद्याच्या 223 सिलबंद बाटल्या, मॅकडॉल व्हिस्कीचे बनावट नवीन 1540 बुचे व 424 रिकाम्या जुन्या बाटल्या व एक हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल व आरोपीचे दोन मोबाईल असा एकूण 142815 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी संतोष संपत सरदार ह. मु शेंदला ता. मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली. त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या कार्यवाहीत जवान प्रदीप देशमुख, अमोल सुसरे, गणेश मोरे, प्रफुल्ल साखरे, शरद निकाळजे व महिला जवान सौ शारदा घोगरे सहभागी होते.
जिल्ह्यात 31 डिसेंबरच्या अनुषंगाने 30 डिसेंबर रोजी प्र. निरीक्षक आर. आर उरकुडे, दुय्यम निरीक्षक पी. आर मुंगडे यांचे भरारी पथकाने नागरे हॉस्पीटल जवळ, दे. राजा येथे 121 लीटर देशी मद्यासह महिंद्रा कंपनीची एसयुव्ही कार क्रमांक एम एच 31 इए 9007 जप्त करण्यात आली. या कारवाईत 6 लक्ष 40 हजार 320 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजी उत्तम शिवणकर, रा. सिनगांव जहागीर व संतोष संपत सरदार शेंदला, ता . मेहकर व प्रमोद भुजंग सरदार रा. रामनगर, मेहकर यांना अटक करण्यात आली. त्यांचेविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65, 80, 81, 83, 90 व 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कारवाईत जवान ए.पी तिवाने, पी. ई चव्हाण, आर. ए कुसळकर सहभागी होते.
तसेच 27 डिसेंबर रोजी झालेल्या चिखली येथे मोठ्या स्वरूपातील बनावट मद्य व 29 डिसेंबर रोजी मेहकर येथील शेंदला या गावामध्ये गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्य पकडण्यात आले असून बनावट विदेशीा मद्याचा गुन्हे उघडकीस आल्याने जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारचे बनावट विदेशी मद्य वितरीत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बनावट मद्य सेवनामुळे यापूर्वी राज्यात मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झालेला आहे. तसेच बनावट मद्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार तसेच गंभीर स्वरूपाचे अपंगत्व येण्याची संभावना असते किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट संभावना आहे. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी व सेवन करावे. त्याचप्रमाणे पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांनी बनावट मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास या विभागास टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आणखी निर्बंध लागू
- लग्न समारंभात 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी
बुलडाणा, (जिमाका) दि. 31: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी निर्बंधाचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात लग्न समारंभात बंदीस्त जागांमध्ये किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम, मेळावा व मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना 50 व्यक्तींच्या उपस्थिती असणार आहे. अंत्यसंस्कार विधीमध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्ती उपस्थिती असतील. पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने व लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर स्थळे या सर्व ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहीता 1973 चे कलम 144 लागू असणार आहे.
जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 145) ये कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
**********
जिल्हास्तर युवा महोत्सव उत्साहात
· आभासी पद्धतीने केले आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 31: राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवुन, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे द्वारा दरवर्षी उपलब्ध करुन दिली जात असते. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांचे विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 31 डिसेंबर 2021 रोजी आभासी पध्दतीने (ऑनलाईन) उत्सहात करण्यात आले.
जिल्हास्तरीय ऑनलाईन युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. यावेळी क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, श्रीमती मनिषा ढोके तसेच परिक्षक म्हणून रविकिरण टाकळकर, प्रशांत खाचणे, टिळक क्षिरसागर, प्रा.सुभाष मोरे उपस्थित होते. युवा महोत्सवामध्ये लोकगित व लोकनृत्य या प्रकारांमध्ये स्पर्धंकांनी सहभाग घेतला.
यामध्ये अंतिम निकाल परिक्षकांनी सादर केल्यानुसार लोकगित या बाबीमध्ये जिजामाता महाविद्यालय, बुलडाणा तर लोकनृत्यामध्ये गो.से. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. प्रथम क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धंकाची विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथे दि.04 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या विभागीय महोत्सवासाठी निवड झालेली आहे. विभागीय महोत्सव सुध्दा ऑनलाईन पध्दतीने होणार असून, प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना लिंक प्राप्त झाल्यानंतर त्यांना सादरीकरण करावे लागेल.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संयोजक श्रीमती मनिषा ढोके, भास्कर घटाळे, रविंद्र धारपवार, अनिल इंगळे, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, भिमराव पवार, कृष्णा नरोटे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पीक पैसेवारी जाहीर
बुलडाणा, (जिमाका) दि. 31: सन 2021-22 या खरीप हंगामातील जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची अंतिम पीक पैसेवारी जाहीर झाली आहे. या सर्व गावांची अंतिम पीक पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत तालुकानिहाय गावे व नजर अंदाज पीक पैसेवारी जाहीर केली आहे.
तालुकानिहाय अंतिम पीक पैसेवारी पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा तालुका : एकूण 98 गावांची अंतिम पीक पैसेवारी 46, चिखली तालुका : एकूण 144 गावांची पैसेवारी 47, दे. राजा तालुका : 64 गावांची पैसेवारी अंतिम पीक पैसेवारी 48, मेहकर तालुका : 161 एकूण गावांची पैसेवारी 47, लोणार तालुका : एकूण 91 गावांची पैसेवारी 47, सिं. राजा तालुका : एकूण 114 गावांमध्ये पैसेवारी 47, मलकापूर तालुका : एकूण 73 गावांची पैसेवारी 46, मोताळा तालुका : एकूण 120 गावांची पैसेवारी 47, नांदुरा तालुका : एकूण 112 गावांची पैसेवारी 45, खामगांव तालुका : एकूण 145 गावांची पैसेवारी 47, शेगांव तालुका : एकूण 73 गावांची 47 पैसे, जळगांव जामोद तालुका : एकूण 119 गावांची पैसेवारी 41 पैसे आणि संग्रामपूर तालुका : एकूण 105 गावांची अंतिम पीक पैसेवारी 45 आहे. अशाप्रकारे जिल्ह्याची एकूण 1419 गावांची अंतिम पीक पैसेवारी 46 आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन
- कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
- मोबाईल क्रमांक 9823465599 वर पीडीएफ स्वरूपात तक्रारी द्याव्यात
- व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क
बुलडाणा,(जिमाका) दि.31: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने करण्यात येणार आहे. सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 9823465599 या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.
तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
23 रेती घाटांपैकी तीन रेती घाटांची ई निविदा नाही
बुलडाणा,(जिमाका) दि.31: जिल्ह्यातील सन 2021-22 करीता 23 रेतीघाटांची द्वितीय ई निविदा नि ई लिलाव सुचनेचा कार्यक्रम 21 डिसेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. तथापि संचालक, भुविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांनी 23 रेती घाटापैकी गोडेगाव, गोळेगांव खु ता. जळगांव जामोद व इटखेड ता. संग्रामपूर या तीन रेतीघाटांचे मायनिंग प्लॅन नामंजूर केले आहे. त्यामुळे या तीन रेतीघाटांची ई निविदा नि ई लिलाव लावण्यात येणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
ध्वनीक्षेपकांना मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वर्षातील सूट देणारे 12 दिवस जाहीर
बुलडाणा,(जिमाका) दि.31: ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 अन्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी श्रोतृगृहे, सामुहिक सभागृहे व मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात येणारे दिवस जाहीर करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पुढील वर्षात सुट देण्यात येणारे 12 दिवस जाहीर करण्यात आले आहे. तर उर्वरित 3 दिवस राखीव ठेवण्यात येवून महत्वाच्या वेळी व गरज भासल्यास त्या त्या वेळी निश्चित करण्यता येणार आहे. ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंबंधात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.
सूट देण्यात येणारे हे आहेत 12 दिवस
शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गणपती उत्सवातील दुसरा, पाचवा, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशीचा दिवस, नवरात्री उत्सवाचे अष्टमी व नवमीचा दिवस, लक्ष्मीपूजन व 31 डिसेंबर 2022.