- शिवभोजन थाळीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
बुलडाणा, दि. 17 : राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेच्या ल्ज्जतदार थाळीमुळे जिल्ह्यात नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळीची लज्जत वाढतच आहे. शिवभोजन केंद्रांवर दुपारी 12 ते 2 या वेळेत नागरिक थाळीच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसतआहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या शहरात सर्वप्रथम शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार बुलडाणा शहरातही तीन ठिकाणी शिवभोजन योजना सुरू आहे. यामध्ये बसस्थानक, जिजामाता प्रेक्षागार परीसर व कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणांचा समावेश आहे.
शिव भोजन थाळी योजनेला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. शिवभोजनाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांनी योजनेच्या केंद्रांवर तोबा गर्दी केली होती. बस स्थानकांवरील केंद्रात 150 थाळी आहे. तसेच बुलडाणा शहरात तीन केंद्र मिळून 400 थाळी सुरू आहेत. बस स्थानकांवर नेहमीच नागरिकांची वर्दळ असल्यामुळे या केंद्रातील थाळी अवघ्या 1 तासातच संपून जात असल्याचे कृष्णा उपहार गृह, एस टी कँटीन केंद्राचे संचालक भारत शेळके यांनी सांगितले. गरीब आणि गरजू व्यक्तींना फक्त 10 रुपये इतक्या कमी दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी ही शिवभोजन योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे.
शासनातर्फे सुरु करण्यात शिव भोजन थाळी योजनेत प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट आहे. ही शिवभोजनाची थाळी 10 रुपयात देण्यात येते. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत आहेत. ‘शिवभोजन’ थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी 50 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयाव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून या विभागाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येवून त्यांच्यामार्फत संबंधितांना वितरित करण्यात येते. शहरी भागासाठी प्रतिथाळी 40 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रतिथाळी 25 रुपये अनुदान आहे.
योजनेच्या पारदर्शीपणासाठी एक ॲप्स विकसित करण्यात आले आहे. या ॲप्समध्ये दररोजची ग्राहकांची माहिती भरण्यात येते. त्यानुसार राज्यातील सर्व शिव भोजन थाळी येाजनेतील भोजनालयांमध्ये या ॲप्सच्या माध्यमातून थाळी विक्रींची संख्याही पाहता येते. योजनेमुळे गरीब, कामासाठी बाहेरगावावरून आलेले नागरिक, विविध रूग्णालयांमध्ये आलेले रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी भोजनाची उत्तम व्यवस्था झाली आहे. शिवभोजन थाळीबाबत बस स्थानकांवरील भोजनालयात जेवन केलेले संजय तुकाराम सवडतकर म्हणतात, जेवनाचा दर्जा एकदम चांगला आहे. हे जेवन करून पोटाला आधार, तर होतोच, त्याच सोबत आमच्या सारख्या गरीब लोकांची मदत होते. ही योजना चांगली असून अशीच सुरू रहावी. तसेच प्रल्हाद नामदेवराव लोखंडे, कोलवड योजनेविषयी बोलताना म्हणाले, या जेवनात भात, पोळी, वरण, भाजी असे घरच्यासारखे जेवन आहे. गरीब जनतेला या जेवनामुळे खुप मदत होत असून हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाने आभार.
जिल्ह्यात स्थानिक तीन सुट्ट्या जाहीर
बुलडाणा, दि. 17 : राजनैतिक सेवा विभाग, क्रमांक पी – 13, 2- बी या 16 जानेवारी 1958 व 6 ऑगस्ट 1958 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात स्थानिक तीन सुट्टया जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी रक्षाबंधन, बुधवार दि. 26 ऑगस्ट 2020 रोजी ज्येष्ठ गौरी पुजन आणि गुरूवार दि. 17 सप्टेंबर 2020 रोजी सर्वपित्री अमावस्या या स्थानिक सुट्टयांचा समावेश आहे. सदर सुट्टया सन 2020 वर्षासाठी संपूर्ण बुलडाणा जिल्हा क्षेत्रासाठी लागू राहणार आहेत. हा सुट्टी आदेश जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी न्यायालये व अधिकोष यांना लागू होणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment