राज्यात पिक स्पर्धेसाठी 11 पिकांचा समावेश
*शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 29 : शेतकऱ्यांनी आधुनिक
तंत्रज्ञानाचा उपयोग करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाची
निर्मिती करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, मुग आणि उडीद या ११ पिकांचा
समावेश समावेश करण्यात आला आहे.
तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड
क्षेत्र एक हजार हेक्टरहून अधिक आहे, अशा सर्व पिकांकरिता पिक स्पर्धा आयोजित केली
जाणार आहे. पिक स्पर्धेसाठी तालुकापातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक, तर
आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. त्याकरिता भाग घेण्यासाठी
300 रुपये प्रति शेतकरी प्रति पिक या प्रमाणे प्रवेश शुल्क राहणार आहे.
एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी
स्पर्धेत भाग घेऊ शकेल. पूर्वी जिल्हाभर राज्यपातळीवर सरसकट सर्वांना भाग घेता येत
नव्हता आणि जिल्हा आणि राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत होते. आता ते
वगळून केवळ तालुकापातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरून आलेल्या
उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका पातळीवर निवड केली जाणार आहे. मागील दोन
वर्षांत ज्या शेतकऱ्यांची तालुकापातळीवर प्रथम दोन क्रमांक आलेले शेतकरी जिल्हापातळीवर
पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. तालुका आणि जिल्हा पातळीवरील पिकस्पर्धा
स्वतंत्र होणार आहे. खरीप हंगामातील मुग आणि उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 31
जुलै 2022 आणि इतर पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तुर,
सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 आहे. यात शेतकऱ्यांनी
सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि संचालक विकास पाटील यांनी केले आहे.
00000
हरवलेल्या
व्यक्ती बाबत आवाहन
संतोष
राजेभाऊ गिरी
बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील संतोष
राजेभाऊ गिरी, वय 44 वर्षे, रा. सोनाटी, ता मेहकर, जि. बुलडाणा ही व्यक्ती
हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
संतोष राजेभाऊ गिरी हे दि. 15 एप्रिल
2022 रोजी सकाळी 11 वाजता सोनाटी येथून दवाखान्यात उपचार करुन येतो असे कारण
सांगून घरुन निघुन गेला आहे. ते अद्याप परत आले नाही. त्याचा वर्ण सावळा, उंची
पावणे सहा फुट अंदाजे, डोक्यावर अर्ध टक्कल पडलेले, उजव्या कानाखाली मस, अंगामध्ये
पांढरे हिरवट रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, काळपट रंगाचा फुलपॅंट, गळ्यामध्ये पांढरा
रुमाल, पायात पॅरागॉन स्लीपर चप्पल घातलेली आहे. उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला
आढल्यास त्यांनी पोलिस ठाणे मेहकर येथील 07262-224536 या दूरध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
हरवलेल्या
व्यक्ती बाबत आवाहन
जया
ज्ञानेश्वर गिरी
बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील जया
ज्ञानेश्वर गिरी, वय 22 वर्षे, रा. सोनाटी, ता मेहकर, जि. बुलडाणा ही महिला
हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
जया ज्ञानेश्वर गिरी ही दि. 15 एप्रिल
2022 रोजी दुपारी 12 वाजता सोनाटी येथून बॅकेतून पैसे काढुन येते असे कारण सांगून
घरून निघून गेली आहे. ती अद्याप परत आलेली नाही. तिचा वर्ण रंग गोरा, उंची 5 फुट 2
इंच, अंगात गुलाबी फिक्कट रंगाची साडी, पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे.
उपरोक्त वर्णनाची महिला कुणाला आढल्यास त्यांनी पोलिस ठाणे, मेहकर येथील
07262-224536 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
हरवलेल्या व्यक्ती बाबत आवाहन
विनोद आश्रुबा नवले
बुलडाणा, दि. 29 : मेहकर येथील विनोद
आश्रुबा नवले, वय 37 वर्षे, रा. उकळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा ही व्यक्ती
हरविल्याची तक्रार मेहकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
विनोद आश्रुबा नवले ही व्यक्ती ट्रक
क्रमांक एमएच 16 सीसी 9433 वर कामाला जात आहे असे सांगून घरुन निघुन गेला आहे.
त्याचा वर्ण सावळा, उंची अदाजे 5 फुट 3 इंच, बांधा मजबूत, अंगात चौकडीचे लाल
पांढरा पट्टे असलेले फुलबाह्याचे शर्ट, काळ्या रंगाची पॅंट, पायात साधी चप्पल,
पिवळे पट्टे असलेली घातेले आहे. त्याचा मोबाईल क्रमांक 9322426626 संपर्क केला
असता संपर्क होत नाही. उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी पोलिस
ठाणे मेहकर येथील 07262-224536 या दूरध्वनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे.
00000
No comments:
Post a Comment